पी दारू, खा गुटखा… अजित पवार यांनी कोणाला दिला मोलाचा सल्ला
आपणही व्यसनाधीन होता कामा नये. नाहीतर पी दारू...खा गुटखा..रोज तंबाखू बिडी..सिगारेट पिणे म्हणजे स्वत: आपल्या शरीराचा नाश करणे आहे. कितीही आनंद झाला तरी सेलिब्रेशन म्हणून टाकू...असे नको
बारामती : विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या रोखठोक भाषणांसाठी सर्वांना परिचीत आहेत. तसेच अजित पवार अनेकदा आपल्या खुमासदार शैलीने टोला देखील लगावतात. त्यांच्या भाषणात हजरजबाबीपणा कायम असतो. यामुळे त्यांचे कोणतेही भाषण रंजक असते. बारामतीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आरोग्यासाठी दिलेले सल्ले मोलाचे ठरले.पुणे, मुंबई, दिल्लीत प्रदूषण सर्वाधिक आहे. मुंबईत आम्ही राहतो त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रदूषण आहे. परंतु नाईलाज आहे, आम्हाला त्या ठिकाणी राहवे लागते. परंतु आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया अशी झाली मी परदेशात गेला होतो. त्यावेळी मला डोळ्याला काही तरी झाल्याचे वाटले. परंतु दुर्लक्ष झाले. पुन्हा मी मंत्रालयात बसलो असताना डोळ्यात खूपू लागले. मी सरळ गाडी काढली आणि डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले डोळ्यात रेटीनाचा प्रॉब्लेम आहे. ऑपरेशन करावे लागले. लेझरचा बांध घालावा लागेल. कधी करायचे? डॉक्टरांनी विचारले. मी लागलीच म्हणलो आताच…डॉक्टर म्हणाले घरी …मी म्हणालो घरी ऑपरेशन झाल्यावरच सांगले, असे करुन आलो आहे. त्याठिकाणीच डॉक्टरांनी मला आढवा केला. डोळ्यात बांध घातला. मी डॉक्टरांना विचारलो, मलाच का झाले. डॉक्टर म्हणाले, दहा लाखांतून एखाद्याला होतो. त्यात तुम्ही आहात.
सेलिब्रेशन म्हणून टाकू नकोच… आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर आपणास सांगतात. आपणही काळजी घेतली पाहिजे. आपणही व्यसनाधीन होता कामा नये. नाहीतर पी दारू…खा गुटखा..रोज तंबाखू बिडी..सिगारेट पिणे म्हणजे स्वत: आपल्या शरीराचा नाश करणे आहे. कितीही आनंद झाला तरी सेलिब्रेशन म्हणून टाकू…असे नको. मुला-मुलींकडे लक्ष देऊन व्यसनापासून लांब राहिले पाहिजे, असा मोल्लाचा सल्ला शिबिरात आलेल्या रुग्णांना अजित पवार यांनी दिला.