Amit Shah: सहकार वाचवण्यासाठी समित्या स्थापन करणार नाही, अमित शहांनी सांगितला नवा प्लान!

संकटात असलेल्या सहकार चळवळीत नवे प्राण फुंकण्यासाठी केंद्र सरकारचा नवा प्लॅन तयार आहे. या प्लॅनची माहिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदनगर येथील पहिल्या सहकार परिषदेत दिली.

Amit Shah: सहकार वाचवण्यासाठी समित्या स्थापन करणार नाही, अमित शहांनी सांगितला नवा प्लान!
सहकार मंत्री अमित शहा
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:50 PM

अहमदनगरः महाराष्ट्रातील तसेच देशातील सहकार चळवळ संपुष्टात येण्याची स्थिती असताना ती वाचवण्यासाठी कोणत्याही समित्या स्थापन केल्या जाणार नाहीत. आधी समित्या स्थापन करायच्या, त्यांच्याकडून अहवाल मागवायचे आणि त्या अहवालांचे काय होते, हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे सहकार वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या नेमणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदनगर येथे केली. अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्री ही पद दिल्यानंतर देशातील पहिली सहकार परिषद अहमदनगर येथील प्रवरनगर परिसरात पार पडली. या परिषदेला सहकार मंत्री अमित शहा संबोधित करत होते. सहकाराची चळवळ वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीचा प्लॅन त्यांनी यावेळी सांगितला.

सहकार कसा वाचवणार, काय म्हणाले अमित शहा?

सहकार परिषदेत बोलताना अमित शहा यांनी केद्र सरकारतर्फे येत्या काळात सहकार चळवळ वाचवण्यासाठी कोणती रणनीती आखली जाईल, याविषयी सूतोवाच केले. ते म्हणाले, आम्ही यासाठी समित्या स्थापन करणार नाहीत तर सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या विद्वानांसोबत काम करू. वित्त, साखर कारखाने, वितरण, मार्केटिंग, दूध इत्यादी सर्वच क्षेत्रांसाठी ही रणनीती लागू असेल.’ अमित शहा पुढे म्हणाले, – सहकार क्षेत्रात काळानुरूप अनुकूल बनवावे लागेल. – प्रशासनाचे, पद्धतींचे आधुनिकीकरण करावे लागेल. सर्व व्यवहार काँप्युटराइज्ड करावे लागतील. – कर्चमाऱ्यांमध्ये प्रोफेशनल कौशल्य असणाऱ्यांना योग्य सन्मान द्यावा लागेल. – कुशल कर्मचाऱ्यांना जे बाहेर पॅकेज उपलब्ध आहे, ते पॅकेज द्यावे लागेल. – त्यांना सोबत घेऊन स्पर्धेत उतरवाले लागेल. – असे केले तरच सहकाराची चळवळ 50 ते 100 वर्षे पुढे नेता येईल.

सहकार विद्यापीठदेखील आणणार- अमित शहा

अमित शहा पुढे म्हणाले, देशात एक सहकार विद्यापीठाची स्थापना केली जाईल. तसेच मल्टी स्टेट कॉऑपरेटिव्ह कायदादेखील बदलणार आहोत. यासोबतच जे क्षेत्र सहकारीता क्षेत्राशी जोडलेले नाहीत, ते या चळवळीत कशा प्रकारे जोडता येतील, याचाही अभ्यास करण्यासाठी एक सचिवांची समिती काम करत आहे. येत्या काळात सहकारी नीती येईल. याद्वारे पुढील 25 वर्षे सहकारात प्राण फुंकण्याचे काम केले जाईल. देशातील ज्या ठराविक राज्यांमध्ये सहाकाराची सुरुवात झाली, त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहकाराची ही चळवळ मजबूत आहे. तिची मूळेही खोलवर रुजलेली आहेत. पद्मश्री विखे पाटील यांच्या कर्मभूमीत आपण ही परिषद आहोत, त्यामुळे परमेश्वरही आपल्याला मदत करेल, असा मला विश्वास आहे.

इतर बातम्या-

Amit Shah In Maharashtra : : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र, अमित शाह यांचे गौरवोद्गार

Amit Shaha: सहकार चळवळ मागे का पडली? हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? अमित शहांची जोरदार टोलेबाजी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.