गणेश सोनोने, अकोला : रेल्वेतून प्रवास करत असताना सावधान राहणे आवश्यक आहे. धावती रेल्वे पकडण्याचे धाडस, कधी करायचे नसते, अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. अकोलो रेल्वे स्थानकावर (Railway) अशीच एक घटना घडली. या अपघातात आई आणि मुलगी दोघांच्या जिवावर बेतले होते. परंतु स्थानकावरील लोकांनी धावत जाऊन मदत केल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओसमोर आला आहे, तो पाहिल्यावर तुम्हालाही हादरा बसणार आहे.
धावती रेल्वे पकडू नका, अन्यथा काय होते ते व्हिडिओत पाहा#Railway #Akola pic.twitter.com/xD7pi3mGCa
हे सुद्धा वाचा— jitendra (@jitendrazavar) March 30, 2023
नेमके काय घडले
अकोला रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. वाशिम येथील 42 वर्षीय बेबी खिलारे ही महिला मुंबईला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशनवर आली होती. त्यावेळी अमरावतीवरून मुंबईला जाणारी अंबा एक्स्प्रेस ही स्टेशनवरून निघाली होती. बेबी यांच्यांसोबत असणाऱ्या त्यांच्या मुलीने धावती ट्रेन पकडली. पण ही महिला ट्रेन पकडत असताना तिचा तोल गेला अन् पाय घसरून त्या प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकल्या. धावत्या रेल्वेसोबत त्या ओढल्या जाऊ लागल्या. तेवढ्यात स्टेशनवर व्हेंडर शंकर स्वर्गे यांनी धाव घेत त्या महिलेला ओढले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले.
मुलीवर आले संकट
महिलेनंतर ट्रेनमध्ये चढलेल्या मुलीवर संकट कोसळले होते. आई खाली प्लॅटफॉर्म राहिल्यामुळे आणि तिचा अपघात पाहिल्यानंतर मुलीने ट्रेनमधून उडी घेतली. पण सुदैव चांगले होते, यामुळे तिलाही काही झाले नाही. या घटनेत आई व मुलीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पण दोघींचेही प्राण वाचले. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. व्हेंडर शंकर स्वर्गे यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.