सर्वात मोठी बातमी! पुरावा नाही तोपर्यंत…, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मत, सूत्रांची माहिती

बीड सरपंच हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी आज अजित पवारांची भेटदेखील घेतली. यानंतर आता अजित पवार यांचं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय मत आहे? याबाबत महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! पुरावा नाही तोपर्यंत..., धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मत, सूत्रांची माहिती
धनंजय मुंडे आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 7:31 PM

बीड सरपंच हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केले आहेत. तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांचं एक शिष्टमंडळ आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेलं. या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

मंत्री धनंजय मुंडे हे आज दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर माध्यमांना फार प्रतिक्रिया न देता परत जाणं पसंत केलं. यानंतर आता अजित पवार धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का? याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांचं मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मत काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांची आजची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, अजित पवार यांच्या भेटीनंतर आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली. पदभार स्विकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन -तीन बैठका झाल्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, मी काय प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही. ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा. पोलीस यंत्रणा काम करत आहे. माझ्याकडे जेव्हा संशयानं पाहिलं जातं, तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही. ज्या तपास यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या, मीडिया ट्रायल सुरु आहे. पण ट्रायल कोर्टात होऊन द्या, तपास यंत्रणा काम करत आहेत”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.