गटबाजी की चूक? नाशिकमधील मनसेच्या बॅनरवरुन राजकीय चर्चेला उधाण, मनसेत काय चाललंय ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे. त्याच दरम्यान स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर बड्या नेत्याचा फोटो नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

गटबाजी की चूक? नाशिकमधील मनसेच्या बॅनरवरुन राजकीय चर्चेला उधाण, मनसेत काय चाललंय ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 5:39 PM

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. दोन दिवसीय अमित ठाकरे यांचा हा दौरा असून प्रभागनिहाय आढावा घेतला जात आहे. याच दरम्यान अमित ठाकरे यांचे स्वागत केले जात असतांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनरवरुन ( MNS Banner ) राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मनसेचे नेते डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो बॅनरवर नसल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. जाणीवपूर्वक हा फोटो टाळला गेला की नजरचुकीने राहून गेला याबाबत मनसेच्या वर्तुळात बोललं जात आहे.

डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो नसल्याने मनसेच्या वर्तुळात चर्चा सुरू असतांना मनसेत गटबाजी आहे का ? जाणून बुजून फोटो लावला गेला नाही ? याशिवाय नजरचुकीने हा फोटो राहिला असावा असा तर्क लावला जात आहे.

खरंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्तींच्या यादीत डॉ. प्रदीप पवार यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी 2014 च्या निवडणुकीत डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली होती.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असल्यावर डॉ. प्रदीप पवार यांना महत्वाचे स्थान असतं. मात्र, अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान असलेल्या बॅनरवर डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो नसल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांच्याकडून नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतः अमित ठाकरे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

राज ठाकरे यांनी खरंतर नाशिककडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. अमित ठाकरे यांच्याच खांद्यावर नाशिकची जबाबदारी आहे. याशिवाय नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या कामावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात होती.

एकूणच काय पक्षाला उभारी देण्यासाठी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देत आहे. तरुणांना संधी देऊन राज ठाकरे, अमित ठाकरे पक्ष मजबूत करत आहे.

याच दरम्यान नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामावरून चर्चा होत असतांना उलटसुलट चर्चा होऊ लागल्याने पक्ष याबाबत दखल घेईल का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. पुढील काळात राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.