Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच, नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सोहळा!!

अखेर नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 3 ते 5 डिसेंबरमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे, अशी माहिती सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ठरलं! साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच, नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सोहळा!!
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत साहित्य संमेलनाच्या तारखांची घोषणा केली.
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 4:22 PM

नाशिकः अखेर नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 3 ते 5 डिसेंबरमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे, अशी माहिती सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखांवरून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच पत्रापत्री रंगली होती. विशेष म्हणजे संमेलन पुढे ढकलण्याला ठाले-पाटलांनी सणसणीत पत्र लिहून आक्षेप घेत नाराजी दर्शवली होती. यावरून पालकमंत्री छगन भुजबळ व निमंत्रक जातेगावकर म्हणाले की, ठाले – पाटील नाराज नाहीत. शिवाय मंगलाताई नारळीकरांच्या प्रकृतीबाबत तक्रारी होत्या. तसे जयंत नारळीकरांनी आपल्याला सांगितले होते. त्यामुळे या संमेलनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. आता कोणीही नाराज नाही. सर्व काही व्यवस्थित पार पडेल. ठरल्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 3 ते 5 या तारखे दरम्यान साहित्य संमेलन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला एखाद्या मोठ्या साहित्यिकाला बोलावले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होईल. त्याची तयारी झाली आहे. लवकरच उद्घाटक ठरतील. त्यानुसार आपल्याला माहिती देण्यात येईल. या संमलेनाला साऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

असे होणार कार्यक्रम

– भुजबळ नॉलेज हबमध्ये साहित्य संमेलन – राहण्याची,पार्किंगची आणि इतर व्यवस्था – गावात संमेसलन केल्यास वाहतूक कोंडी – रसिकांसाठी बसेस ची व्यबस्था करणार – नाशिकमधील सर्व विभागातून गाड्या इथे येतील – 3 तारखेला दिंडी निघणार – त्यानंतर ध्वज वंदन आणि उद्घाटन – 4 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम

साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबरच्या काळाता नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे. लवकर संमेलनाच्या उद्घाटकांना निरोप देण्यात येईल. सारे काही व्यवस्थित होईल.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

साहित्य संमेलनात काही मोठा वाद नव्हता. नारळीकरांनी स्वतःच नोव्हेंबरमध्ये संमेलन नको, असे कळवले होते. तसा मेल व पत्र आपल्याकडे आहे. कोणीही नाराज नाही.

– जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक

इतर बातम्याः

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ; निधी येऊनही अतिरिक्त 29 कोटींची मागणी, चौकशीचे लचांड