अजित पवार गटाची धाकधूक वाढवणारी बातमी, बडा नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षात इनकमिंग होणार असल्याची विधानं अनेकदा केली आहेत. काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. तर शनिवारी पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यानंतर आणखी एका बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेतली आहे.

अजित पवार गटाची धाकधूक वाढवणारी बातमी, बडा नेत्याने घेतली शरद पवारांची भेट
शरद पवार आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 10:35 PM

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमधल्या भेटीगाठींना वेग आला आहे. दरम्यान सध्या सुरु असलेल्या या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सर्व चर्चा सुरु असतानाच माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार आणि बबनराव शिंदेंच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर तिकडे भाजपच्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना तोंड फुटलं आहे. केजमधून संगीता ठोंबरे या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

2014 विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून संगीता ठोंबरेंनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या. त्यांचं 2019 मध्ये तिकीट कापून नमिता मुंदडा यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा एकदा संगीता ठोंबरे या केज मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे नमिता मुंदडा आणि संगीता ठोंबरे यांच्यात केजच्या जागेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रवीण माने यांचा शरद पवार गटात प्रवेश

दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षात इनकमिंग होणार असल्याची विधानं अनेकदा केली आहेत. काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. तर शनिवारी पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनाई उद्योगाचे संचालक आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान फडणवीसांनी इंदापूरमध्ये प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली होती. फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, अजितदादांची साथ सोडत प्रवीण मानेंचा शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. प्रवीण मानेंचं इंदापुरात चांगलं नेटवर्क आहे. तसेच त्यांचे हर्षवर्धन पाटलांसोबत चांगले संबंध आहेत.

मागील दिवसांचा विचार केला तर अजित पवार गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. दरम्यान त्यानंतर आता माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतरही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.