दादांच्या दरबारी पुण्याचा वाद पेटणार की सुटणार? धाराशीवमध्ये ही डोकेदुखी वाढणार

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. पुण्यात रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात वाद सुरु आहे तर तिकडे धाराशीव आणि मावळमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य पाहायला मिळतेय. पाहुयात यासंदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट

दादांच्या दरबारी पुण्याचा वाद पेटणार की सुटणार? धाराशीवमध्ये ही डोकेदुखी वाढणार
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 10:25 PM

अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील दोन लाडक्या बहिणी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं रुपाली ठोंबरेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षात सर्वांना समान संधी देण्याची मागणी करत रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकरांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे. रुपाली चाकणकरांना दिलेल्या पदानंतर पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. रुपाली चाकणकरांना दिलेल्या पदानंतर रुपाली ठोंबरे नाराज आहेत. रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकरांनी अजित पवारांची भेट घेत 1 तास चर्चा केली.

रुपाली चाकणकरांना पद दिल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकाऱी नाराज आहेत. त्यामुळे जवळपास 1 हजार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान पुण्यातील हा वाद अजित पवारांनी सोडवावा अशी विनंती रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकरांनी केली. रुपाली ठोंबरे आणि मानकरांनंतर रुपाली चाकणकर यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली. रुपाली ठोंबरेच नव्हे तर अजित पवारांचे जिल्हाध्यक्ष दीपक मानकरही नाराज आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये निवड न झाल्यानं मानकरही नाराज आहेत. अजित पवारांनी रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकरांची समजूत काढली. तुमच्या नावाचा पुढे विचार केला जाईल असं आश्वासन अजित पवारांना दोघांना दिल्याची माहिती आहे. पक्षासाठी काम करा पुन्हा सरकार आणायचंय. अशा देखील सूचना दोन्ही नेत्यांना अजित पवारांनी दिल्या आहेत. त्यामुळे दादांच्या दरबारी पुण्याचा वाद पेटणार की सुटणार?, याकडे आता लक्ष आहे

फक्त पुण्यातच नव्हे तर धाराशीवमध्ये देखील अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अजितदादांचे विधानपरिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळेंनी आयात उमेदवारावरुन पक्षश्रेष्ठींना इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आयात केलेल्या उमेदवारामुळेच पराभव झाल्याचा दावाही काळेंनी केलाय. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांविरोधात भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली होती. दरम्यान या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी अर्चना पाटील यांचा पराभव केला होता.

मावळमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळतेय. अजित पवारांचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडेंनी महामंडळ नाकारलं असून ते विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान बापू भेगडेंनी घेतलेल्या निर्णयानंतर दादांचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी देखील भेगडेंना इशारा दिलाय.

मावळमध्ये सुनील शेळकेंना पक्षातूनच नव्हे तर भाजपमधून देखील विरोध आहे. राष्ट्रवादीच्या बापू भेगडेंनी सुनील शेळकेंविरोधात दंड थोपटले असून ते निवडणूक लढवण्याव ठाम आहेत. दरम्यान मावळमधून काही दिवसांपूर्वी भाजप नेते बाळा भेगडेंनी देखील सुनील शेळकेंना विरोध केला होता. बाळा भेगडेंनी मावळ मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी केली होती. भाजपला मावळची जागा न सोडल्यास बंडखोरीचे संकेत बाळा भेगडेंनी दिले होते. त्यामुळे सुनील शेळकेंनी आज सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

पारनेरमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पारनरेमधील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात येत नाराजी व्यक्त केली. पारनेर मतदारसंघात सुजीत झावरे किंवा लांबखडेंना सोडून दुसरा उमेदवार देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आपल्याच पक्षात सुरु असलेल्या नाराजीनाट्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात अजित पवारांना पक्षातील अंतर्गत वाद सोडवावा लागेल. अन्यथा याचा फटका दादांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत बसल्याशिवाय राहणार नाही.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.