Maharashtra political crisis Live : घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं माहिती नाही- राज ठाकरे
Maharashtra political crisis Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठी घडामोड घडली आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वर्षभरात सलग दुसरा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. आपल्या समर्थक आमदारांना घेऊन अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावाही सांगितला आहे. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची उचलबांगडीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बांधणीला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गटाच्या जोरबैठका सुरू असून पुढील रणनीती ठरवली जात आहे. तर दुसरीकडे इतर राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
दीपक केसरकर यांच्या बंगल्यावर शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार आहेत. राज्यातील घडामोडीवर ही बैठक महत्वाची असणार आहे. या बैठकीसाठी दादा भुसे, संजय राठोड आणि आनंदराव अडसूळ दाखल झाले आहेत.
-
घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं माहिती नाही- राज ठाकरे
घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं माहिती नाही. छगन भुजबळ, प्रफुल पटेल दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत जाण्यासारखे नाहीत मला जरा हे संशयास्पद वाटत आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
-
-
सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी होत आहे- राज ठाकरे
राज्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज ठाकरे उद्विग्न, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी होत आहे. पक्ष येतील जातील, तुम्ही आम्ही येणार, जाणार मात्र महाराष्ट्र टिकला पाहिजे. महाराष्ट्र टिकवण्याससाठी मनसैनिकांनी तळागाळपर्यंत पोहचलं पाहिजे. राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा
-
शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीस जाण्याचा अनेक नेत्यांचा निर्धार
राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटांमुळे आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यावरुन खेचाखेची सुरू आहे. शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सांगली जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी घेतला आहे निर्णय. मात्र यातीलच काही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून उद्याच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे निरोप आले आहेत. मात्र शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीस जाण्याचा अनेक नेत्यांचा निर्धार
-
जे झालय ते अत्यंत किळसवाने झाले- राज ठाकरे
जे झालय ते अत्यंत किळसवानं झालेलं आहे. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही. कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात गेल्यात काही कळत नाही. सुरुवात शरद पवार यांनी केली 78 साली शेवट त्यांच्यावरच होतो आहे. परवाच्या दिवशी अजित पवार यांनी स्टेटमेंट केलं होतं शरद पवार यांचे होर्डिंग वर फोटो लावा हे अनाकलनीय आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं मी म्हटलेलं आहे.
-
-
राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ऍफिडेवीट करून घेण्यात येत आहे. यात शरद पवार यांनाच पाठींबा असणार आहे आणि आम्ही याच पक्षासाठी काम करत असल्याचे मजकूर अजून हे ऍफिडेवीट नोटरी देखील करण्यात येत आहे. आजपासून पक्ष कार्यालय येथे हे फॉर्म भरून ऍफिडेवीट करण्यास सांगितले आहे.
-
छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत- राज ठाकरे
अजित पवारांनी केलेल्या बंडामागे शरद पवारच असल्याची शक्यता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे मंत्री पदासाठी अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत त्यामुळे हे सगळं संशयास्पद असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
-
महाराष्ट्रात या सळ्याची सुरूवात शरद पवारांनी केली, आता शेवटही त्यांच्यावरच होतोय- राज ठाकरे
महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या प्रसंगावर मी मेळाव्यात बोलेल असे राज ठाकरे म्हाणाले. महाराष्ट्रात अशा प्रकारांची सूरूवात पवार साहेबांनीच केली आणि शेवटही त्यांच्यावरच होतोय असे राज ठाकरे म्हणाले.
-
अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतूक
देश पातळीवर पंतप्रधान मोदी शिवाय पर्याय नाही असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आहे. विकासाच्या दृष्टीकोणामुळे आम्ही भाजप सरकारसोबत असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधक विस्कळीत झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश आगेकुच करतोय असेही अजित पवार म्हणाले.
-
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच
खाते वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अर्थ, जलसंपदा, सामाजिक बांधकाम खातं राष्ट्रवादीला देऊ नका अशी आग्रहाची मागणी शिंदे गटाच्या आमदारांची आहे.
-
महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळण्याची शक्यता
अजित पवारांना अर्थ खाते मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या विषयी चर्चा करण्याठी संध्याकाळी रामटेक निवास्थानी बैठक घेण्यात येणार आहे. दिलीप वळसे पाटील यांना कृषी खाते मिळण्याची शक्यता आहे.
-
अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात येऊ नये यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजितदादांकडे हे खाते देण्यात येऊ नये यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या काळातही अजित पवारांकडे अर्थखातेच होते हे विशेष. अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याने शिंदे गट महाविकास आघाडीतून वेगळा झाला होता.
-
अजित पवारांना अर्थमंत्रालय मिळण्याची शक्यता- सूत्र
अजित पवारांनी सत्तेच्या पारड्यात उडी घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. खाते वाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.
-
बुलढाणा: जिल्ह्यातील 150 च्यावर पदाधिकारी, 9 जिल्हा परिषद सदस्य शरद पवार यांच्यासोबत
जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. तर जिल्ह्यातील 150 च्यावर पदाधिकारी सुद्धा सोबत आहेत त्यामधे तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्षसह इतर आहेत. जिल्ह्यातील 9 जिल्हा परिषद सदस्य सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांची माहिती.
-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या जाणार
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या जाणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि अंबादास दानवे यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतले जाणार आहे. 20 जुलै नंतर सभेची सुरुवात होणार आहे त्यासाठी लवकरच तारीखा जाहीर होणार आहे. ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती.
-
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
काही प्रमाणात नाराजी असते पण त्याचा अर्थ आम्ही नाराज आहोत असा मुळीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यानं आमची ताकद वाढणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं नाही. अजित पवारांना कोणतंही खातं दिलं तरी आमचा विरोध असण्याचं कारण नाही. आमचा मंत्रीमंडळ दोन तीन दिवसांत होईल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमचा त्यावेळी विरोध होता की राष्ट्रवादी त्या़चा पक्ष मजबूत करत आहे. पण अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा कॉम्प्रोमाईज करावं लागतं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.
-
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट आमने- सामने. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून वाद. कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ते आक्रमक.
-
वाशिम: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, काही ठिकाणी जोरदार पाऊस
कारंजा,रिसोड,मंगरुळपिर तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्याला सुरवात होणार आहे. तसेच काही ठिकाणी पेरणी पिकांना मिळणार जीवनदान. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट आमने-सामने
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट आमने- सामने. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून वाद. कार्यालय कोण ताब्यात घेणार यावरून 2 गट आमने- सामने. कार्यालयावरून 2 गटात राडा. NCP कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा राडा.
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरलेले आहे- अंबादास दानवे
जिथे जिथे आपण कमी आहोत त्या जागा आपण भरल्या पाहिजेत. जास्तीत जास्त जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरलेले आहे हे गद्दारांच सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे स्वतःची खळगी भरणारे हे सरकार आहे. त्यामुळे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरा करणार आहोत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे व शिवसेनेचे सर्व नेते असणार आहेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे वक्तव्य.
-
गद्दारांना गद्दारांनीच धडा शिकवला – शरद कोळी
अजित पवारांच्या सत्तेतील सहभागावरून शरद कोळी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे ची भूमिका घेतल्यास ती शिवसैनिकांना मान्य असेल. शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटाला कर्माची फळं मिळालीत. पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. फोडा आणि राज्य करा ही नीती भाजप अवलंबतेय. मात्र 2024 साली महाराष्ट्रातील आणि भारतातील जनता भाजपला फोडल्याशिवाय राहणार नाही, असे कोळी म्हणाले.
-
इंदापूर तालुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे
तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरीता इंदापूर तालुका अजित पवारांसोबत आहे. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील, असा दावा तालुका अध्यक्ष कोकाटे यांनी केला आहे. आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी चर्चा करून निर्णय, असेही कोकाटे म्हणाले.
-
नाशिकमध्ये अजित दादा-शरद पवार गट आमने सामने
शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठक घेण्यावर ठाम आहेत. मात्र बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा अजित दादा-भुजबळ गटाने इशारा दिला आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आले आहे.
-
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत वाजवी वेळ किती? हा वादाचा मुद्दा
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत निर्देश दिले आहेत. मात्र त्याची वाजवी वेळ किती? हा आता वादाचा मुद्दा बनू शकतो, असं मत जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. तसेच निर्णय घेण्याबाबतचा वेळ फार लांबवता येत नाही, सर्वोच्च न्यायालय ही बाब तपासू शकते. त्यानंतरच वाजवी वेळेच्या बाबतीत हस्तक्षेप करायचं का नाही? हे सर्वोच्च न्यायालय सांगू शकते. पण त्याबाबतचा आदेश या क्षणी तरी सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही, असे मत देखील उज्वल निकम यांनी व्यक्त केले. ते सांगलीमध्ये बोलत होते.
-
आजची कॅबिनेट ऐतिहासिक – राधाकृष्ण विखे पाटील
तुम्हाला आश्वासित करतो की, आजची कॅबिनेट ही ऐतिहासिक झाली. तीन वेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यात आपली भूमिका मांडली. बरेच लोकहिताचे निर्णय घेतले गेलेत, याचा फायदा जनतेला होईल. पोर्टफोलिओ बदलणार आहेत. याबाबत सीएम डीसीएम निर्णय घेतील. माझ्या खात्याबाबत जो कही निर्णय होईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
-
भाकरी करपायच्या आधी पालटून टाकू – बच्चू कडू
मला वाटतंय की जनतेलाच काय पण आम्हालाही हे परिवर्तन एक धक्काच होता. ज्या एनसीपीवर टीका केली, तिच्यासोबत आल्याने आता जनतेला हे पटवून देणं आणि त्यांनी स्विकारणं हे फोर मोठं आव्हान आहे, याला वेळ लागेल. नाराजी होण्याचं फार काही कारण नाही, तिघेही नेते मोठे नेते आहेत, ते निर्णय घेतील आणि आम्ही त्याचं पालन करू. अजित पवार यांच्या निधी वाटपावरून थोडीशी नाराजी होती, पण ती दूर होईल असं आश्वासन मिळालंय. त्यामुळे भविष्यात मोठे बदल पहायाला मिळतील. भाकरी करपायच्या आधीच आम्ही भाकरी पालटून टाकू, दुसरी भाकरी करू, असे बच्चू कडू यांनी म्हटलं.
