आमचं घर कोणी फोडलं? भर स्टेजवर अजितदादा रडले, लाडक्या बहिणींनी दिला धीर

बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भरसभेत अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेले महिला देखील भावुक झाल्या

आमचं घर कोणी फोडलं? भर स्टेजवर अजितदादा रडले, लाडक्या बहिणींनी दिला धीर
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 5:54 PM

बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भरसभेत अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.  ‘मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. पण आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो, आईने आधार दिला, आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात. हे जे काय चाललं आहे ते बरोबर नाही, मग त्याच्यामध्ये मोठ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होतं, फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असा सवाल करताच अजित पवार यांना सभेच्या स्टेजवर अश्रू अनावर झाले.

दरम्यान स्टेजवर अजितदादा यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसताच सभेला आलेल्या महिला देखील चांगल्याच भावुक झाल्या. दादा आता रडायचं नाही तर लढायचं अशी जोरदार घोषणाबाजी या सभेला आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी केली. तसेच इतर कार्यकर्त्यांकडून देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आपल्या भागातल्या लोकांना काम दिली, काम चोख झाली पाहिजे, उगीच मलिदा मिळाला पाहिजे अशी भूमिका नको.  कितीतरी कॉट्रॅक्टर अधिकाऱ्याकडे जातात कुठे काही चुकलं असेल तर मी दुरुस्त करेन. माणूस आहे चुका करतो आणि स्वीकार करतो. तुम्ही मला मोठ केलं वरच्या पदावर नेल. टॉपच्या नेत्याच्या ओळखी झाल्या ते काय करतात ते प्रशासन कसं राबवतात हे पाहाता आलं. मी जनतेला काय देता येईल याचा विचार करतो. मला यावेळी उभा राहिचं नव्हतं, पण कार्यकर्त्यांनी सांगितलं, ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सुटली असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.