अमित शहा कोकणात पोहोचले, थोड्याच वेळात राणेंच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन

भाजप नेते नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन होणार आहे. (Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital today)

अमित शहा कोकणात पोहोचले, थोड्याच वेळात राणेंच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन
नारायण राणे
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 2:25 PM

सिंधुदुर्ग: भाजप नेते नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार असून शहा सिंधुदुर्गात पोहोचले आहेत. त्यामुळे शहा नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital today)

किती वाजता सिंधुदुर्गात येणार

आज दुपारी 2 वाजता अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आज दुपारी बरोबर 1.50 वाजता शहा हे गोवा येथे पोहोचले. तिथून हेलिकॉप्टरने ते पडवे-कसाल येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज परिसरात आले असून काही वेळातच या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्या निमित्ताने शहा तब्बल दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. कार्यक्रमानंतर ते राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतील.

कोण कोण उपस्थित राहणार

या कार्यक्रमाला अमित शहा यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित आहेत.

शहांसाठी स्पेशल लिफ्ट

शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्पेशल लिफ्ट तयार करण्यात आली आहे. 18 लाख रुपये खर्चून ही लिफ्ट तयार करण्यात आली आहे. राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच या खास लिफ्टची पाहणी केली होती.

राणेंचं शक्तीप्रदर्शन

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायण राणे कोकणात शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे राणेंच्या या शक्तीप्रदर्शनासह शहा यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राणेंनी कोकणात चांगली कामगिरी केली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० पैकी ४५, रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ पैकी ५९ आणि रायगड जिल्ह्यात ८८ पैकी ३३ ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला. त्यामुळे पक्षातील त्यांचं स्थान अधिकच बळकट झालं असून त्यानंतरचा राणे यांनी घेतलेला हा पहिलाच कार्यक्रम असल्यानेही त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital today)

शहांचा दौरा

>> दुपारी 1.50 वाजता लाईफ टाईम मेडिकल कॉलेज, पडवे सिंधुदुर्ग येथील हेलिपॅडवर शहांचे आगमन

>> दुपारी 1.55 वाजता लाईफ टाईम मेडिकल कॉलेजकडे रवाना

>> दुपारी 2 वाजता मेडिकल कॉलेजमध्ये आगमन

>> दुपारी 2 ते 2.10 वाजता लाईफ टाईम हॉस्पिटल गेस्ट हाऊस येथे थांबणार

>> दुपारी 2.10 वाजता गेस्ट हाऊसमधून मेडिकल कॉलेजकडे प्रयाण

>> दुपारी 2.15 वाजता लाईफ टाईम मेडिकल कॉलेज सभागृहात आगमन

>> दुपारी 2. 15 ते 3.35 पर्यंत हॉस्पिटलच्या उद्घाघटनाचा कार्यक्रम

>> दुपारी 3.35 वाजता मेडिकल कॉलेज येथून पडवेकडे प्रयाण

>> दुपारी 3.40 वाजता मेडिकल कॉलेज हेलिपॅड येथे आगमन

>> दुपारी 3.45 वाजता लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथून दाबोळी विमानतळ गोवाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. (Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital today)

संबंधित बातम्या:

आज अमित शाह कोकणात, आघाडीत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती? काँग्रेसनं संधी दिली? ..

सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? पवारांसह अनेकजण का नाराज?

देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त, दिल्ल्लीच्या दिव्याखाली अंधार; संजय राऊतांचा घणाघात

(Amit Shah to inaugurate BJP MP Narayan Rane’s medical college and hospital today)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.