-
टीका करण्याखेरीज विरोधकांना काम नाही – अनिल पाटील
कॅबिनेट बैठकिला उपस्थित राहून एक वेगळा अनुभव आला. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण आमदाराला संधी दिली, याचं समाधान आहे. संजय राऊत यांना काही काम राहिलं नाही, त्यांच्या बोलण्यालाही आता काही महत्व नाही. आम्ही सरकारमध्ये आता सामिल झालोय. मोदींचं तत्व मान्य केलंय. त्यामुळे पुढे कुणामध्ये नाराजी होण्याचं कारण नाही. हळू हळू हा बदल महाराष्ट्र स्विकारेल, आम्हीही याबाबत प्रयत्नशील राहू, कामातून उत्तर देऊ. सगळे आमदार आमच्याच बाजूने आहेत. आमच्याकडे आकडा आहे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी आकडा घोषित करावा. टीका करण्याखेरीज विरोधकांना काम नाही. कायदेशीर लढाई आम्ही लढण्यास तयार, पण त्याची वेळ येईल असं वाटत नाही, अशी अनिल पाटील यांनी दिली.
-
पुणे शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शरद पवारांसोबत राहणार
पुणे शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शरद पवारांसोबत राहणार असल्याचा ठराव बैठकीत करण्यात आला आहे. आजच्या बैठकीला दोन्ही आमदार आणि काही नगरसेवक उपस्थित नव्हते, मात्र उद्याच्या बैठकीला उपस्थित राहतील. कार्यालयाचा ताबा कुणी घेतला तर आम्ही कायदेशीर लढाई लढणार, कार्यालयाचे अॅग्रिमेंट माझ्या वैयक्तिक नावावर आहे. अजित पवारांचा अद्याप मला फोन नाही, मात्र मी त्यांना मेसेज करून शरद पवारांसोबत गेलो आहे. आजच्या बैठकीत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
-
आजची कॅबिनेट म्हणजे गंगा यमुना सरस्वतीचा संगम – सुधीर मुनगंटीवार
अनुभवी मंत्र्यांची जोड लाभली आहे. तीन पक्ष एकत्र येऊन विकासासाठी काम आम्ही करू. देशात एक नंबरच राज्य आपलं बनेल. जे आमच्यात आलेत, त्यांना घाई नाही. खातेवाटप लवकर होईल, सखोल चर्चा होईल. शरद पवार आमदारांना संपर्क करत असतील. प्रत्येक गुगलीत नेहमी समोरचा आउट होतो असं नाही. तुम्हाला हे भोवलं आहे. राष्ट्रवादी आता आमच्यासोबत आहे. शरद पवार आधी म्हणाले. आम्ही कोर्टात जाणार नाही. आता जाणार आहेत. कोर्टात कशाला जाताय? आमदार असतील तर राजभवनात जा. सर्व आमदार समोर आणा. तेव्हा संख्या जमली नसेल. आमदारांना तेव्हा सुद्धा मोदींच्या नेतृत्वात काम करायचं असेल, असे मुनगंटीवार म्हणाले.
-
गडचिरोलीत राज्य राखीव पोलीस दलातील जवानाची हत्या
आपसातील वादातून राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने दुसऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सुरेश मोतीलाल राठोड असे मयत जवानाचे नाव आहे. मारुती सातपुते असे आरोपी जवानाचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं. या भांडणातून सातपुते याने राठोडवर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत राठोडला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
-
बारामती तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या बैठकीत उपस्थित राहणार
बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उद्या अजित पवारांच्या बैठकीला जाणार आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सर्व संस्थांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.
-
नव्या राज्य सरकारचे फटाके फोडून एमआयएम स्वागत करणार
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते नव्या राज्य सरकारचं फटाके फोडून स्वागत करणार आहे. फटाके फोडत ढोल ताशे वाजवत एमआयएम जल्लोष करणार आहे. एमआयएम उपहासात्मक आंदोलन करत जल्लोष करणार.
-
एकला चलो बाबत कोणताही विचार नाही – भास्कर जाधव
सध्या एकला चलो बाबत कोणताही विचार, कोणतीही चर्चा, पुसटसा सुद्धा उल्लेख या ठिकाणी कोणी केलेला नाही. भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता, आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरता आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरता अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
-
उद्धव साहेब लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील – भास्कर जाधव
उद्धव साहेबांनी दौरा करावा अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव साहेब गेले अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे, असं सातत्याने सांगतात. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता. आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धव साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असा मला वाटतं, असे भास्कर जाधव म्हणाले.
-
रात्री शिंदे-फडणवीसांमध्ये नागपुरात चर्चा होईल – अजित पवार
बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत मतमतांतरे असू शकतात. शिंदेंसोबत अडीच वर्ष काम केलं. विकासाच्या मुद्द्यावरुन सरकारला पाठिंबा दिला. विकासासाठी शिंदे आणि भाजपसोबत एकत्र आलो, असेही अजित पवार पुढे म्हणाले.
-
ठाकरे गट मविआत राहूनच निवडणूक लढणार – संजय राऊत
ठाकरे गट महाविकास आघाडीत राहूनच एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत एकत्रित निवडणूक लढण्यावर चर्चा झाली.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर उपस्थितीत बैठक झाली , त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसाठी कसून तयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
-
ठाकरे गटाच्या बैठकीत ‘एकला चलो रे’ चा सूर
मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलो रे सूर उमटला आहे. निवडणुकांसाठी तयार रहावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
पक्ष संघटना आणखी मजबूत करा, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
-
एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक सुरू
मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात ही बैठक सुरू आहे.
संभाव्य खातेवाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही होऊ शकते चर्चा.
-
अजित पवार गटाच्या कार्यालयाचे आज उद्घाटन
अजित पवार यांच्या गटाच्या मुंबईतील कार्यालयाचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. मंत्रालयसमोर हे नवे कार्यालय असेल.
कार्यालयाच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ, सुनील तटकरे, अदिती तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित आहेत.
-
राष्ट्रवादीकडे आमदार नाहीत – सुधीर मुनगंटीवार
शरद पवार यांच्याकडे आमदार राहिलेले नाहीत. राष्ट्रवाादीची सध्या स्थिती ‘शोले’ सारखी आहे, आधे इधर, आधे उधर…. अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
आमदार असतील तर ते समोर आणावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
-
शरद पवारच राष्ट्रवादीचे प्रमुख – नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
शरद पवार हेच राष्ट्रवादीचे प्रमुख राहतील असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. संकटात एकत्र लढण्यासाठी पवारांच्या भेटीला आलोय.. असं वक्तव्य देखील पटोले यांनी केलं आहे. विरोधी पक्षनेत्याबाबत अद्याप चर्चा नाही.. असं देखील पटोले म्हणाले आहेत.
-
‘मी शरद पवारांसोबत…’, रवींद्र भैय्या पाटील यांची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. गुलाबरावांच्या विरोधात लढायचं आहे, मी शरद पवारांसोबत असल्याची देवकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक जळगावमध्ये पार पडली आहे..
-
‘काल रात्री बैठकीचे उशिरा निरोप गेले, त्यामुळे…’ प्रदीप गारटकर यांचं मोठं वक्तव्य
काल रात्री आजच्या बैठकीचे उशिरा निरोप गेल्यामुळे काही जण हजर नाहीत.. असं वक्तव्य प्रदीप गारटकर यांनी केलं आहे. ‘जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. ४ ते ५ तालुका अध्यक्ष जे आज उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. जिल्यातील इतर तालुक्यातील अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून रात्री निर्णय घेऊ…’ असं देखील प्रदीप गारटकर म्हणाले.
-
नेमका कुणाला पाठींबा द्यायचा… पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस संभ्रमात
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नक्की कोणाला पाठिंबा द्यायचा… या संभ्रमात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. नेमका कुणाला पाठींबा द्यायचा याबाबत बैठकीत निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत स्पष्टता नाहीच. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती दिली आहे.
-
उद्याच्या बैठकीत पवारांना किती पाठिंबा आहे हे कळेल – जयंत पाटील
उद्याच्या बैठकीत पवारांना किती पाठिंबा आहे हे कळेल.. असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. अजित पवार गटाकडून लोकांना संभ्रमीत करण्याचा प्रयत्न होत आहे. अजित पवार यांची नोशनलिस्ट पार्टी आहे. नोशनलिस्ट पार्टी मला निलंबित करु शकत नाही अशी भूमिका देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराणे अजित दादा यांच्यासोबत आहेत. आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत राहणार आहेत. पुसदमध्ये आयोजित सहविचार सभेत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या राजकारणमध्ये नाईक परिवाराचे मोठे महत्व आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून नाईक परिवार पक्षामध्ये आहेत.
-
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची सुप्रिम कोर्टात याचिका दाखल
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय लवकर व्हावा.. अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे.
-
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु; शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
दिपील वळसे पाटील यांना सांस्कृतिक खातं मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हसन मुश्रीफांना कामगार मंत्रीपद मिळाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधीनंतर अजित पवार यांची पहिली बैठक आहे.
-
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ही खाती मिळणार
अजित पवार – महसूल
दिलीप वळसे पाटील – सांस्कृतिक आणि कृषी
छगन भुजबळ – ओबीसी आणि बहुजन विकास
हसन मुश्रीफ – अल्पसंख्याक आणि कामगार
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
धर्मराव बाबा- आदिवासी कल्याण
आदिती तटकरे – महिला आणि बालविकास
-
या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अजित पवार यांच्या सोबत जाणार नाही
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अजित पवार यांच्या सोबत जाणार नाही, आम्ही सगळे शरद पवार यांच्या सोबत राहणार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिली आहे. उद्या मुंबई येथे शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन केल्याची वैद्य यांनी माहिती दिली. सर्व १५ तालुक्यांचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व आघाडी प्रमुख अशी जवळपास ७० प्रमुख पदाधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत.
-
अजित पवारांनी फसवून आमदारांना सोबत नेलं
अजित पवारांनी फसवून आमदारांना सोबत नेलं आहे असा टोला रोहित पवारांनी अजित पवार यांच्या गटाला लावला आहे. राज्यात पुन्हा परिवर्तन अटळ आहे. शरद पवारांचं व्हिजन नसेल तर पक्षाचं चिन्ह असून काय उपयोग असंही रोहित पवार म्हणाले.
-
राष्ट्रवादीच्या सर्व तालुका अध्यक्षांची बैठक
मागच्या १ तासांपासून राष्ट्रवादीच्या सर्व तालुका अध्यक्षांची बैठक सुरू आहे. बैठकीला जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित आहेत. पुणे जिल्हयातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमका कुणाला पाठींबा देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे बैठकी नंतर जिल्हाअध्यक्ष प्रदिप गारटकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबाद शहरात मोर्चा
दलित आणि मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद मोर्च्याला सुरवात झाली आहे. भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
-
अजित पवारांच्या शपथविधीनंतर पुणे राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
अजित पवारांच्या शपथविधीनंतर पुणे राष्ट्रवादीत घडामोडीना वेग
शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी बोलावली तातडीची शहर कार्यकारीणीची बैठक
शरद पवारांसोबत रहायचं का अजित पवारांसोबत याबाबत बैठकीत होणार निर्णय,
बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित
-
मातोश्रीवरील बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
मातोश्रीवरील बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी पोहचत आहेत.
