कोरोनाचा संसर्ग वाढला; अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उदय सामंत यांचेही दौरे रद्द

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (ajit pawar, supriya sule cancel all further public events after corona cases rise in maharashtra)

कोरोनाचा संसर्ग वाढला; अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उदय सामंत यांचेही दौरे रद्द
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 11:44 AM

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचं पालन केलं जावं यासाठी त्यांनी हे दौरे रद्द केले आहेत. (ajit pawar, supriya sule cancel all further public events after corona cases rise in maharashtra)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच आज सकाळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेणंही टाळलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंचं आवाहन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उद्यापासूनचे म्हणजे 23 फेब्रुवारीपासूनचे पुढचे सर्व दौरे रद्द करण्यात येत असल्याचं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. सर्वांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय आवश्यक देखील आहे. हे लक्षात घेता, 22 फेब्रुवारी ते 7 मार्चपासूनचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम व दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती. माझे सर्वांना आवाहन आहे की, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत पालन करा. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

जयंत पाटलांचा हिंगोली दौरा रद्द

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी उद्या होणारा त्यांचा हिंगोली दौरा रद्द केला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने ते हिंगोलीला येणार होते. परंतु कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे, अशी माहिती हिंगोलीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली आहे.

सामंत यांचा वरळीतील कार्यक्रम रद्द

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आजचा वरळी येथील कार्यक्रम रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज २२ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ वरळी, मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल. तसेच तुमच्या सर्व अडचणी अर्ज रुपाने कार्यालयातील ड्रॉप बॉक्समध्ये द्यावेत किंवा तुम्हाला काही अडचणी आल्यास माझ्या मंत्रालयात संपर्क साधावे, असं आवाहन सामंत यांनी केलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar, supriya sule cancel all further public events after corona cases rise in maharashtra)

पवारांचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सभा कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन आणि दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (ajit pawar, supriya sule cancel all further public events after corona cases rise in maharashtra)

संबंधित बातम्या:

भुजबळांना कोरोना, शरद पवारांकडून खबरदारी, पुढील सर्व कार्यक्रम रद्द!

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी 

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

(ajit pawar, supriya sule cancel all further public events after corona cases rise in maharashtra)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.