प्रणिती शिंदे यांचा रेशन दुकानात प्लॅस्टिक मिक्स तांदूळ विकला जात असल्याचा आरोप, सत्य काय?

सोलापूरच्या एका रेशन दुकानात प्लॅस्टिकमिक्स तांदूळ मिळत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. तर स्थानिक भाजप आमदारांनी तो तांदूळ प्लॅस्टिकमिक्स नसून फोर्टिफाईड युक्त असल्याचा दावा केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.

प्रणिती शिंदे यांचा रेशन दुकानात प्लॅस्टिक मिक्स तांदूळ विकला जात असल्याचा आरोप, सत्य काय?
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 9:53 PM

अक्कलकोटमधल्या एका गावातल्या रेशन दुकानात प्लॅस्टिक मिक्स तांदूळ विकला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता. आंदेगावातल्या रेशन दुकानात मिळालेल्या तांदळाची प्रत्यक्ष पाकीटं दाखवत शिंदेंनी अन्न व नागरी पुरवठा विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पण प्रणिती शिंदेंचा आरोप बिनबुडाचा असून तांदूळ प्लॅस्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदूळ असल्याचा दावा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी दावा केलेला पोर्टिफाईड तांदूळ नेमका काय आहे, हे समजून घेवूयात.

टीव्ही ९ चे प्रतिनिधींनी प्रत्यक्ष त्या गावात जावून विचारपूस केली. रेशन दुकानदाराच्या मते हा पोर्टिफाईड तांदूळ असूनच दिसायला जरा वेगळा दिसतो त्यामुळे अनेक लोक तक्रारी घेवून येतात. फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे मूळ तांदुळात काही पोषक घटक मिक्स केले जातात तांदळाची भुकटी करुन त्यात कृत्रिमपणे काही विटॅमिन्स, खनिज तांदळात टाकले जातात. नंतर त्यांनाच पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो तेच फोर्टिफाईड तांदूळ 100 किलोमध्ये १ किलो या प्रमाणात टाकले जातात. यातून लोह आणि विविध जीवनसत्व मिळावीत हा सरकारचा हेतू आहे. आरोग्यासाठी हा तांदूळ चांगला मानला जातो.  मात्र थेलेसिमिया, सिकर सेल, अॅनिमिया किंवा टीबीसारख्या रुग्णांसाठी पोर्टिफाईड तांदूळ अपायकारक असल्याचाही दावा एक गट करतो.

तांदळाच्या तपासणीसाठी जर तुम्ही ते तव्यात टाकून गरम केले., आणि त्यात जर भेसळ असेल तर प्लॅस्टिकचे कण वितळून तव्याला चिकटून बसतात. फोर्टिफाईड तांदुळाबाबतीत असं होत नाही. मात्र जर दोन वाटीत तुम्ही पाणी घेवून त्यात तांदूळ टाकले, तर बऱ्याचदा प्लॅस्टिकमिक्स तांदूळ तरंगतो. आणि नेमकी हीच गोष्ट फोर्टिफाईड तांदळाबाबतीत देखील घडते. त्यामुळेच गावखेड्यातल्या लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. याशिवाय जर स्थानिक पातळीवर दुकानदारानं भेसळीचा विचार केला तर फोर्टिफाईड तांदूळ आणि प्लॅस्टिकचा तांदूळ यांच्यात फक्त डोळ्यांनी फरक करणंही अवघड आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.