सुरज चव्हाण, राजन साळवी, अनंत गीते, अरविंद सावंत, सचिन अहिर, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, राहूल पाटील, नरेंद्र दराडे मातोश्रीवर दाखल
मातोश्रीवरील बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
-
आमदार सुनील शेळके यांचा गौप्यस्फोट, सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याच ठरलं
आमदार सुनील शेळके यांचा गौप्यस्फोट, सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याच ठरलं
सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं अस आम्हाला वाटत नव्हतं.
त्या ठिकाणी ‘सुप्रिया सुळे’ होत्या, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला.
अजित पवार यांनी आम्हाला बोलवून घेतलं, त्यांनी सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. आम्ही सत्तेत राहायचं म्हणून सह्या दिल्या आहे.
अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला. सत्तेत घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीत गट तट नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी परिवारासोबत मी असेल.
-
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया
पुढील मंत्रीमंडळ विस्तारात माझा नंबर नक्की लागेल.
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया
सध्या वस्तूस्थिती स्विकारण्याची गरज आहे.
अजित पवारांना आम्हाला न्याय द्यावा लागेल.
-
शरद पवार वायबी चव्हाण सेंटरकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे शरद पवार वायबी चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहे. या ठिकाणी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.
-
राष्ट्रवादी यांच्याकडे कोणती खाती
मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणती खाती जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात अजित पवार यांना महसूल खाते दिले जाणार आहे. दिलीप वळसे यांना सांस्कृतिक तर छगन भुजबळ यांना ओबीसी खाती देणार असल्याचे वृत्त आहे. हसन मुश्रीफ यांना कामगार खाते मिळणार असल्याचे वृत्त आहे.
-
ठाकरे गटाची बैठक
शिवसेना ठाकरे गटाची बैठक मातोश्रीवर मंगळवारी दुपारी 12.30 ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत आमदार, खासदार, नेते, उपनेते उपस्थित राहणार आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेना ठाकरे गटाची ही पहिली बैठक होणार आहे.
-
सर्व जण कशासाठी गेले- नाना पटोले
अमित शहा आणि नरेंद्र मोदी सांगतील हे त्यांना ऐकावे लागणार आहे. एकतर सत्तेत या किंवा जेलमध्ये जा, हा पर्यात त्यांच्यांकडे होता, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
-
अजित पवार यांनी सर्वांना विश्वास घेतले
सर्व आमदारांना विश्वासात घेऊन अजित पवार यांनी हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार व प्रफुल्ल पटेल सत्तेत सामील झाले, असे तुमसर – मोहोडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
-
मंत्रालयात अजित पवार यांच्यासोबत सर्व मंत्री
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्रीसुद्धा दाखल झाले आहे. दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या खात्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
-
काँग्रेसची आज बैठक
राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची आज बैठक होत आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवस्थानी मंत्र्याची बैठक सुरु आहे. कॅबिनेटची बैठक होण्यापूर्वी ही बैठक सुरु आहे. त्यात गुलाबराव पाटील, संजय गायकवाड, संदीपमान भुमरेसह काही आमदार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची ही शक्यता वर्तवली आहे.
-
शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठका
शरद पवार यांच्या बंगल्यावर मंगळवारी हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु आहे. जयंत पाटील, रोहित पवार शरद पवार यांच्या निवासस्थानी आले आहेत. अजून अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत.
-
अजित पवार बैठकीसाठी रवाना
अजित पवार यांच्या बंगल्यावर मंगळवारी हालचालींना वेग आला आहे. सकाळपासून त्यांच्या बंगल्यावर बैठकींचे सत्र सुरु आहे. सकाळी ११ वाजता अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक होत आहे.
-
नाशिक राष्ट्रवादीच्या कार्यालयावर कुणाचा दावा? वाचा…
नाशिकमध्ये अजित पवार – छगन भुजबळ गटाने राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेतला आहे. राष्ट्रवादी कार्यालयात कोणालाही घुसू देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे या कार्यलयात उपस्थित आहेत. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय.
-
कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे बॅनर
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर कोल्हापुरात बॅनरबाजी पाहायला मिळतेय. गोकुळ दूध संघांचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी शहरात बॅनर लावत केलं आमदार हसन मुश्रीफ यांचं अभिनंदन केलं आहे. बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो आहेत. शरद पवार यांचा फोटो मात्र बॅनरवरून गायब झालेला आहे. रात्रीत बॅनर झळकावत अरुण डोंगळे यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे. राज्यातील सत्ता बदलाचा गोकुळ दूध संघाच्या सत्तेवर परिणाम होणार का? या चर्चांना आता उधाण आलं आहे.
-
संजय राऊत यांचे भाजपवर गंभीर आरोप
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप लावला आहे. भाजप हा राजकारणातील सिरियल किलर आहे. सिरियल रेपिस्टस आहे, असे गंभीर आरोप राऊतांनी केले आहेत. भाजपने शिंदेगटाला पक्ष आणि चिन्हावर दावा करायला लावला. तसंच राष्ट्रावादीतून फुटलेल्या लोकांनाही भाजपने करायला लावलं आहे, असंही ते म्हणालेत.
-
अजित पवार युतीसोबत गेल्यामुळे भाजप नेते नाराज?
अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे भाजपमधील नेते नाराज असल्याची माहिती आहे. इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे हर्षवर्धन पाटलांची पंचाईत झाल्याची चर्चा सध्या होते आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील सहकारात हे दोन्ही नेते कायमच एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. पण आता अजित पवार भाजपसोबत आल्याने हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती आहे.
-
मिंधेगट शपथविधीवेळी अजित पवारांसमोर लोटांगण घालत होता; संजय राऊतांचा घणाघात
अजित पवार यांना कंटाळून भाजपसोबत आलो, असं म्हणणारा मिंधेगट शपथविधीवेळी अजित पवारांसमोर लोटांगण घालत होता. शिंदे गट भाजपचा गुलाम आहे आणि गुलामांच्या नाराजीला काहीही किमंत नसते. तशी एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांच्या नाराजीला कुणीही विचारत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
-
कोल्हापूर राष्ट्रवादीत दोन गट; माजी आमदारांनी बोलावली बैठक, निर्णयाकडे लक्ष…
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरमध्येही पदाधिकाऱ्यांमध्ये उभी फुट पडली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अजित पवारांसोबत आहेत. तर शहर अध्यक्ष आर.के. पोवार शरद पवार यांच्यासोबत राहणार आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्यावर दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर माजी आमदार के.पी पाटील कुणासोबत जायचं याचा निर्णय घेणार आहेत.
-
होय, आम्ही साहेबाच्या सोबतच!; सांगलीतील ‘त्या’ बैलाची जोरदार चर्चा
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कुणी अजित पवार गटात आहे तर कुणी शरद पवार यांच्या गटात आहे, अशी माहिती कार्यकर्ते आणि नेते देत आहेत. पण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावात एक वेगळी घटना पाहायला मिळाली. बैलप्रेमी यांनी बेंदूर सणाचं औचित्य साधून बैलाच्या अंगावर “आम्ही साहेबाच्या सोबत”, असं लिहिलं आहे. या अनोखी कलाकृतीची, या मजकुराची आणि या बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
-
औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कुणाला पाठिंबा?
औरंगाबाद जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत आहेत. औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील अजित पवार गटात दाखल झाले आहेत. जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर शहराध्यक्ष खाजा शेख , माजी आमदार संजय वाकचौरे आणि इतर पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत आहेत. दरम्यान, तटस्थ पदाधिकाऱ्यांना दोन्ही गटाकडून फोन सुरू आहे.
-
रोहित पवार यांनी साधला निशाणा
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर आणि बंडावर ट्विट केले आहे. अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे विचार ट्विट करत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. ‘जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही’ हे अब्राहम लिंकन यांचे विचार शेअर करत त्यांनी सध्याच्या बंडावर निशाणा साधला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2023
-
जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला
रविवारी दुपारपासून राज्यातील राजकारणाने पूर्ण 360 अंशांची कलाटणी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असली तरी सत्तेच्या केंद्रभागी त्याचे हादरे बसायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी शिंदे गट नवीन अपडेटमुळे अस्वस्थ असल्याचे समोर येत आहे. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान आज सकाळापासून अनेक खलबतं सुरु आहेत. नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. तर जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला पोहचले आहेत. सिल्व्हर ओक येथे जयंत पाटील दाखल झाले आहेत.
-
आमदारांसाठी रस्सीखेच, तनपुरे अजित पवार भेट
आमदार आपल्या खेम्यात ओढण्यासाठी आता रस्सीखेच सुरु आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत असणारे प्राजक्त तनपुरे हे अजितदादा पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. कोण पॉवरफुल आहे, हे या रस्सीखेचमधून समोर येईल.
-
डॉ. अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार
राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी डॉ. कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
मुंबईत राष्ट्रवादीचं मंत्रालयासमोर नवीन कार्यालय
मुंबईत आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचं उद्धघाटन होणार आहे. अजित पवार यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचं उद्धघाटन होणार आहे. मंत्रालयासमोरचं हे कार्यालय असेल. या कार्यालयातून राष्ट्रवादीचा गाडा हाकण्यात येणार आहे.
-
अजित दादांकडे अर्थखाते जाण्याची शक्यता, शिंदे गटात नाराजी
राज्याची आर्थिक नाड्या असणारे अर्थखाते अजित पवार यांच्याकडे जाऊ नये, असा सूर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांनी आवळला आहे. अर्थखाते पवार यांच्याकडे गेल्यास निधी मिळणार अशी भीती शिंदे गटाला वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थखाते पवार यांच्याकडे जाण्याच्या चर्चेमुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. निधी रोखून अजित पवार करिअर संपवतील, अशी भीती त्यांना वाटत आहे.
-
नवी दिल्ली | आगामी निवडणुकांबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक
आगामी निवडणुकांबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक येत्या 7 जुलै रोजी होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी उपस्थित राहणार आहेत.
-
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिंदे गट नाराज?
महत्त्वाची खाती राष्ट्रवादी आणि भाजपकडे गेल्याने शिंदे गटाचे नेते नाराज आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधी वाटपाच्या फॉर्मुल्याला वैतागून शिंदेंची साथ देणारे नेते लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. शिंदे आणि फडणवीस याबाबात तोडगा काढणार असल्याचं कळतंय. दोन्ही नेत्यांमध्ये यावर दोन तास चर्चा झाली.
