Amravati Result 2023 : अमरावतीमध्ये दोन्ही फुटीर गटांना भोपळा, मातब्बर नेत्यांना धक्का, मात्र अपक्षांनी मारली बाजी

अमरावती जिल्हा ग्रामपंचायत निकाल लागला आहे. यात जनतेने पक्ष सोडून जाणारे आणि मूळ पक्षात असणारे अशा दोन्ही जणांना नाकारले आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत आपले खाते खोलले आहे. मतदारांनी या निवडणुकीत सर्वाचे उट्टे काढले असेच या निकालावरून दिसून येत आहे.

Amravati Result 2023 : अमरावतीमध्ये दोन्ही फुटीर गटांना भोपळा, मातब्बर नेत्यांना धक्का, मात्र अपक्षांनी मारली बाजी
AMRAVATI GRAM PANCHAYAT RESULT 2023Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 5:01 PM

अमरावती | 6 नोव्हेंबर 2023 : अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. यापैकी 1 ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती. मात्र उर्वरीत 19 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात अपक्ष सदस्यांनी बाजी मारली आहे. तर, प्रस्थापित पक्षांना जनतेने नाकारले असे हा निकाल सांगत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर खासदार झाल्या. तर, आमदार रवी राणा हे ही अपक्ष आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे अमरावतीचा निकाल पहाता या राणा दाम्पत्य यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले.

अमरावती जिल्हा ग्रामपंचायत निकाल लागला आहे. यात जनतेने पक्ष सोडून जाणारे आणि मूळ पक्षात असणारे अशा दोन्ही जणांना नाकारले आहे. या निवडणुकीत शिंदे गट, ठाकरे गट, अजितदादा गट आणि शरद पवार गट यांना जनतेने नाकारले आहे. या चारही पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. मात्र, कॉंग्रेस आणि भाजपने आपली लाज राखली आहे.

ग्रामपंचायतीच्या निकालात जनतेने 20 पैकी 10 ग्रामपंचायती अपक्षांच्या ताब्यात दिल्या आहेत. तर, कॉंग्रस आणि भाजपला प्रत्येकी चार ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत आपले खाते खोलले आहे. त्यांना 1 ग्रामपंचायती मिळाली आहे. तर, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेलाही 1 ग्रामपंचायती मिळाली आहे.

शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यापैकी ठाकरे गट आणि शिंदे गटाला जनतेने नाकारले आहे. 20 पैकी एकही ग्रामपंचायत या दोन्ही गटाकडे आली नाही. त्याचप्रमाणे शरद पवार गट आणि अजितदादा गट यांनाही एकही ग्रामपंचायती ताब्यात घेता आली नाही.

निवडणुकीपूर्वी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटले होते. या चारही नेत्यांमध्ये शाब्दिक चमकी झडल्या. एकमेकांचे शाब्दिक वस्त्रहरण केले गेले. मात्र, मतदारांनी या निवडणुकीत सर्वाचे उट्टे काढले असेच या निकालावरून दिसून येत आहे.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.