नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहा आमदार कोणासोबत? मिळाली महत्वाची माहिती

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले आहे. त्यानंतर अजित पवार की शरद पवार असा संघर्ष सुरु झाला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी बैठका होत आहेत. नाशिक जिल्ह्यात काय झाला निर्णय...

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहा आमदार कोणासोबत? मिळाली महत्वाची माहिती
इथेच काका-पुतण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 10:08 AM

चंदन पुजाधिकारी, नाशिक : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन गट निर्माण झाले. अजित पवार आणि शरद पवार यांचा गट निर्माण झाल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सरळ उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीनंतर शरद पवार स्वत: मैदानात उतरले. ते राज्याचा दौरसुद्धा करणार आहेत. दोन्ही गट जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी अन् पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात जिल्हास्तरावरसुद्धा बैठका सुरु झाल्या आहेत. आता नाशिक जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे.

नाशिक जिल्हा कोणाबरोबर

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आहेत. हे सर्व आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत. एकंदरीत सध्या तरी नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांचे पारडे जड आहे.

हे सुद्धा वाचा

नरहरी झिरवाळ नॉटरिचेबल

नाशिकमधील आमदार नरहरी झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. ते सध्या नॉट रिटेबल झाले आहेत. त्यांना माध्यमांसमोर न येण्याचे सूचना अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तांत्रिक कारणामुळे नरहरी झिरवाळ यांना माध्यमांसमोर न येण्याचे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते सध्या नॉट रिचेबल झाले आहेत.

पुणे राष्ट्रवादीचा आज निर्णय

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कोणासोबत आहे, याचा निर्णय मंगळवारी दुपारी होणार आहे. त्यासाठी पुणे शहरात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होणार आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.