-
अजित पवारांकडून राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करण्यास सुरुवात
अजित पवारांकडून राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करायला सुरुवात झाली आहे. माझ्यासोबत येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष निर्णय कळवणार आहेत. मात्र 5 तारखेच्या बैठकीसाठी अजित पवारांकडून हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.
-
कोल्हापूर | गेल्या दोन दिवसांपासून समरजीत घाटगे संपर्काबाहेर
राज्यातील सत्ता नाट्यानंतर कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. दोन दिवसांपासून समरजीत घाटगे संपर्काबाहेर आहेत. घाटगे समर्थकांचं मात्र सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेनिंग सुरू आहे. आम्ही राजेंसोबत, राजे ठरवतील तो पक्ष, ठरवतील ते धोरण.. असं म्हणत समर्थकांनी घाटगे यांना पाठिंबा दर्शविला आहे. समरजित घाटगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्याने समरजित घाटगे आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे.
-
अजित पवारांच्या शपथविधीनंतर बारामती शहरात जोरदार बॅनरबाजी
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता बारामती शहरात जोरदार बॅनरबाजी पहायला मिळतेय. या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चाणक्य म्हणून उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो गायब आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत.
-
राज्यात आज चार महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय वर्तुळाचं लक्ष
राज्यात आज चार महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. पहिली घडामोड म्हणजे आज दुपारी 12 वाजता नव्या कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यानंतर आज दुपारीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसनेही आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे काही विधीतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
नाशिकच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री येणार?
नाशिकमध्ये येत्या 8 तारखेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. नाशिकच्या तपोवनमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचा पाठिंबा
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाने पाठिंबा दिला आहे. या विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच 7 वाजता देवगिरीवर जाऊन अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याशीच चर्चा केली. पक्षात प्रवेश केलेले कलाकार हे अजित दादांसोबत राहाणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
-
काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांच्याकडील आमदारांचं संख्याबळ घटलं आहे. तर अजित पवार यांचा एक गट सरकारमध्ये गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षात सर्वाधिक आमदार संख्या काँग्रेसकडेच उरली आहे. परिणामी राज्याचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसही विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक असून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
कोणता झेंडा हाती घ्यायचा? शरद पवार यांचा की अजितदादा यांचा?; पुण्यात आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. पुणे शहरात पार पडणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही बैठक बोलावली आहे. अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा की शरद पवार हे आजच्या बैठकीत ठरणार आहे. बैठकीला पुणे शहरातील पदाधिकारी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रदीप गारटकर यांनी दिली.
-
शिवसेनेचा केंद्रीय निवडणूक आयोगातील अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अलर्टवर
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची शपथपत्र घेणार आहे. पुढील काळात शपथपत्र लागण्याची चिन्ह आहेत. राज्यभरात उद्यापासून भरून घेतली जाणार अँफेडेव्हीट. वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्याचे देखील कळत आहे.
-
उद्या मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे होणार उद्घाटन
अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यामध्ये मोठ्या राजकिय घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी अजित पवारांच्या हस्ते मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचे होणार उद्घाटन अशी माहिती मिळत आहे.
-
अजित दादांचे बंड की थंड याबाबत स्पीकर समोर कागदपत्रे आल्यावर भाष्य करू- उज्वल निकम
अजित पवार यांच्या बंडावर उज्वल निकम यांनी मोठा भाष्य केले आहे. उज्वल निकम म्हणाले की, अजित दादांचे बंड की थंड याबाबत स्पीकर समोर कागदपत्रे आल्यावर भाष्य करू. अजित दादांच्या बंड आहे की थंड आहे की अधिकृत पक्षाची भूमिका हे स्पीकर समोर कागदपत्रे येत नाहीत तो पर्यंत मत प्रदर्शित करता येणार नाही.
-
जो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये जो खेळ बघितला. तो नव्याने नवा अध्याय , नवा भिडू यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. याबाबत आता स्पिकरना अधिकार आहेत. स्पीकरनी विहित कालावधीत निर्णय घेतला पाहिजे. यामध्ये मात्र कागदोपत्री पुरावे याची छाननी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी दिली.
-
तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता नाही- आव्हाड
एक गटाला बाहेर पडून स्वत:ला पक्ष म्हणण्याचा अधिकार नाही. तुमची संख्या कितीही असो पण तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही- आव्हाड
-
माझी निवड राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली त्यामुळे तो योग्य आहे – जितेंद्र आव्हाड
सुभाष देसाई आणि राज्यपाल यांच्या पाच याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावेळी निकालात फक्त पार्टीचा अध्यक्ष प्रतोद नेमू शकतो असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे. त्याच आधारे माझी निवड राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शिवसेनेच्या निकालातही तसेच म्हटले आहे. त्यामळे माझी निवड योग्य आहे असे जितेंद्र एव्हडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
-
पवार, तटकरे निलंबित असल्याने त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड
व्हीपचा अधिकार हा पक्षाला आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केलेली तुम्ही रद्द कशी करू शकता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. करण त्यांना संविधानिक नियुक्त्या करण्याचा परवानगी नसल्याचं आव्हाड म्हणाले.
-
जयंत पाटील आणि आव्हाड यांच्या नेणुकीला आव्हान दिलंय – अजित पवार
शरद पवार यांनी विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील आणि मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड केली. मात्र, त्यांच्या या निवडीला आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पात्र देऊन आव्हान दिले आहे असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
-
आता जे आकडे सांगत आहे तो पक्ष नाही – छगन भुजबळ
प्रफुल्ल पटेल यांनी निवड पक्षाच्या कार्यकारणीने केली आहे आणि त्याना बदलण्याचा अधिकार आहे. नियमानुसार पाहिले तर त्यांना प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ करण्याचा अधिकार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासाप्रती बांधील आहोत. आम्ही कोणालाही बडतर्फ करणार नाहीत. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आमच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कोणताही वाद होवू नये हा आमचा हेतू आहे. आम्हीच पक्ष असल्यामुळे आम्ही कोणताही आकडा सांगत नाही. पण, आता जे आकडे सांगत आहे तो पक्ष नाही असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
-
रुपाली चाकणकर पुन्हा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांची निवडही त्यांनी जाहीर केली.
-
घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही
पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहेत. आमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही याची काळजी घेऊ असे अजित पवार म्हणाले .
-
आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची निवड – अजित पवार
विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते म्हणून निवडतात. ज्याचे संख्याबळ जास्त त्यामधून विरोधी पक्षनेते निवड करतात. बहुतेक आमदार आमच्यासोबत आहोंत. त्यांच्यात संभ्रम निर्माण होण्यासाठी अशी निवड केली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत.
-
राष्ट्रवादीचे विधानसभेचे प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची फेरनिवड
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती, विधिमंडळ नेता म्हणून अजित दादा पवार तर पक्षाने मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.
-
सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
-
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षातून बडतर्फ
शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार यांनी या दोन्ही बड्या नेत्यांना थेट पक्षातून बडतर्फ केलं आहे.
-
मराठी सिनेसृष्टीतील ‘ही’ जोडी करणार शिवसेनेत प्रवेश
ठाण्यातील आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती आज पक्षप्रवेशाचा होणार आहेत. माजी आमदार शिशिर शिंदे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सोबतच ठाकरे गटाचे विलास पारकर देखील प्रवेश करणार आहेत. काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रीदेखील प्रवेश करणार आहेत. हार्दिक जोशी, अक्षया देवधर, अदिती सारंगधर आणि माधव देवचके शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
-
गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरे यांच्या बॅनरला दुग्धाभिषेक
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला नमन करून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. आजच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी नमन करण्यासाठी गर्दी केली. तसंच काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राज ठाकरे यांच्या घराबाहेर असलेल्या बॅनरवर फुलं उधळली. तसंच दुग्धाभिषेक देखील केला. यावेळी मनसेचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. गेल्या 17 वर्षांत ‘एकलो चलो रे’ अशी साहेबांची भूमिका आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि चिखल बघता राज ठाकरे हे आश्वासक चेहरा असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
-
नितेश राणे यांनी शरद पवार यांना काय सल्ला दिला?
राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आहे. सर्वजण एकत्र येती, असा मला विश्वास आहे. जो काही निर्णय झाला तो विचारपूर्वक झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती शरद पवार यांनी करू नये, असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नेते आमच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
-
गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे ‘आनंद आश्रम’मध्ये…
आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. शिंदेंच्या हस्ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी खासदार राहुल शेवाळे, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराजे देसाई, उदय सामंत, संदीपान भुमरे उपस्थित होते.
-
“सकाळी-दुपारी लोक झोपले असताना अजित पवार शपथ घेतात”
सकाळी-दुपारी लोक झोपले असताना अजित पवार शपथ घेतात. भाजपने देशयातलं महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे. पार्टी विथ डिफ्रान्स म्हणणारी पार्टी सत्तेसाठी सर्व काहीही करायला लागली आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. या घटनांचा महाविकास आघाडीवर काही फरक पडणार नाही. अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आम्ही आमची कातडी वाचवण्यासाठी जाणार, हवं तर नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणार, असा टोलाही सावंतांनी लगावला आहे.
-
अजित पवारांच्या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा?; पाहा…
माझ्या सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. या सगळ्या घडामोडींना माझा पाठिंबा आहे असं म्हणून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिथं चुकीचं घडतं त्या विरोधात सातारा उभा राहातो. साताऱ्यातून चांगल्या गोष्टींची सुरुवात होते, असं पवार म्हणालेत.
-
पवारांच्या काटेवाडीतील लोक कुणाच्या बाजूने?
काटेवाडीमधील काहीजणांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दिला तर काहींनी अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका युवकाने शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. मी 20 वर्षांचा आहे पण मी 80 वर्षाच्या युवकासोबत आहे, अशी प्रतिक्रिया त्या तरूणाने दिली आहे. अजित पवार हे युवा आहेत. त्यामुळे त्यांना भविष्य आहे. त्यामुळं ते सत्तेत गेले. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं काही लोकांनी म्हटलं आहे.
-
माझे कार्यकर्ते माझ्यासोबत – शरद पवार
आज देशामध्ये भाजप पार्टी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत.
दोन तीन महिन्यात महाराष्ट्राचं राष्ट्रवादीसाठी चांगलं चित्र दिसेल.
