शरद पवारांचं राजकारण आऊटडेटेड झाले? सुप्रिया सुळे यांचं राजकारण कसं?; अजितदादा बेधडक काय म्हणाले?
"प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. सेम टू सेम राजकारण कधी कुणी करत नाही. जनरेशन गॅप असतो. जुन्या पिढीतील लोक वेगळा विचार करतात. आताच्या पिढीचे लोक वेगळा विचार करतात. दर वीस वर्षांनी नवीन पिढी येते", असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे आऊटडेटेड झालेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचं राजकारण कसं आहे? असाही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांवर अजित पवार यांनी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण आहे, याबाबतही अजित पवार यांनी या मुलाखतीत भाष्य केलं.
सुप्रिया सुळे यांचं राजकारण कसं आहे?
प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. सेम टू सेम राजकारण कधी कुणी करत नाही. जनरेशन गॅप असतो. जुन्या पिढीतील लोक वेगळा विचार करतात. आताच्या पिढीचे लोक वेगळा विचार करतात. दर वीस वर्षांनी नवीन पिढी येते. आता सोशल मीडिया आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या हिशोबाने काम करतो. तसंच सुप्रियाही त्यांच्या हिशोबाने राजकारण करत आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
शरद पवार आऊटडेटेड झाले?
“नाही. शरद पवार तरुणांना सोबत घेऊन चर्चा करतात. त्यांच्यासोबत स्वत:ला अॅडजस्ट करतात. आमच्या पक्षात लोकशाही आहे. जुन्या राष्ट्रवादीप्रमाणेच लोकशाही आहे”, असं शरद पवार म्हणाले.
खरी राष्ट्रवादी कुणाची?
शरद पवार मुख्य नेते होते. पण महापालिका निवडणुकीवेळी जिल्हा अध्यक्ष, आमदार, खासदार यांना आम्ही विचारायचो. आमदार, खासदार आणि जिल्हा अध्यक्ष हे आघाडी करायची की नाही याचा निर्णय घ्यायचे. आम्ही त्यांना फ्रि हँड द्यायचो. राजकीय परिस्थिती नुसार, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जायचा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. “मागे काय झालं त्याची अधिक चर्चा करण्याची गरज नाही. मला जे काही सांगायचं होतं. ते मी सांगितलं आहे. आता आम्ही पुढचा विचार करत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.