गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरि ही मशाल तुम्हाला भस्मसात करेल, दानवे कडाडले…
एकनाथ शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाल्याने दानवे यांनी गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरि ही मशाल तुम्हाला भस्मसात करेल असा इशारा दिला आहे.
स्वप्नील उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अमरावती : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी भाषणादरम्यान त्यांनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. मला डायसची गरज नाही, मला वाचून भाषण देण्याची सवय नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तर नुकतीच दोन्ही गटाला नावं आणि चिन्ह मिळाली असल्याने ठाकरे गटाच्या मशालीचा इतिहास सांगत शिंदे गटाला लक्ष केले आहे. त्यात दानवेंनी म्हंटलं, गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरि ही मशाल तुम्हाला भस्मसात करेल. गावागावात आपल्याला मशाली काढाव्या लागतील मशाल ही आता जनते समोर पोहचली पाहिजे. याशिवाय बरेच जण आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची भाषा करतात, आमचं हिंदुत्व कागदावरच नाही असे सांगत सांगलीत साधूवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही काय केलं ? तेव्हा हल्ला झाला तर हिंदू संकटात आला नाही का ? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाल्याने दानवे यांनी गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरि ही मशाल तुम्हाला भस्मसात करेल असा इशारा दिला आहे.
सांगलीत झालेल्या साधूवर हल्लाप्रकरण सांगत तेव्हा हिंदुत्व कुठे होते ? असा सवाल उपस्थित करून हे हिंदुत्ववादी नाही तर गद्दारांची अवलाद आहे, हे चाळीस म्हैशासुर असल्याचे देखील दानवे म्हणाले.
याशिवाय अमरावतीत असल्याने दानवे यांनी राणा दाम्पत्याला लक्ष केले आहे. त्यात त्यांनी आता कुठं गेली हनुमान चालीसा, कुठं गेला भोंगा…असे म्हणत राणा दाम्पत्याला लक्ष केले आहे.
याशिवाय जेव्हा पुढे निवडणूक होतील तेव्हा शिवसैनिक राणांना हनुमान चालीसा म्हणायला घरी बसवतील. नाव राणा ठेवायचं आणि काम रावणाच करायचे असे म्हणत दानवे यांनी राणांचा समाचार घेतला.
दानवे एवढ्यावरच थांबले नाहीत, अमित शहा यांना शिवसेना पळून लावल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.