आजचा दिवस हा गुरु पोर्णिमेचा दिवस आहे. आज एखादी गोष्ट सुरु करायची असेल, चव्हाण सा
आज सुरु केलेली मोहिम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने उभी राहिलं. सातारा कोल्हापूरात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे.
या सगळ्या मार्गाने मी जाणार नाही, मी पक्षाच्या बांधणीला पुन्हा निघालोय.
अजित पवार म्हणजे पक्ष नाही.
पत्र पाठवण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक घेतला असेल
जयंत पाटील पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते चांगला निर्णय घेतील
-
चार राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ
चार राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ
निलेश लंके शरद पवारांना भेटल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.
-
शरद पवार महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार
शरद पवार महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार
शिवनेरीपासून ते राजगडापर्यंत शरद पवार हे दौरा करणार आहेत. पवारांची पहिली सभा वळसे पाटलांच्या मतदारसंघात होईल. दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात होईल.
-
कर्नाटकातील पराभवामुळे महाराष्ट्रात फोडाफोडी सुरु – रोहित पवार
कर्नाटकातील पराभवामुळे महाराष्ट्रात फोडाफोडी सुरु – रोहित पवार
मी एक कार्यकर्ता आहे. राज्यातील जनतेला हे सगळं पटलेलं नाही. काल जे काही झालं ते पवारांना पटलेलं नाही. त्यामुळं त्यांनी आज कराडमध्ये येऊन चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली असं रोहित पवार यांनी सांगितलं.
काल ज्यावेळी शपथविधी सुरु होता, त्यावेळी शिंदे गटातील लोकं खुश नव्हते, हे त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत आहे.
कर्नाटक राज्यात जे काही झालं. ते इतर राज्यात होऊ शकतं याची भिती भाजपला आहे. काहीही कधीही होऊ शकतं. शिंदे गटाला पन्नास खोके असे चिडवणारे आता राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यासोबत दिसतील.
पाच तारखेपर्यंत सगळ्यांनी वाट पाहावी. काँग्रेसमध्ये सुध्दा बंडखोरी होण्याची भिती रोहित पवारांनी व्यक्त केली.
कर्नाटकातील पराभवामुळे महाराष्ट्रात फोडाफोडी सुरु झाली आहे.
-
आमदार राजेश नवघरे शरद पवारांसोबत
हिंगोली-वसमत विधान सभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे शरद पवार यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची बैठकीत आमदार राजेश नवघरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिंगोलीच्या राष्ट्रवादी भवनात बैठक संपन्न झाली.
-
५ जुलै रोजी राष्ट्रवादी पक्षाची यशवंत चव्हाण सेंटरला होणार बैठक
५ जुलै रोजी राष्ट्रवादी पक्षाची यशवंत चव्हाण सेंटरला होणार बैठक
-
“अजितदादांमुळेच मी राष्ट्रवादीत; मी दादांसोबतच” राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांचं स्पष्टीकरण
“अजितदादांमुळेच मी राष्ट्रवादीत; मी दादांसोबतच” राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांचं स्पष्टीकरण, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित दादांनी हा निर्णय घेतला आहे. राजकारणातला चिखल साफ करण्यासाठी अजित दादा शिंदे-फडणवीसांसोबत मी आहे. अजित दादांनी जे केलं ते बंड नव्हे जनतेच्या हितासाठी ते भाजपसोबत गेले आहेत असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केलं.
-
अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार
अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.
-
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतली
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे सात ते आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
-
राष्ट्रवादीचा मोठा गट फुटला आहे
राष्ट्रवादीचा मोठा गट फुटला आहे. मागच्यावेळी शिवसेनेचा मोठा गट सुध्दा फुटून आमच्यासोबत आला आहे. शरद पवारांनी सुध्दा असचं राजकारण केलं होतं. सध्याचं सगळं लोकशाहीला सोडून होतं का असंही गिरीश महाराजन म्हणाले.
-
…म्हणून आम्ही शरद पवारांसोबत – बाळासाहेब पाटील
आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे असल्याने शरद पवारांसोबत आहोत. कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी टीव्ही नाईन शी बोलताना प्रतिक्रिया दिली. कराडमधील शरद पवार यांच्या दौऱ्याचं संपूर्ण नियोजन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
-
लवकरच भूमिका घेऊन बाहेर पडू – बाळा नांदगावकर
बाळासाहेबांची प्रतिकृती राज ठाकरे आहे. त्यांना आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो होतो. उद्धव ठाकरे एकत्र यावे, यासाठी मी मागे देखील प्रयत्न केले होते. ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जरी इच्छा असली, तरी साहेब मेळाव्यात भूमिका मांडतील. आता जे काही चालू आहे, ते अनाकलनीय आहे. लोकांना अशा गोष्टी आवडत नाही. महाराष्ट्रात जे काही घडतं आहे, ते कोणत्याच माणसाला आवडलं नाही. आम्ही लवकरच भूमिका घेऊन बाहेर पडू, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
-
अजितदादांमुळेच मी राष्ट्रवादीत; मी दादांसोबतच – रुपाली ठोंबरे
राजकारणातला चिखल साफ करण्यासाठी अजित दादा शिंदे-फडणवीसांसोबत गेले. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित दादांनी हा निर्णय घेतला. अजित दादांनी जे केलं, ते बंड नव्हे. जनतेच्या हितासाठी ते भाजपसोबत गेले, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
-
आमच्या नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य – शंभूराजे देसाई
आमचे जे नेते आहेत, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे. आमचे सर्व आमदार 100 टक्के खुश आहेत. कोणीही आमदार नाराज नाही. ते आमच्याकडे आलेले आहेत, परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे अजिबात नाराजी नाही. आम्हाला शिंदे साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे, असे शंभूराजे म्हणाले.
-
संजय राऊत हा पोपट – शंभूराजे देसाई
संजय राऊत हा पोपट, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. या पोपटाने कितवी चिठ्ठी चुकीची काढली. गेले वर्षभर या पोपटाने अनेक चिठी काढल्या. प्रत्येक चिठी चुकीची निघाली. या पोपटाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे शंभूराजे देसाई म्हणाले.
-
अनिल देशमुख यांचा कराडमध्ये गौप्यस्फोट
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कराड येथे एक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना अनेकांचा फोन आला. आम्हाला माघारी यायचं आहे, असं अनेक आमदारांनी सांगितले असून, दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असं देशमुख यांनी सांगितलं.
-
भाजपचं युज अँड थ्रो सुरुंय – प्रियंका चतुर्वेदी
अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार शिंदे गटातील आमदार करत होते. मग हे आज त्यांच्यासोबत कसे बसले, असा सवाल खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. शिंदे गटातील जे आज मंत्री आहेत, त्यांना संत्री पण होता येणार नाही. भाजपचे राजकारण युज अँड थ्रो असं सुरू आहे. विरोधकांच्या एकजुटीमध्ये अजित पवारांच्या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही, असे प्रियंका चुतर्वेदी म्हणाल्या.
-
महाविकास आघाडी संपलीय – नितेश राणे
प्रफुल पटेल म्हणतात की, लवकरच भूमिका स्पष्ट होईल. महाविकास आघाडी संपलेली आहे. सरकार पडणार आहे. मुख्यमंत्री पडणारे यापेक्षा अंबादास दानवे तुमचा विरोधी पक्षनेता राहतो का ते बघा. पुढच्या अधिवेशनात वरच्या सभागृहात उबाटाचा गट विरोधी पक्ष नेता राहणार नाही. समृद्धी महामार्गवर अपघात झाला म्हणून आमच्या आशिष शेलार यांनी आंदोलन करणं मागे घेतलं आहे, मात्र आदित्य ठाकरे यांनी घेतलं नाही. महाविकास आघाडी सरकारवर अंत्यसंस्कार झालेले आहेत. काल महाविकास आघाडीच्या फोटोला हार घातला आहे. महाविकास आघाडी संपलेली आहे.
-
संजय राऊतांपासून सावध रहा, नितेश राणेंचे पटोलेंना आव्हान
पहिलं ठाकरे यांचं घर संजय राऊत यांनी फोडलं. आता शरद पवारांचं घर देखील फोडायचं काम करत आहेत. आता नेक्स्ट काँग्रेसचे घर फोडायला निघालेले आहेत. मी नाना पटोलेंना आव्हान करेल, तुम्ही संजय राऊत यांच्यापासून सावध रहा. छगन भुजबळ यांनी काल बैठकीमध्ये सांगितले, 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहणार आहेत. शकुनी मामा काय म्हणते याला महत्व नाही.
-
कालच्या शपथविधीवर संजय राऊतने अकलेचे तारे तोडले – नितेश राणे
काल झालेल्या शपथविधीवर सामनामधून संजय राजाराम राऊतने अकलेचे तारे तोडले आहेत. महाराष्ट्राचे चिखलाचे राजकारण कोणी केले आहे. तुम्ही घाणेरड्या राजकारणाची सुरुवात केली. तुम्ही ही नाटकं केली. तुझ्यासारख्या शकुनी मामाने राजकारण केलं आहे. हे लोकांचे घर फोडण्याचं काम करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावण्याचे काम संजय राऊत यांनी केलं आहे, अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
-
पुढचा काळ हा क्राँग्रेसचा – यशोमती ठाकूर
काही दिवसाआधी शिंदे साहेब मविआमधून बाहेर पडले. पण त्यांनी जे कारण सांगितले, तेच कारण आता त्यांच्यासोबत आहेत. पुढचा काळ हा क्राँग्रेसचा आहे. अस लबाडीचं राजकारण चालत नाही. हा खेळ लगेच संपणार आहे. सरकारने निवडणुका लावल्या पाहिजेत. मग बघा लोक कोणाला कल देतात ते. आता शिंदे साहेबांकडे काहीच राहणार नाही. वैचारिक जो पगडा आहे तोच राहिल. ज्यांच्याकडे जास्त आकडे, त्यांचा विरोधीपक्ष नेता असा नियम आहे. नियम कोण मोडणार नाही. हे वास्तविक आहे. तुम्ही कराडला आता पाहिलं असेल. मविआ तुटली असं काही नाही. जे मूळ आहे ते तिकडेच आहेच. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार. काँग्रेस बद्दल बोलण्याचा विखे पाटलांना काही अधिकार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
-
त्यांची चूल विझली आहे हे नक्की झालं आहे – संजय शिरसाट
त्यांची चूल विझली आहे ना, मग आम्ही नवीन चुलीवरती करू किंवा या गॅसवरती करू आमची भाकरी करपणार नाही. आमची भाकरी भाजली जाईल आणि चांगल्या प्रकारे लोकांना चारल्या जाईल, असा टोला संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
-
कार्यकर्ता स्वाभिमान कधी विकत नाही – संजय शिरसाट
मी पहिल्यापासून सांगत होतो, अजित दादा अस्वस्थ आहेत. ते कुठे ना कुठे जातील आणि तो काल त्यांनी निर्णय घेतला. त्यांचे आम्ही स्वागत करतो. राजकारणाच्या वेळेस राजकारण करा, मात्र महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे. जो कोणी बरोबर येईल, त्यांना आम्ही घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे, अशी टिप्पणी संजय शिरसाट यांनी केली आहे.
