सुनेत्रा पवार केंद्रात मंत्री बनणार का? अजित पवार यांच्या पत्नी स्पष्टच म्हणाल्या…

sunetra pawar in rajya sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेत एकच खासदार निवडून आला. त्यामुळे मोदी 3.0 सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादीची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती. प्रफुल्ल पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते, आता राज्यमंत्री होणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते.

सुनेत्रा पवार केंद्रात मंत्री बनणार का? अजित पवार यांच्या पत्नी स्पष्टच म्हणाल्या...
sunetra pawar
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 9:56 AM

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून जात आहेत. त्यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर पक्षात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा होती. ओबीसी नेते आणि पक्षातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु पक्षात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही, असे सांगत ते आपली नाराजी लपवू शकले नाही. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात मंत्रिपद नाकरले होते. राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादीची होती. त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे स्पर्धेत आहेत. आता त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचे नाव आले. त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

बारामती माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितली की, केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मला आनंद होईल. या संधीचा पूर्ण फायदा घेत सोने करेल. आता बारामतीमध्ये झालेल्या पराभवाचे विश्लेषण आम्ही करत आहोत. पराभवाच्या कारणांवर आत्मचिंतन करत आहोत. त्यानंतर सुधारणांसाठी पावले उचलण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा रंगणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेत एकच खासदार निवडून आला. त्यामुळे मोदी 3.0 सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादीची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती. प्रफुल्ल पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते, आता राज्यमंत्री होणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. आम्ही थांबण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची बातमी आली होती. आता त्यात सुनेत्रा पवार यांची भर पडणार आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

बारामतीमध्ये मंत्रिपदाचे बॅनर

सुनेत्रा पवार अजून मंत्री झाल्या नाहीत. परंतु बारामतीमध्ये भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले आहे. श्रीकांत जाधव मित्र परिवाराकडून बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहे.

हे ही वाचा

पुण्याची राजकीय पॉवर, पुण्याला सात खासदारानंतर केंद्रात वजन वाढणार, एकाच परिवारात तीन खासदार

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.