चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज?

खैरे आणि दानवेंच्या नाराजीनाट्यावर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांनी देखील टीका केलीय. चंद्रकांत खैरेंनी कधीच अंबादास दानवेंचा सन्मान केला नसल्याचं म्हणत भागवत कराडांनी खैरेंना टोला लगावलाय. तर नितेश राणेंनी देखील अंबादास दानवेसंदर्भात सूचक वक्तव्य केलंय.

चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज?
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 10:20 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अंबादास दानवेंनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकदा व्यक्त करुन दाखवली होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या अंबादास दानवेंची ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तर उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून कामाला लागलोय, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीय.

संभाजीनगरमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे दानवेंनी अप्रत्यक्षरित्या अनेकदा आपली नाराजी व्यक्त केलीय. तसेच श्रीनिवास पाटलांनी घेतलेल्या निर्णयावरूनही अंबादास दानवेंनी नाव न घेता चंद्रकांत खैरेंना टोला लगावलाय. दुसऱ्यांना संधी कशी द्यावी याचा आदर्श अनेकांनी श्रीनिवास पाटलांकडून घ्यावा, असं अबादास दानवे म्हणाले आहेत.

भाजप नेत्यांची मोठी वक्तव्ये

खैरे आणि दानवेंच्या नाराजीनाट्यावर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांनी देखील टीका केलीय. चंद्रकांत खैरेंनी कधीच अंबादास दानवेंचा सन्मान केला नसल्याचं म्हणत भागवत कराडांनी खैरेंना टोला लगावलाय. तर नितेश राणेंनी देखील अंबादास दानवेसंदर्भात सूचक वक्तव्य केलंय. “चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंचा कधीच सन्मान केला नाही”, असं भागवत कराड म्हणाले आहेत. तर “अंबादास दानवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे आहेत. पुढे काय होतं बघाच”, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिलीय.

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे नाराज आहेत. दरम्यान त्यांच्या नाराजीनंतर शिंदे गटाकडून त्यांना ऑफर देखील देण्यात आली. त्यामुळे आता जरी अंबादास दानवे खैरेंच्या सोबत असले तरी आगामी काळात ते वेगळा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.