4 मंत्री, 9 आमदार यांचं विधानसभेचं तिकीटचं धोक्यात? अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाची वाढली धाकधूक

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याविरोधात भाजप, शिवसेना असा सामना होता. या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली. मात्र...

4 मंत्री, 9 आमदार यांचं विधानसभेचं तिकीटचं धोक्यात? अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाची वाढली धाकधूक
CM EKNATH SHINDEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 10:00 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाला हादरा बसणार अशा चर्चा सुरु झाल्या. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार त्यामुळेच अजित पवार यांना आपल्याकडे खेचून देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळली अशीही आणखी एक चर्चा सुरु होती. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याविरोधात भाजप, शिवसेना असा सामना होता. या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेचे आमदार निवडून आले होते.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांनी आगामी निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि भाजपच्या सोबतीने लढविण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, आपल्या समर्थक आमदारांचे संख्याबळ वाढविण्यावर अजित पवार यांचा भर असणार आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या जागांवर नेमका दावा कोण सांगणार हा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटाच्या विद्यमान तेरा आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कोण आहेत ते तेरा आमदार?

मतदारसंघशिवसेना उमेदवारमिळालेली मते राष्ट्रवादीचे उमेदवारमिळालेली मते
पाटण शंभूराज देसाई106266सत्यजित पाटणकर92091
पैठणसंदीपान भुमरे83403 दत्तात्रय गोरडे69264
परांडातानाजी सावंत106674 राहुल मोटे73772
रत्नागिरी उदय सामंत118484 सुदेश मयेकर31149
कोरेगाव महेश शिंदे101487शशिकांत शिंदे95255
एरंडोल चिमणराव पाटील82650अण्णासाहेब पाटील64648
चोपडा लताबाई सोनवणे78137जगदीश्चंद्र वळवी57608
वैजापूर रमेश बोरनारे98183अभय पाटील39020
नांदगाव सुहास कांदे85275पंकज भुजबळ71386
कुर्ला मंगेश कुडाळकर55049मिलिंद कांबळे34036
कर्जत महेंद्र थोरवे102208सुरेश भाऊ लाड84162
दापोली योगेश कदम95364संजय कदम81786
राधानगरी प्रकाश आबीटकर105881के. पी. पाटील87451
Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....