अजित पवार भडकले…अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का?
Ajit Pawar | आम्ही येथे माशा मारायला आलो आहोत का ? बैठकीला यायला CE यांना काय अडचण आहे? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, अशा भाषेत अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.
संतोष जाधव, संभाजीनगर, दि. 23 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. ते कधी कोणाची मुलाहिजा न ठेवता सरळ बोलून टाकला. प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या बैठकींना जाताना अधिकारी चांगला अभ्यास करुन जातात. अजित पवार शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक ते घेत होते. बैठकीला मुख्य अभियंताच आले नाही. त्यामुळे अजित पवार प्रचंड संतापले. आम्ही येथे माशा मारायला आलो आहोत का ? बैठकीला यायला CE यांना काय अडचण आहे? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, तात्काळ बोलवून घ्या, असे दिले आदेश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे बैठकीतील तापमान चांगलेच वाढले होते.
अजित पवार यांची नाराजी
अजित पवार म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे. त्यानंतर आपण शाळेसाठी चांगले वर्ग देऊ शकलो नाही. चांगल्या वर्ग खोल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शाळा खोली बांधणेसाठी दानशूर व्यक्तींची मदत घ्यावी लागते, हे दुर्देव आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. परंतु अजून निधी खर्च झाला नाही, याबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
शरद पवार यांना तुतारी चिन्ह मग…
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शरद पवार यांना तुतारी हे चिन्ह मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मग मी काय करू, असे उत्तर अजित पवार यांनी दिले. महानंदा NDDB कडे दिल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी जळगाव दूध संघही NDDB कडे दिला होता. त्यानंतर जळगाव दूध संघाची परिस्थिती चांगली झाली. मग पुन्हा तो सहकाराच्या माध्यमातून सुरु आहे. आता महानंदाची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे NDDB बाबत प्रस्ताव चर्चाधीन आहे. विरोधकांना माहिती नसताना काही आरोप करतात. नेहमी गुजरातचे नाव घेतले जाते. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. महानंदाच्या तोटा भरून काढण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
लोकसभेचे दिले संकेत
लोकसभा निवडणूक १० मार्चच्या आधी लागणार असे खासदार तुमाने यांनी सांगितले. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली. यामुळे मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.