घडामोडी वाढल्या, अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘सागर’ बंगल्यावर दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

घडामोडी वाढल्या, अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर दाखल
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 8:56 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात जावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. विरोधकांच्या शिष्टमंडळाने आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडे यांनी मंत्रालयात जावून अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांनंतर ते आज पहिल्यांदाच अजित पवार यांना अशाप्रकारे प्रत्यक्षपणे भेटले. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं. या भेटीत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात एक तास चर्चा झाली. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या भेटीनंतर आपल्या खात्याबाबत घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा केली, असं सांगितलं. या भेटीत संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं. तसेच त्यांनी सर्व आरोप फेटाळले. पण त्यांच्या या भेटीनंतर आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी जावून भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाकडून केली जात आहे. याबाबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आजच्या बैठकीत निर्णय होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

हे सुद्धा वाचा

‘पुरावा नाही तोपर्यंत कारवाई नाही’, अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती

सूत्रांकडून अजित पवार यांच्या भूमिकेबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. “जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार”, अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.