सर्वात मोठी बातमी! सीमावादावर तात्पुरता तोडगा निघाला, अमित शाह यांनी नेमकं काय सांगितलं?

"सीमा प्रश्नावर भांडण करुन नाही, रस्त्यावर उतरुन नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो, असं बैठकीत निश्चित झालंय", असं अमित शाह यांनी सांगितलं.

सर्वात मोठी बातमी! सीमावादावर तात्पुरता तोडगा निघाला, अमित शाह यांनी नेमकं काय सांगितलं?
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 9:01 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठी घडामोड घडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. संसदेत अमित शाह यांच्या कार्यालयात दोन्ही राज्यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकिती काय निर्णय घेतले गेले याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तात्पुरता तोडगा निघाला असल्याचं स्पष्ट केलं. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने कोणताही दावा केला जाणार नाही, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

“सीमेवरुन जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी मी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि इतर महत्त्वाच्या अधिकारी आणि नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली. चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मुद्दे ठेवले आहेत”, असं अमित शाह यांनी सांगितलं.

“सीमा प्रश्नावर भांडण करुन नाही, रस्त्यावर उतरुन नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो, असं बैठकीत निश्चित झालंय”, असंदेखील शाह यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यत कोणतंही राज्य या विषयावर कोणताही दावा करणार नाही”, असं शाह यांनी स्पष्ट सांगितलं.

दोन्ही राज्यांना मिळून, दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन असे सहा मंत्री बसतील आणि या विषयी सविस्तर चर्चा करतील, अशी सूचना दिल्याचं शाह यांनी सांगितलं.

आणखी काही मुद्देही दोन राज्यांमध्ये आहेत. अशा मुद्द्यांचं निवारणही हे सहा मंत्री करतील, असंही त्यांनी सांगितलं.

“दोन्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ठिक राहावी. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही सिनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनवण्यासाठी सहमत झाली आहे. ही कमिटी कायदा-व्यवस्थेवर ताबा ठेवण्याचं काम करेल”, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.