Amol Kolhe | ‘टोकाचे निर्णय घेतले, आता फेरविचाराची गरज,’ अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टचा अर्थ काय ?
सध्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अशाच आशयाची एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी थोडं मनन आणि चिंतनाची गरज असून काही दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचं सांगितलं आहे. तसेच काही निर्णयांचा फेरविचारदेखील करणार असल्याचं सूचक विधान कोल्हे यांनी केलंय. कोल्हे यांच्या या निर्णयानंतर आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
मुंबई : राजकीय नेत्यांचा दिवस आणि वेळ दौरे, सभा, बैठका अशा कार्यक्रमांनी बंदिस्त असतो. त्यांना मनोरंजन तसेच वैयक्तिक कामासाठी सहजासहजी वेळ भेटत नाही. कदाचित याच कारणामुळे नेतेमंडळी काही दिवसांसाठी अज्ञातवासात किंवा कुठेतरी दूर निघून जातात. सध्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अशाच आशयाची एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी थोडं मनन आणि चिंतनाची गरज असून काही दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचं सांगितलं आहे. तसेच काही निर्णयांचा फेरविचारदेखील करणार असल्याचं सूचक विधान कोल्हे यांनी केलंय. कोल्हे यांच्या या निर्णयानंतर आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
अमोल कोल्हे यांच्या फेसबूक पोस्टेमध्ये नेमकं काय आहे ?
‘सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक थकवा आलाय.
शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!
टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही’ असं अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टचा अर्थ काय ?
अमोल कोल्हे मागील काही दिवसांपासून राजकारणात चांगलेच सक्रिय होते. सभा, मेळाव्यांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. 22 ऑक्टोबर रोजी राज्यात थिएटर सुरु झाले. यामध्ये नियमावलीत बदल करण्यात यावा अशी मागणी कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र आता त्यांनी थकवा जाणवत असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक निर्णयांवर चिंतन करण्याची गरज आहे. आराम केल्यानंतर शारीरिक थकवा जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी चिंतनाची गरज आहे, असं कोल्हे यांनी सांगितलंय. तसेच काही निर्णयाचा फेरविचार आणि विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहे. कोल्हे यांना कोणत्या निर्णयांवर फेरविचार करायचा आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
इतर बातम्या :
Video | पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांच्या गाडीची तोडफोड, कार्यकर्ते जखमी, सांगलीत वाद उफाळला
Aryan Khan : आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी SIT समोर नोंदवला जबाब; पुढील कारवाई काय?
(amol kolhe facebook post went viral said will not contact anyone for few days)