Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला, त्यांना थांबवलं कसं जात नाही?’ संतोष बांगर यांच्या कृतीवरुन अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

शिंदे सरकारमधील काही आमदारांना आपण एक सरकारचा भाग असल्याच विसर पडत आहे. कोण याला ठोका, त्याचा कोथळा बाहेर काढा असली भाषा वापरत आहे. एका लोकप्रतिनीधीच्या तोंडून ही भाषा शोभनीय नाही. आमदारांची अशी भाषा म्हणजे महाराष्ट्रात संघर्ष पेटवणारी आहे. कोण अधिकाऱ्यांना मारतंय तर कोण डॉक्टरांनाच धमकी देतयं असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तणुकीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत.

'सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला, त्यांना थांबवलं कसं जात नाही?' संतोष बांगर यांच्या कृतीवरुन अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल
विरोधी पक्षनेते अजित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 6:43 PM

मुंबई : शिवसेनतून (Rebel MLA) बंडखोरी करीत शिंदे गटात सहभागी झालेले (Santosh Bangar) आ. संतोष बांगर हे गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत राहिलेले आहेत. कोण गद्दार म्हणाले तर त्याच्या कानशिलात लावा असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर हास्पीटलमधील बील कमी करण्यावरुन त्यांनी एका डॉक्टराला धमकी दिली होती हे कमी म्हणून की काय, सोमवारी त्यांनी निकृष्ट दर्जाचे भोजन कामगारांना दिले जात असल्याने एका उपहागृहाच्या व्यवस्थापकाच्याच कानशिलात लगावली. मात्र, या सर्वाचा समाचार विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांनी घेतला आहे. सरकार आलं म्हणजे मस्ती आली का असे म्हणत, त्यांना थांबवल कसं जात नाही असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रात संघर्ष पेटवण्याची भाषा

शिंदे सरकारमधील काही आमदारांना आपण एक सरकारचा भाग असल्याच विसर पडत आहे. कोण याला ठोका, त्याचा कोथळा बाहेर काढा असली भाषा वापरत आहे. एका लोकप्रतिनीधीच्या तोंडून ही भाषा शोभनीय नाही. आमदारांची अशी भाषा म्हणजे महाराष्ट्रात संघर्ष पेटवणारी आहे. कोण अधिकाऱ्यांना मारतंय तर कोण डॉक्टरांनाच धमकी देतयं असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तणुकीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. शिवाय हे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शोभणारे नसल्याचेही पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीही निर्धास्त, थांबवलं गेले पाहिजे

सरकारमधील काही आमदार हे अरेरावीची भाषा करीत आहेत. लोकप्रतिनीधींनीच असे केले तर इतरांचे काय? एकदा नव्हे तर गेल्या महिन्याभरात अनेकवेळा अशा बाबी समोर आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काय अनभिज्ञ आहेत का असा सवाल उपस्थित करीत त्यांना वेळीच रोखलं गेले पाहिजे असे पवारांनी सुनावलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय समज देणार का हे पहावे लागणार आहे.

नेमका काय घडला प्रकार?

आता कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदारांकडून कामगारांना खाण्यायोग्यही अन्न दिले जात नाही. हिंगोली जिल्ह्यातील एका उपहारगृहाला बांगर यांनी भेट दिली असती तेथील प्रकार उघडकीस आला आहे. मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत उपहारगृहाच्या व्यवस्थापकास विचारणा केली असता हे चुकून झाले, येथून पुढे होणार नाही असे म्हणताच बांगर यांनी त्याच्या कानशिलात लगावली.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.