-
मविआचे मंडळी गेले वर्षभर स्वप्न रंगवत आहेत – विखे पाटील
मविआच्या नेत्यांना आनंद मिळतोय, तो त्यांना घेऊ दे. अडीच वर्ष मुख्यमंत्री घरी होते, फेसबुकवर होते. जनता वाऱ्यावर होती. काही लोकांना सकाळी बोलायची सुपारी दिलीय, अशी टिका विखे पाटील यांनी केली आहे.
-
संजय राऊत ज्योतिषी आहेत का? – प्रवीण दरेकर
हवेत गोळीबार करायचा आणि त्यातून संजय राऊत बोलत आहेत
-
वसंत दादाच्या वेळेला लोकशाही वेगळी होती का? – प्रवीण दरेकर
शरद पवार यांनी आजवर सोयीचे राजकारण केलेय
जे झालं ते महाराष्ट्र पाहत आहे
सरकारच्या माध्यमातून विकास व्हावा
-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा शिवसेना UBT पक्षाला फायदा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेना UBT पक्षाकडेच राहणार
मनीषा कायंदे यांनी शिवसेना UBT पक्षाला अलीकडेच जय महाराष्ट्र करत शिवसेनेत केला होता प्रवेश
यामुळे शिवसेना UBT पक्षाच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या एकने घटली होती
विधान परिषदेत शिवसेना UBT चे 9, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आणि काँग्रेसचे 8 सदस्य होते
राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दाव्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या
काल झालेल्या पक्ष फुटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 विधान परिषद सदस्यांनी अजित पवार यांना समर्थन दिलंय
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) संख्याबळ घटले
-
शब्द बदलू शकतात, अर्थ बदलू शकत नाही – जितेंद्र आव्हाडांचा टोला
शब्द बदलू शकतात, पण त्याचा अर्थ बदलत नाही , असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. अजित पवारांनी गद्दारी केली का, या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला आहे.
आजपासून नवीन लढाई सुरू करणार असल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले. शरद पवार साहेब आता रस्त्यावर आलेले आहेत. जमलेली गर्दी बघून जनसमर्थन कोणाच्या मागे आहे, याची सर्वांनाच कल्पना आली आहे, असेही आव्हाड म्हणाले.
-
शरद पवारांच्या सहमतीनेच अजित पवारांचे बंड – राज ठाकरे
शरद पवार यांच्या सहमतीनेच अजित पवार यांनी हे बंड केले आहे, मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. राजकारणात जे घडतंय त्याबद्दल लोकांच्या मनात अतिशय चीड आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.
-
स्वार्थासाठी वाट्टेल ते सुरू आहे – राज ठाकरेंची टीका
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल असेच जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यासही मला आश्चर्य वाटणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
लवकरच माझा महाराष्ट्र दौरा सुरू होणार, लोकांसमोर मी माझी भूमिका मांडणार आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.
-
सध्याचं राजकारण अतिशय किळसवाणं होतं चाललंय – राज ठाकरे
स्वत:च्या स्वार्थासाठी लोकं वाट्टेल त्या तडजोडी करत आहेत. सध्याच राजकारणा अतिशय किळसवाणं झालेलं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
-
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी अजित पवार सागर बंगल्यावर दाखल
कालच्या शपथविधीनंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे तिघेही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
यावेळी खातेवाटपासंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा होणार असल्याचे समजते. तसेच कायदेशीर बाबींवरही चर्चा करण्याची शक्यता आहे. .
-
राष्ट्रवादीच्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेल यांचा फोटो हटवला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयातून प्रफुल्ल पटेल यांचे फोटो हटवण्यात आले. कालच्या राजकीय नाट्यानंतर पटेल यांचा फोटो काढण्यात आला.
-
संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार – शरद पवार
फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार. महाराष्ट्रात, देशात धार्मिक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे शरद पवार यांनी कऱ्हाड येथे सांगितले. सामान्यांचा लोकशाहीचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न केला जात असून तो जतन केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
-
पुन्हा एकदा जनतेसमोर जाणार – शरद पवार
समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादी जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी कराडमधून सांगितले.
-
सामान्य माणसांचा अधिकार जपला पाहिजे- शरद पवार
यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे, असे शरद पवार यांनी कराडमधून सांगितले.
-
…तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार
अजित पवार यांच्यासह नऊ जण पक्षातून गेले आहे. त्यामुळे ४४ आमदार आमच्यासोबत आहे. परंतु आमच्यापेक्षा जास्त संख्या जर काँग्रेसची झाली तर त्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. यासंदर्भात निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
-
त्या आमदारांवर कारवाई होणार
अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला. त्यामुळे हे सर्व नऊ जण अपात्र ठरत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यासंदर्भातील याचिका विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाखल झाली. हे नऊ जण वगळता सर्व जण शरद पवार यांच्यासोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.
-
शरद पवार यांनी घेतले यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रीतीसंममावर पोहचले. याठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आता थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना ते संबोधित करण्याची शक्यता आहे.
-
शरद पवार प्रीतीसंगमावर दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रीतीसंममावर पोहचले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करुन ते राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. यावेळी प्रीतीसंगमवार कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. शरद पवार यांच्या समर्थनाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.
-
आमदार दिलीप मोहिते अजित पवार यांच्यासोबत
पुणे जिल्ह्यातील खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले….सविस्तर वाचा
-
बाळासाहेब थोरात यांचा दावा, विरोधी पक्षनेता आमचाच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विरोधी पक्षनेता कोण होणार? या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता होणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्यांची संख्या जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता होणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
-
अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गर्दी
एकीकडे शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराडमध्ये पोहचले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर गर्दी झाली आहे. अजित पवार समर्थक आमदार अन् कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहे.
-
थोड्याच वेळात शरद पवार प्रीतीसंगमावर
शरद पवार कराडमध्ये दाखल झाले आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहावर ते पोहचले आहेत. थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर ते पोहचणार आहे. प्रीतीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत.
-
शरद पवार कराडमध्ये दाखल
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार मैदानात उतरले आहे. शरद पवार यांचे कराडकडे जाताना जागोजागी स्वागत होत आहे. कराडमध्ये शरद पवार यांच्या स्वागतसाठी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण पोहचले आहेत.
-
राष्ट्रवादीच्या याचिकेवर योग्य निर्णय घेईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्याकडे याचिका केली आहे. आमदारांना अपात्र करण्यासाठीची ही याचिका आहे. तिचा अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राहुल नार्वेकर हे मीडियाशी बोलत होते.
-
Sharad Pawar NCP | शरद पवार दाखवत नसतील, पण कालच्या बंडात त्यांना बसलाय एक मोठा झटका
Sharad Pawar NCP | टीका पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. शरद पवारांवर आजवरच्या राजकीय कारकिर्दीत अनेक गंभीर आरोप झाले. पण त्यांनी कधी संयम सोडून उत्तर दिलं नाही. वाचा सविस्तर…..
-
Ajit Pawar | अजित पवार यांच्या बंडामुळे भाजपाला लोकसभेच्या इतक्या जागांवर होणार फायदा, समजून घ्या BJP ची स्ट्रॅटेजी
Ajit Pawar | एकनाथ शिंदे भाजपासोबत आल्यानंतर म्हणावा तितका परिणाम होत नव्हता. म्हणजे फायदा दिसत नव्हता. मागच्या महिन्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली होती. वाचा सविस्तर….
-
NCP Sharad Pawar | शरद पवार यांचा आजचा दिवसभरातील कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या
NCP Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला आहे. पुढचे काही दिवस त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटलेले दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रीय झाले आहेत. आजपासून त्यांचा दौरा सुरु होईल. वाचा सविस्तर….
-
अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजही त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या देवगिरी या बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे. अजित पवार या कार्यकर्त्यांना थोड्यावेळात भेटण्याची शक्यता आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितल्यानंतर राष्ट्रवादीने आता निवडणूक आयोगात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून चिन्ह आणि पक्षावर दावा सांगणार आहेत. त्यामुळे आता अजित पवार काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचा विरोधी पक्षनेता तावडे ठरवणार आहेत. मंत्री मनसुख मंडवीय आणि विनोद तावडे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते कर्नाटकात जाऊन आमदारांशी चर्चा करून विरोधी पक्षनेता ठरवणार आहे.
-
शरद पवार साताऱ्यात दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात पोहोचले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी कोण आला रे कोण आला… शरद पवार आगे बढो… अशा घोषणा देण्यात आल्या.
-
शिंदे सरकारमधील नवे मंत्री शरद पवार यांची भेट घेणार?
शिंदे सरकारमध्ये काल मंत्रिपदाची शपथ घेतलेले नवे मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागणार आहे. या मंत्र्यांची आजच शरद पवार यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवार यांच्यासोबत बंड केलेल्या या मंत्र्यांना शरद पवार भेट देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
शरद पवार कराडच्या दिशेने, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कराडच्या दिशेने रवाना झाले आहेत. कराडला जाऊन ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर एका कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत. या निमित्ताने पवार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
-
शपथ घेतलेल्या नऊ सदस्यांना पक्षाने बजावली नोटीस – जयंत पाटील
ज्या नऊ आमदारांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे. ती त्यांची कृती बेकायदेशीर आहे. शरद पवार यांना पूर्ण अंधारात ठेवून ही शपथ घेतली आहे अशी तक्रार केली. डिसीप्लेन कमिटी आहे. त्यांनी विचार विनिमय करून नोंद घेतली. त्यांच्या सूचनेवरून DIS QUALIFY नोटीस ई मेलवरून पाठविण्यात आली आहे. ही नोटीस त्यांना व्हाट्सअँपवर पाठविली आहे. तसेच हि नोटीस त्यांना प्रत्यक्ष जाऊन देणार आहे. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. नऊ आमदार म्हणून पक्ष होऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
-
नव्या उमेदीने संघटना उभी करायची आहे – सुप्रिया सुळे
संघर्ष कसा करायचा असा प्रश्न समोर आला त्याची एक अपॉर्च्युनिटी कशी करायची आणि संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा घेतली. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो आणि त्याच्यातून उमेदीने संघटना उभी करायची असते. दादा आयुष्यभर मोठा भाऊ राहील. त्यांच्याबद्दल पवार साहेब सविस्तर सकाळी बोललेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले दोन अडीच दशक काम करते. पवार साहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं. त्या बाकीच्यांनीही आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिले आहे. अर्थातच ती आम्हाला वेदना देणारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटना, संघटनेच्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीने संघटना उभी करणे आणि पुढे जाऊन महाराष्ट्राच्या देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम करणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
-
दादा यांच्याशी वाद घालणार नाही – सुप्रिया सुळे
दादा माझा मोठा भाऊ त्याच्यामुळे अर्थातच दादाची मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणार नाही. जेव्हा दादाचं माझं नातं जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतात तेव्हा मी प्रोफेशनल मोडमध्ये येते. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते
-
आजची घटना वेदनादायी – सुप्रिया सुळे
पवार साहेब यांनी सर्विस्तर बोलले आहेत. सगळं काही एका दिवसात बोलणे शकय होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब आहे. पवार साहेब हे त्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सगळ्यांना मुलासारखे प्रेम दिले आहे. त्यामुळे आजची घटना ही सर्वाना वेदना देणारी आहे.
