Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डिजिटल बारामती ॲम्ब्रेला ॲप’चे अजितदादांच्या हस्ते लोकर्पण, बारामतीकरांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होणार

या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. या मध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

‘डिजिटल बारामती ॲम्ब्रेला ॲप’चे अजितदादांच्या हस्ते लोकर्पण, बारामतीकरांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होणार
‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 9:10 PM

पुणे : सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरीकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. या मध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. (Inauguration of ‘Digital Baramati Umbrella App’ by Deputy CM Ajit Pawar)

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बारामती नगरपरिषद, आयसीआयसीआय फाऊंडेशन, रेव्हमॅक्स टेलिकॉम, उन्नती डिजीटल या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, आयसीआयसीआय फौंडेशनचे विनीत रुंगटा, कौस्तुभ बुटाला उपस्थित होते.

मोबाईलच्या एका क्लिकवर सर्व ॲप उपलब्ध

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवून आणली. त्यांनी त्या काळात दाखविलेली दूरदृष्टी आज देशाला उपयुक्त ठरत आहे. देशातील आजची मोबाईल क्रांती, डिजिटल क्रांती राजीव गांधींनी रचलेल्या संगणक क्रांतीच्या पायावर उभी आहे. बारामती नगरपरिषदेच्यावतीने ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’ची निर्मिती करुन नवे पाऊल टाकले आहे. या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून टेलीमेडिसिन अ‍ॅप, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप, जीआयएस टॅगिंग या कामावर देखरेखीचं ट्रॅकिंग प्रणाली, फिनएक्सा हे प्रॉपर्टी मॅनेजमेंट संबंधीचं ॲप, स्थानिक व्यवसायांच्या जाहीरातींसाठी लोकऑफ ॲप, आपत्कालीन स्थितीत वैयक्तिक बचावासाठी एसओएस ॲप, जीआरएस हे तक्रार निवारण प्रणालीसंबंधीचं ॲप एकत्र उपलब्ध होणार आहेत.

बारामतीकरांना दैनंदिन गरजांसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही

मोबाईलच्या एका क्लिकवर सर्व ॲप उपलब्ध झाल्याने, बारामतीकरांना दैनंदिन गरजांसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. अर्ज देण्याचा, अर्जाची पोच घेण्याचा, संबंधितांना भेटून विनंती करण्याचा त्रास या ॲपमुळे वाचणार आहे. ॲपच्या माध्यमातून केलेल्या मागणी, विनंती, तक्रारीची नोंद डिजिटली आपोआप होईल. त्यामुळे अर्जाचा पाठपुरावाही ऑनलाईन करणेही शक्य होईल. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन, दैनंदिन व्यवहार, अधिक सहज, सोपे, सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी, हे अम्ब्रेला ॲप डाऊनलोड करावे, घरबसल्या नागरी सुविधा मिळवण्यासाठी या ॲपचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विनीत रुंगटा यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ बुटाला यांनी केले.

‘बारामती डिजिटल अम्ब्रेला ऍप’च्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा :

▪️टेलीमेडिसिन अ‍ॅप :

▪️क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ▪️जीआयएस टॅगिंग: कार्य ट्रॅकिंग आणि देखरेख प्रणाली ▪️फिनएक्सा: संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स : ▪️लोकऑफ (स्थानिक व्यवसायाची जाहिरात) ▪️एसओएस- आमचे जीवन वाचवा (वैयक्तिक आपत्कालीन बचाव) ▪️तक्रार निवारण प्रणाली (जीआरएस)

इतर बातम्या :

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार, धनंजय मुंडेंची ग्वाही

मोफत शिवभोजन थाळी लवकरच बंद!, 1 ऑक्टोबरपासून पैसे मोजावे लागणार

Inauguration of ‘Digital Baramati Umbrella App’ by Deputy CM Ajit Pawar

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.