अल्पवयीन मुलीवरील विनयभंगाच्या आरोपानंतर मठाधिशाची सुसाईड नोट आणि व्हिडीओ समोर, वाचा प्रकरण नेमकं काय?
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोळगाव येथील सूर्य मंदिर संस्थानचे मठाधिश हनुमान महाराज याच्यावर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल आहे (allegations of molestation of minor girl on maharaj in beed)
बीड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोळगाव येथील सूर्य मंदिर संस्थानचे मठाधिश हनुमान महाराज याच्यावर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मठाधिश फरार आहे. घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली होती. मात्र, आज हा गुन्हा खोटा असून यात मी निर्दोष आहे. त्यामुळे मी आता आत्महत्या करीत आहे, अशा सुसाईड नोटसह व्हिडीओ स्वतः मठाधिशाने व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या मठाधिशाचा शोध घेत आहेत (allegations of molestation of minor girl on maharaj in beed).
बीड जिल्ह्यातील कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव येथे सूर्य मंदिर संस्थान आहे. गेली अनेक वर्षांपासून हनुमान महाराज हे संस्थानचे मठाधिश म्हणून कार्यरत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी संस्थान परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मठाधिश हनुमान महाराज याच्यावर गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल होताच मठाधिश फरार झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मठाधिशाचा व्हिडिओ आणि सुसाईड नोट व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. आरोपी मठाधिश सध्या कुठे आहे? याची कोणालाही माहिती नाही. सुसाईड नोट आणि व्हिडीओ नंतर पोलीस त्याचा शोध घेत आहेत (allegations of molestation of minor girl on maharaj in beed).
हेही वाचा : ‘हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती नामांतर करा’, शिवसेनेच्या गुजराती नेत्याने भाजपला ललकारले