VIDEO: कपाळाला माती लावत अमित ठाकरे Shivneri समोर नतमस्तक, ढोलही वाजवला; शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज तिथीनुसार संपूर्ण राज्यभर मोठ्या दिमाखात साजरी होत आहे. शिवजयंती निमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी देखावे करण्यात आले आहेत.
जुन्नर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (shiv jayanti) यांची जयंती आज तिथीनुसार संपूर्ण राज्यभर मोठ्या दिमाखात साजरी होत आहे. शिवजयंती निमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी देखावे करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मिरवणुका काढण्यात येत आहेत. गुलाल उधळत, ढोलाच्या गजरात शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जात आहे. मनसेने (mns) तर संपूर्ण राज्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मनसेने मुंबईत शिवाजी पार्कवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. शिवनेरीवरही मनसेकडून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनविसेचे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित ठाकरे (amit thackeray) यांनी शिवनेरी किल्ल्यासमोर नतमस्तक होत शिवनेरीची माती कपाळाला लावली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत ढोल वाजवण्याचा आनंदही लुटला.
अमित ठाकरे आज सकाळीच शिवनेरीवर आले होते. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटील, असंख्या मनसे सैनिक आणि जुन्नरमधील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांनी शिवनेरीचं गुडघे टेकून दर्शन घेतलं. त्यानंतर शिवनेरीची माती कपाळाला लावली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण शिवनेरी परिसर मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. मनसे सैनिकांनी ढोल वाजवून जल्लोष सुरू केलेला असतानाच अमित ठाकरे यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही ढोल वाजवून जल्लोष केला. यावेळी शिवनेरीवर शिवाई मातेची पूजा करून महाभिषेक करण्यात आला.
मनसेची नवी घोषणा
शिवजयंती निमित्ताने किंवा शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या जातात. मात्र, मनसेने यंदापासून ‘जय भवानी, जय शिवराय’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळता यावा म्हणून मनसेने ही नवीन घोषणा दिली आहे.
संबंधित बातम्या:
Shivjayanti 2022 : “संभ्रम निर्माण करू नका”, खासदार Vinayak Raut यांचं Amol Mitkari यांना आवाहन