-
खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात दाखल
खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाल्या आहेत. सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.
-
संपूर्ण पक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे : जयंत पाटील
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज त्यांनी आमदारांची गाठ घेतली आणि राजभवणावर जाऊन शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. संपूर्ण पक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी मी इथे आहे. काही सदस्यांनी स्वतःहून मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतल्याच दिसतंय. पक्षाच्या मान्यतेशीवाय त्यांनी हे केलेलं आहे. मी विधिमंडळाचा गटनेता या नात्याने मी ठामपणे सांगतो सर्व कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत आहेत.. मला खात्री आहे आज जो शपथविधी झालाय त्याला ज्या सदस्यांनी हजेरी लावलीय. त्यापैकी काहीजण म्हणत होते की आम्ही गोंधलेलेलो होतो अस सांगत आहेत.
काहीजण माझ्याशी बोलले होते काहीजण पवार साहेबांशी बोलले होते मात्र जे घडलं त्याला पवार साहेबांचा पाठिंबा नाही हे आता स्पष्ट झालंय.
5 तारखेला राज्यातील सर्व पदाधिकारी दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर असतील. त्यांना निमंत्रित करण्यात आलेल आहे. वाय बी चव्हाण सेंटरला ही बैठक होईल. या बैठकीत शरद पवार हे स्वतः भूमिका मांडतील. पक्षाचा राज्यस्तरावरचे सर्व प्रतिनिधी, जिल्हा तालुक्यातील सर्व पदाधिकारी 5 तारखेला ही महत्त्वाची बैठलं आहे..
-
राहुल गांधी यांचा शरद पवार यांना फोन, काँग्रेस सोबत असल्याचं आश्वासन
मुंबई :
राहुल गांधी यांचा शरद पवार यांना फोन, काँग्रेस सोबत असल्याचं आश्वासन
शरद पवारांना आतापर्यंत ‘या’ राष्ट्रीय नेत्यांचे फोन
एम के स्टॅलिन ( मुख्यमंत्री)
राहुल गांधी
नितीश कुमार ( मुख्यमंत्री)
ममता बँनर्जी, (मुख्यमंत्री)
अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री)
मल्लिकार्जुन खर्गे
-
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, ‘या’ नेत्यांवर सडकून निशाणा साधला
आदित्य ठाकरे ट्विटरवर नेमकं काय म्हणाले? वाचा…
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 2, 2023
-
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर उद्धव ठाकरे यांची अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया
मुंबई :
अजित पवार यांच्या शपथविधीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली
‘नांदा सौख्यभरे’, असा दोन शब्दांत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली
-
जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद, अजित पवार यांच्यावर निशाणा
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
माझे व्हीप त्यांना बंधनकारक राहतील अवघड स्थितीकडे संधी म्हणून बघू शरद पवारांनी इतकी पदं देऊनही आमदार बाहेर पडले या वयात बापाला अशा परिस्थिती आणणं योग्य नाही अनेकांचे नातेवाईक फोन करुन सांगत आहेत की, आम्ही त्यांना समजावतोय सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही
-
जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती
मुंबई :
सूत्रांकडून महत्त्वाची माहिती, जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती
पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती
-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला काय आवाहन कराल? शरद पवार म्हणतात…
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
माझा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर प्रखर विश्वास आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते सगळे अस्वस्थ झाले असतील हे खरं आहे. कारण जे कष्ट करतात, आम्हाला लोकांना निवडून देतात, आम्ही सांगतो ती भूमिका मांडतात आणि काही लोक विरोधी संघर्षाची भूमिका घेतात, ज्यांची संघर्षाची आणि विरोधाची भूमिका घेतली आज त्यांच्यामध्येच आम्ही सहभागी झालो तर कार्यकर्ते अस्वस्थ होणार. यामध्ये त्यांचा दोष नाही. पण त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटनेची बांधणी करायचं काम करावं लागेल. हे काम मी आणि संघटनेचे असंख्य तरुण माझ्याबरोबर करतील याची मला पूर्ण खात्री आहे.
-
पक्ष फुटला, घर फुटले असे अजिबात वाटत नाही – शरद पवार
पक्ष फुटला, घर फुटले असे मला अजिबात वाटत नाही. हा प्रश्न घराचा नाही. जनतेचा प्रश्न आहे आणि तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. काही अडचणी असतील तर ते चर्चमधून सोडवू असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
-
शिवसेनेसोबत जाऊ शकतो, मग भाजपसोबत का नाही? अजित पवारांच्या भूमिकेवर शरद पवार म्हणतात…
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
असा त्यांचा निकाल असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी नीती आहे त्यामध्ये या गोष्टी पटणाऱ्या नाहीत.
विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार ते आताच सांगू शकत नाही. कारण राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करायची असेल तर हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यांचा निर्णय मी घेऊ शकत नाही. पण मी पक्षप्रमुख बोलून तीन-चार दिवसात असिस्ट करु. महाविकास आघाडीत चर्चा करुन ठरवू. आता आम्हाला ते सांगता येणार नाही.
-
काही आमदार पुन्हा परत येतील – शरद पवार
काही आमदार नाराज आहेत ते पुन्हा परत येणार. आमची भूमिका वेगळी आहे असे काही आमदार म्हणाले. ते येत्या दोन दिवसात येऊन भेटणार आहेत. आजच्या शपथविधीवरून पक्षात नाराजी आहे. जे पक्ष चौकटीबाहेर जातील आणि बाहेर गेले. त्या प्रत्येकाबाबत निर्णय घेऊ.
-
अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला ते तुम्हाला माहिती होतं का? शरद पवार म्हणतात…
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
दोन विषय आहेत, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला ही माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली. कारण आमच्याकडे राजीनामा दिलेला नाही. कदाचित राजीनामा द्यायचा असेल तर तो द्यायचं ठिकाण अध्यक्षांकडे आहे. तो राजीनामा बहुतेक विधानसभा अध्यक्षांकडे गेला असेल. तो आम्हाला कळण्याचं कारण नाही. तो दिला असेल. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही.
पक्षाचं नाव घेऊन कुणी काहीही भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही काही भाष्य करणार नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊ, लोकांचा पाठींबा, लोकांची भूमिका ही आमच्या विचार, धोरणांसोबत कशी राहील यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
-
पूर्ण महाराष्ट्रात फिरून अस्वस्थता दूर करणार – शरद पवार
विरोधी पक्षनेते कोण असावेत याचा निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेत असतात. याचा संख्येबळावर आधाराची हा निर्णय असतो. त्यामुळे तो काँग्रेसचा असू शक्ती किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा किंवा राष्ट्रवादीसोबत असलेला कुणीही होऊ शकेल. ज्याचा विरोधात संघर्षाची भूमिका घेतली त्यांच्यासोबत काहींजण गेले त्यामुळे अस्वस्थता पसरणार हे नक्की पण, पूर्ण महाराष्ट्रात फिरून ही अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार – शरद पवार
-
शरद पवार यांचे आता एककलमी सूत्र काय ? म्हणाले…
१९८० जे चित्र दिसले तेच चित्र पुन्हा कसे उभे राहील हेच माझे आता एककलमी सूत्र असेल. महाराष्ट्रात जिथे जाता येईल तिथे जाणार. आमची संख्या वाढविणार. देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन येत आहेत. या वेळी आम्ही एक आहोत. आमची साथ आहोत अशी भूमिका मांडत आहेत. पर्यायी शक्ती उभी करावी असे म्हणणारे आहेत ते सोबत आहेत त्यामुळे चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे.
-
शरद पवार यांची पहिली जाहीर कबुली, अजित पवार यांनी पक्ष फोडला.
आधीही अनेक आमदार पक्ष सोडून गेले होते. नेत्यांना भ्र्ष्टाचारी आरोपातून मुक्त केले याबद्दल आभार. अजित पवार यांनी पक्ष फोडला. अजित पवार यांनी राजीनामा दिला याची मला माहिती नव्हती. कुणी काहीही दावा केला असला तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू. उद्या कराडला प्रीतीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे.
-
शरद पवार यांची पत्रकार परिषद, स्पष्ट भूमिका मांडली
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांची विधानं होतं. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारची लँड याचा उल्लेख केला. त्याबरोबर सिंचनशी संबंधित काही तक्रार होती त्याबाबत उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा उल्लेख केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली.
याचा अर्थ त्यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.
प्रश्न आता दुसरा आहे की, आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्या विरोधात भूमिका घेतली. उद्या 6 तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. संघटनात्मक बदल संबंधिचे प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्याचा विचार मी करत होतो. पण प्रश्न उपस्थित केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत, अशाप्रकारची भूमिका त्यांनी मांडली.
माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातील विधीमंडळाचे काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधिचं चित्र आणखी दोन-तीन दिवसात लोकांसमोर येईल. याचं कारण ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. पण याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही. कारण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच त्यांनी जनतेच्या समोर मांडण्याची गरज आहे. ते त्यांनी मांडलं तर त्याबाबत वाद नसेल. मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन
आता प्रश्न राहिला, पक्षाच्या भवितव्याबाबतचा. हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतंय की १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृ्त्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे माझा पक्ष सोडून गेलो. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यात दिसलं की आमची संख्या ६९ वर गेली. म्हणजे संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी तीन ते चार जण सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळे १९८० ला चित्र दिसलं ते चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर कसं उभं करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम राहील.
महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर आणि तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला आठवत असेल कालची जी निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा असंच चित्र होतं. पण संबंध महाराष्ट्रात जिथे जाता येईल तिथे जाणं आपली भूमिका मांडणं हे काम केलं. त्याचा परिणाम आमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि आम्हाला यश आलं. संयुक्त सरकार आम्ही स्थापन केलं.
आज पुन्हा तीच स्थिती आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यातून मला अनेकांचे फोन येतात. या सगळ्या स्थितीत आपण सगळे एक आहोत. आमची तुम्हाला साथ आहे, अशी मतं सगळे मांडत आहेत. मला आताच इथे येण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांचा फोन आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून माहिती मिळाली.
आम्ही सगळे सोबत आहे असं म्हणाऱ्याचं एक पर्यायी शक्ती उभी करावी, अशी भूमिका आहे. त्यामुळे जो काही प्रकार घडला त्याची मला चिंता नाही. आजचा दिवस संपला. उद्या मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या कराडला दलित समाजाच्या बांधवाचा मेळावा घेणार आहे. त्यानंतर राज्यात जेवढं जाता येईल तेवढा प्रयत्न केला जाईल.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केलाय. तुमचं काय म्हणणं आहे?
माझं काहीच म्हणणं नाही. कुणी काहीही दावा करावा. माझा लोकांवर विश्वास आहे. राष्ट्रवादी पक्ष आला कसा? राष्ट्रवादी हा पक्ष नव्हताच. आम्हाल लोकांचे काँग्रेस पक्षासोबत मतभेद झाले. त्यानंतर आम्ही हा पक्ष स्थापन केला. पहिला हा पक्ष दुसऱ्याने नेला असेल त्याचा आमच्यावर परिणाम झालेला नाही. कुणी काहीही म्हणो आम्ही लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडू. त्या भूमिकेला त्यांचा पाठींबा कसा मिळेल याची काळजी घेऊ.
-
आधी आरोप आणि आता मंत्री मंडळात स्थान दिले – शरद पवार
शरद पवार यांची पत्रकार परिषद
पंतप्रधान मोदी यांचे मानले आभार, म्हणाले आधी आरोप आणि आता मंत्री मंडळात स्थान दिले.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे असा आरोप केला. आज आनंद आहे की आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सहकाऱ्यांना घेतले. यामुळे त्यांनी जे आरोप केले त्यात वास्तव नव्हते हे स्पष्ट होते. त्या सगळ्या आरोपातून त्या सगळ्यांना मुक्त केले त्याबद्दल आभारी आहे, असे शरद पवार म्हणाले.
-
‘मला विरोधातला एक तरी नेता दाखवा जो…,’ अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण पाहिलं, एका नेत्याच्या नेतृत्वात देश पुढे जातो. सुरुवातीला परिस्थिती वेगळी होती. पंडित जवारलाल नेहरु यांच्या नेतृत्वात देश काम करत होता तेव्हा सरदार वल्लभाई पटेल आणि इतरांनी मिळून देश चालवला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व आलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांचं नेतृत्व आलं. आणीबाणीच्या वेळी आपल्या देशाने त्यांचा पराभव केला होता. त्या स्वत: हरल्या होत्या. जी खिचडी झाली होती त्यांचं सरकार आलं. पण नंतर परत इंदिरा गांधी यांचं सरकार आलं.
१९८४ नंतर आपल्या देशात कोणताही एक असा नेता ज्याच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, असं झालं नाही. वेगवेगळ्या गटांना एकत्र करुन देश चालवण्याचा प्रयत्न केला गेला. पण गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश काम करत आहे. मोदी विदेशातही प्रसिद्ध आहेत. त्यांना विदेशातही पाठिंबा देतात आणि त्यांचं कौतुक करतात. त्यांचं चांगलं प्रकारे काम सुरु आहे.
देशात वंदे भारत ट्रेन, नॅशनल हायवे यांचं जे काम चालूय ते चांगलं आहे. विरोधक फक्त आपापल्या राज्याचं पाहतात. मला विरोधातला एक तरी नेता दाखवा जो देशाचा विचार करुन राज्याचं काम करेल. मला असा नेते कुठेही बघायला मिळाला नाही.
देशाची एवढी मोठी लोकसंख्या असताना आम्हाला सगळ्यांना वाटलं की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लोकसभा आणि इतर निवडणुका सहकारी पक्षाच्या नात्याने, जसे आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत होतो तसं भाजपसोबत राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आमचे स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. पण देश आणि राज्याच्या निवडणुकीत आम्ही एकत्र जाऊ इच्छितो. देश आणखी मजबूत व्हायला हवा आणि पुढे जायला हवा. सगळ्यांनी एकजुटीने सामना केला पाहिजे. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. पक्षाचे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आम्ही तरुणांना संधी मिळावी यासाठी आदिती तटकरे यांनी संधी दिली.
मला आठवतं, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आम्ही १९९९च्या वेळी निवडणूक लढवली होती तेव्हा आम्ही सगळे तरुण होतो. मी, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे असं आम्हा सगळ्या युवांना संधी मिळाली होती. तसंच आता संजय बनसोडे भाऊ, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील अशा नव्या लोकांना आम्ही संधी दिली आहे. अल्पसंख्याक, महिला, ओबीसी, अशा वेगवेगळ्यांना जास्त संधी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही संधी दिली आहे. आम्ही इतर लोकांनाही संधी देण्यासाठी प्रयत्न करु.
आमच्याकडे सर्व आकडा आहे. आमच्याबरोबर सर्व आमदार आहेत. तुम्ही काळजी करु नका. आकडा सांगायला काही मटक्याचा आकडा आपल्याला काढायचा नाही. त्यामुळे तुम्ही तो विचार करु नका. सगळे आमच्यासोबत आहेत. पक्ष आमच्यासोबत आहे. आम्ही सर्वांना सांगितलं, वरिष्ठांनाही सांगितलं.
लोकशाहीत बहुमताला महत्त्व दिलं जातं ही आतापर्यंतची परंपरा आहे. त्या पद्धतीने पाठिमागच्या काळातही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून बाजूला आली. त्यावेळेस छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी साथ दिली आणि पक्ष पुढे गेला. त्यानंतर पक्षाने वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेतले. २४ वर्षांत बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता महाराष्ट्रातील प्रश्न सुटले पाहजेत आणि नवं नेतृत्व पुढे आलं पाहिजे.
सरकार चालू असताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत हे आम्ही बघू. महाराष्ट्रात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले आहेत. सगळ्यांनी प्रयत्न करुन बघितलं आहे. त्यामुळे काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन सरकार बनवलं जातं. हे १९९० पासून होत आलेलं आहे.
-
छगन भुजबळ म्हाणाले, आमचा अजित पवार यांना पाठिंबा
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांच्या मनोगताशी आम्ही सगळे सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. काही जणांचा गैरसमज आहे की, आम्ही पक्ष सोडलाय. तर तसं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सामील झालो आहोत. आम्ही सर्वांनी जो निर्णय घेतलाय, तो शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी घेतला. आपल्याला सकारात्मक विचाराने काम करणं गरजेचं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. पण हे नाकारता येत नाही की, त्यांच्या नेतृत्वात मजबुतीने काम सुरु आहे. विकासाच्या नावाने चांगलं काम सुरु आहे. ओबीसींचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय सूटणार नाहीत.
पाटणाला जी बैठक झाली. त्यानंतर एकमेकांवर रागावणं सुरु आहे. विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. शरद पवार यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं की, येत्या २०२४ निवडणुकीत देशात मोदी सरकारच येणार. त्यामुळे आम्ही सरकारला मदत केली पाहिजे. उगाच भांडून प्रश्न सुटणार नाहीत. याउलट शासनात जाऊन प्रश्न मिटवले पाहिजेत.
आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरुन हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
-
नाव न घेता अजित पवारांच शरद पवार यांना आव्हान
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर लढवणार आहोत. आम्हाला सगळ्यांचा आशिर्वाद आहे असं महत्वाच विधान अजित पवार यांनी केलय. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून शरद पवार यांना आव्हान दिलं आहे.
-
नेतृत्वाबद्दल अजित पवार काय म्हणाले?
आमच्याबरोबर सगळे आमदार आहेत. काळजी करु नका. पक्ष आमच्यासोबत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. ही आजपर्यंतची परंपरा आहे. 24 वर्षात बरच पाणी वाहून गेलय. नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
-
देशाचा विचार करणारा विरोधी पक्षातला एक नेता दाखवा – अजित पवार
विरोधी पक्षातला एक नेता मला दाखवा जो देशाचा विचार करतोय. प्रत्येकजण आपआपल्या राज्यापुरता विचार करतोय. राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकीत एकत्र लढणार. जिल्हा पातळीवर स्थानिक निवडणुकीत जिल्हास्तरीय नेते निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.
-
आमच्या सर्वांचा अजित पवार यांना पाठिंबा – छगन भुजबळ
आमच्या सर्वांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारमध्ये सहभागी झालो. खटले अंगावर आहेत, म्हणून सरकारमध्ये सहभागी झालेलो नाही. अजितदादांसोबत आलेल्या कुणावरही केसेस नाही असं छगन भुजबळ म्हणाले.
-
CHAGAN BHUJBAL LIVE – अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतल्यानंतर भुजबळ म्हणतात
आमचा अजित पवार यांना पाठिंबा – छगन भुजबळ
जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारमध्ये सहभागी – छगन भुजबळ
आमच्यातील अनेक नेत्यांवर केसेस नाहीत – छगन भुजबळ
-
पक्ष आणि चिन्हाबद्दल अजित पवार यांचं महत्वाच विधान
राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं अजित पवार म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असं अजित पवार म्हणाले.
-
AJIT PAWAR – LIVE शपथविधीनंतर अजित पवार यांनी मांडली ही भूमिका
देशाला मजबूत नेतृत्वाची गरज – अजित पवार
वर्धापनदिनी आम्ही आमची भूमिका मांडली – अजित पवार
केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळवून देणार – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी – अजित पवार
राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदार माझ्यासोबत – अजित पवार
राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार – अजित पवार
जिल्हा परिषद. पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद निवडणूक एकत्र लढवणार – अजित पवार
-
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजित पवार यांच्याकडे येणार – सुत्रांची माहिती
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजित पवार यांच्याकडे येणार, अर्थमंत्रीपद मिळणार – सुत्रांची माहिती
-
शपथविधीनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. त्यात सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार. देशाची, राज्याची परिस्थिती याचा विचार करता विकासाला महत्व दिलं गेलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्ष कारभार सुरु आहे. ते मजबुतीने देशाला पुढे घेऊन जात आहेत. आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे असं अजित पवार म्हणाले.
Published On - Jul 04,2023 7:25 AM