वाहतूक कोंडीची समस्या सुटणार? मेट्रोसोबतच नळस्टॉप चौकातील दुहेरी उड्डाणपुलाचे लोकार्पण
या पुलाच्या मध्यभागी मेट्रो असेल. तर दोन्ही बाजूला दोन-दोन म्हणजेच एकूण चार मार्ग असणार आहेत. त्यात एका बाजूने दुचाकी वाहनासाठी व चारचाकी वाहनासाठी या जागा असणार आहेत. बसेस मात्र नियमित रस्त्यावरूनच धावणार आहेत.
पुणे – शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या नळस्टॉप चौकात मेट्रो खांबाच्या मध्यावर उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. या उड्डाण पुलाचे उद्घाटनही मेट्रो सोबतच केले जाणार आहे. सातशे मीटरचा शहरातील पहिलाच दुहेरी उड्डाण पूल आहे. उड्डाणपूल व त्यावर मेट्रो अशी दुहेरी रचना आहे. मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागातून बरोबर दोन्ही बाजूला हा पूल विभागाला आहे. त्यांची लांबी ७०० मीटर तर रुंदी १५ मीटर आहे . या उड्डाण पुलाचा मध्यभाग नळस्टॉप चौकात आहे. तर पुढेच एसएनडीटी तर मागे पेट्रोल पंपाच्या जवळ अहा उड्डाण पूल सुरु होतो.
अशी असेल सुविधा या पुलाच्या मध्यभागी मेट्रो असेल. तर दोन्ही बाजूला दोन-दोन म्हणजेच एकूण चार मार्ग असणार आहेत. त्यात एका बाजूने दुचाकी वाहनासाठी व चारचाकी वाहनासाठी या जागा असणार आहेत. बसेस मात्र नियमित रस्त्यावरूनच धावणार आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या सुटणार शहरातील नळस्टॉप चौक हा कायम रहदारी असलेला चौक आहे . येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. या उड्डाण पूलमुळे सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. ज्या वाहनांना आजूबाजूच्या गल्ली बोळात जायचे नाही त्यांना या उड्डाण पुलावरुन सरळ पुढे जात येणार आहे.
वनाज ते गरवारे हा मेट्रोचा मार्ग प्राधान्याने डिसेंबर ते जानेवारी २०२२ दरम्यान सुरु होत आहे. त्याचा दरम्यान या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मेट्रोच्या खांबाच्या मध्यभागातून निघालेला हा पूल पुण्याची नवीन ओळख निर्माण करणारा आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर ऋण हा पूल बांधण्यात आल्याची माहिती महामेट्रो प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली आहे.
MLC ELECTION निवडणूक अविरोध करण्याचा प्रस्ताव, लवकरच निर्णय होणार – नाना पटोले