Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | आधी पक्ष की मैत्री? अमोल कोल्हे यांच्यापुढे धर्मसंकट की नवी संधी?

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी नागपूरच्या एका कार्यक्रमात शिट्टी वाजवली. मात्र ही शिट्टी चिंचवडमधल्या मित्राच्या प्रचारासाठी होती का? अशी चर्चा होऊ लागलीय. त्यामागील अगदी कारणही तसंच आहे.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | आधी पक्ष की मैत्री? अमोल कोल्हे यांच्यापुढे धर्मसंकट की नवी संधी?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:43 PM

ठाणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) नागपूरच्या एका कार्यक्रमात शिट्टी वाजवली. मात्र ही शिट्टी चिंचवडमधल्या मित्राच्या प्रचारासाठी होती का? अशी चर्चा होऊ लागलीय. कारण स्टार प्रचारकांच्या यादीत नाव असूनही कोल्हेंनी चिंचवडमध्ये एकही सभा घेतली नाही. विशेष म्हणजे कसबा-चिंचवडसाठी (Kasba and Chinchwad by-election) स्टार प्रचारकांच्या यादीत नाव असूनही खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) प्रचारात आलेच नाहीत. त्यानंतर आता नागपुरात (Nagpur) कोल्हेंनी अप्रत्यक्षपणे चिंचवडचे बंडखोर राहुल कलाटेंचा (Rahul Kalate) प्रचार केल्याचं बोललं जातंय. मविआच्या उमेदवाराला आव्हान देणाऱ्या बंडखोर राहुल कलाटेंचं चिन्ह शिट्टी होतं. तीच शिट्टी वाजवून अमोल कोल्हे काय म्हणाले ते देखील महत्त्वाचं आहे.

कसबा-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीनं स्टार प्रचारक म्हणून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, सुनिल शेळके, सुनिल तटकरे, शशिकांत शिंदें, अमोल कोल्हे, अमोल मिटकरींसह 20 जणांची यादी प्रसिद्ध केली होती. यापैकी बहुतांश जण प्रचारात आले. मात्र अमोल कोल्हेंनी एकही सभा घेतली नाही. स्टार प्रचारकांची यादी जाहीर होण्याआधीच काही नियोजीत कार्यक्रमाचं कारण कोल्हेंनी दिलं होतं.

अमोल कोल्हे यांची राहुल कलाटेंसोबत घनिष्ठ मैत्री

खासदार अमोल कोल्हे अस्वस्थ आहेत का? चिंचवडमध्ये बंडखोर राहुल कलाटेंना कोल्हेंनी गैरहजर राहून मदत केली का? कोल्हेंच्या गैरहजेरीमागे कलाटेंसोबतची घनिष्ठ मैत्री कारण आहे का? असे प्रश्न चिंचवडमध्ये चर्चेत होते. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीचे अनेक अर्थ निघतायत. पहिलं म्हणजे बंडखोर राहुल कलाटेंसोबत अमोल कोल्हेची असलेली घनिष्ठ मैत्री.

हे सुद्धा वाचा

राजा शिवछत्रपतीनंतर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेद्वारे अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. याच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे एक महत्वाचे वित्त पुरवठादार हे राहुल कलाटे होते. म्हणून एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे मैत्री या धर्मसंकटात अमोल कोल्हे सापडल्याचं बोललं जातंय.

अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीक वाढली?

दुसरी चर्चा म्हणजे मागच्या काही दिवसांपासून अमोल कोल्हेंची भाजपशी वाढलेली जवळीक. अमोल कोल्हेंनी ऑक्टोबरमध्ये अमित शाहांची भेट घेतली. ही भेट ‘शिवप्रताप गरुडझेप’ या सिनेमाच्या निमंत्रणासाठी असल्याचं सांगितलं गेलं. डिसेंबरमध्ये भाजपचे खासदार रावसाहेब दानवेंच्या जालन्यात अमोल कोल्हेंचा दौरा झाला. दानवेंचे भाऊ भास्कर दानवेंच्या बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन कोल्हेंच्या हस्ते झालं. त्यानंतर रावसाहेब दानवे आणि कोल्हेंमध्ये अर्धा तास गुप्त चर्चाही झाली.

याआधीही राष्ट्रवादीच्या काही कार्यक्रमांना अमोल कोल्हे अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे कोल्हे 2024 ला शिरुरची निवडणूक भाजपकडून लढवणार का? याच्याही चर्चा झाल्या. कारण शिरुरची जागा शिवसेनेच्या वाट्याला असली तरी शिंदे-भाजप युतीनंतर भाजप नेत्यांनी शिरुरवर लक्ष केंद्रित केलंय.

गेल्यावेळी शिरुरमधून अमोल कोल्हेंना 6 लाख 32 हजार 442 तर शिवसेनेच्या आढळराव पाटलांना 5 लाख 74 हजार 164 मतं मिळाली होती. आढळराव पाटलांचा 58 हजार 278 मतांनी पराभव झाला होता. आता 2024 मध्ये शिरुरमध्ये काय सामना रंगतो? हे पाहणं महत्वाचं आहे. गेल्याच अधिवेशनात खासदार अमोल कोल्हेंनी महागाईवरुन भाजप सरकारवर टीका केली होती, मात्र राजकारणात कधीही काहीही घडू शकतं.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.