Maharashtra Heavy Rain:अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द; मुंबईतील कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश तसेच अनेक विभागांच्या पदवी परीक्षा सध्या सुरु आहेत. यामुळे उद्या गुरुवार, 14 जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले. तसेच मुंबईतील कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत आहे. याचा परिणमा रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर झाला आहे. त्यातच आता पुढील 48 तासांत महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून 14 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाच्या(Mumbai University) सर्व परीक्षा(Exam) रद्द केल्या आहेत. तर मुंबईतील कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश तसेच अनेक विभागांच्या पदवी परीक्षा सध्या सुरु आहेत. यामुळे उद्या गुरुवार, 14 जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले. तसेच मुंबईतील कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिह्ल्यांना 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून राज्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांना 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात शाळांना सुटी
पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने गुरुवार 14 जुलै रोजी पुणे शहरातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
ठाणे, पालघरमध्ये शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर
ठाणे, पालघरमध्ये शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष माणिक गुरसळ यांनी उद्या 14 जुलै सर्व माध्यमिक शाळा(schools) आणि महाविद्यालय(colleges ) यांना सुट्टी(holiday) जाहीर केली आहे.
13 एनडीआरएफ, 2 एसडीएफ पथके तैनात
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये 13 एनडीआरएफ, 2 एसडीएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.