सदाभाऊंचं शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य; राजकारण तापलं, अजितदादांनी कान टोचले

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. अजित पवार यांनी यावरून सदाभाऊ खोत यांचे कान टोचले आहेत.

सदाभाऊंचं शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य; राजकारण तापलं, अजितदादांनी कान टोचले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 5:04 PM

माजी मंत्री आणि महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी बुधवारी जत येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना त्यांच्या तोंडासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील खोत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमंक काय म्हणाले अजित पवार? 

अजित पवार यांनी देखील या वक्तव्यावरून सदाभाऊ खोत यांचे कान टोचले आहेत. मी सांगितलना प्रत्येकानं बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. वाचाळविरांना थांबवलं गेलं पाहिजे.  नाहीतर लोक म्हणतील राजकीय लोक काहीही बोलतात असं अजिद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली, त्याकरता मी आलो होतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान जीथे-जीथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत, तीथे-तीथे मी सगळीकडे सभा घेणार. जेवढ्या सभा होतील तेवढ्या सगळ्या सभा घेणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी जाहीर नाम्यात केलेल्या घोषणांवरून देखील त्यांनी हल्लाबोल केला.  त्यांनी जे जाहीर केलं, त्याचा सगळा हिशोब जातो तीन लाख कोटींवर.  कर्ज राहुद्या बाजुला, विकासासाठी कोठून पैसा आणणार. उगच काहीही सांगायचं, आम्ही देऊ शकत नाही असं विरोधक म्हणतात, आणि तुम्ही आहे त्यामध्ये वाढ करता, जादूची कांडी फिरवणार आहात का? असा सवाल करतानाच ही निव्वळ जनतेची फसवणूक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता विरोधकांकडून सरकारची जोरदार कोंडी होण्याची शक्यता आहे.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.