Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो; अजितदादांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (ajit pawar on coronavirus in baramati program)

मग तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो; अजितदादांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 5:55 PM

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी जोरदार बॅटिंग केली. कार्यकर्त्यांचे कान उपटतानाच त्यांना फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. शिवाय राष्ट्रवादीला नंबर वनचा पक्ष करण्यासाठी कंबर कसून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. (ajit pawar on coronavirus in baramati program)

अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना कोरोनापासून सावध राहण्याच्या सूचना केल्या. अजूनही कोरोनाबद्दल काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तुम्हाला स्पष्ट ऐकता यावं यासाठी मी मास्क काढलाय. भाषण झालं की पुन्हा मास्क घालणार. तुम्हीही सर्वजण दक्षता घ्या. परदेशात सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आपणही दक्षता घेण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे कोरोनाचं प्रमाण कमी झालंय. त्याचं सर्व श्रेय कोरोना योद्ध्यांचं आहे, असं सांगतानाच नाव चुकल्यामुळे मी जरा चिडलो. काम चांगलं झालं की बरं वाटतं. नाहीतर चिडावं लागतं. तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो, असं अजित पवार म्हणाले. पवार यांनी हे भाष्य करताच उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

चक्की पिसींग ॲन्ड पिसिंग

काहीजण माझ्याजवळ येतात. फोटो काढतात. आताच दादांना भेटलो. चल तुझं काम करून देतो म्हणतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. कोणी असं करत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देतानाच कोणत्याही एखाद्या योजनेसाठी कोणी पैसे मागत असेल तर लगेच सांगा, बघतो त्याच्याकडे, असा सज्जड दमही अजितदादांनी भरला. पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा फायदा सर्वतोपरी होण्यासाठी प्रयत्न करावा. जनतेला या योजनेचा लाभ मिळू द्या. कोणाकडे पैसे मागू नका. असं काही निदर्शनास आलं तर जेलची हवा खावी लागेल. चक्की पिसींग ॲन्ड पिसिंग, असा दमच अजितदादांनी भरताच त्यावरही एकच हशा पिकला.

विकास काम थांबणार नाही

महाविकास आघाडीचं सरकार येऊन एक वर्षाहून अधिक काळ झालाय. कोणतंही विकास काम थांबलेलं नाही आणि थांबणार नाही. यावरच लक्ष देण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या आरोग्यासाठी अनेक निर्णय घेतले. जनतेच्या हितासाठीच आम्ही काम करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

जित्राब लय वाईट

तुम्ही सर्वजण साथ देत आहात म्हणून आम्ही कार्यरत आहोत. दररोज उजाडण्यापूर्वी काम सुरू करतो. तुम्ही म्हणाल तर रात्रीही काम करतो. बारामतीत अनेक विकासकामे सुरू आहेत. चुकीचं काम दिसलं त्यामुळे सर्वांना झापलं, असं सांगातानाच काहीजण जाणीवपूर्वक विरोध करतात… तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही… जित्राब लय वाईट… कुणी काही बोललं की तुम्ही डिपॉझिट जप्त करुन परत पाठवता.. असा टोलाही त्यांनी लगावला.

साहेब ऐंशीत, मी साठीत, सुप्रिया पन्नाशीत

साहेब ऐंशी वर्षांचे झाले… मी साठीत आलो… सुप्रिया पन्नाशीत… पण वय वाढतंय तसं आमचा काम करण्याचा उत्साह वाढतोय… तुमच्यासाठी असंच कार्यरत राहून राज्यातील पहिला क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून बारामती बनवू एवढीच ग्वाही देतो, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. छोट्या योजनांचा लाभ घेतला तर त्याचे कर्जही फेडा. तुम्ही पैसे भरले तर इतरांनाही त्या योजनेचा लाभ घेता येतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच उस्मानाबाद, सिंधुदुर्ग आणि पुणे महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar on coronavirus in baramati program)

संबंधित बातम्या:

…तर ते कोकणात इतर कामे करत बसले असते, गुलाबराव पाटलांचा राणेंवर घणाघात

तात्याराव लहानेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, दरेकर म्हणाले…

‘त्या’ भगिनीला काय सांगू; इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम; जयंत पाटलांचा थेट मोदींवर निशाणा

(ajit pawar on coronavirus in baramati program)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.