आनंद अडसूळांनी राणांची अक्कल काढल्यानंतर राणा दाम्पत्य त्यांच्या मुलास भेटले, त्या भेटीनंतर…
amravati lok sabha constituency: अमरावती जिल्ह्यात अडसूळ विरुद्ध राणा आणि बच्चू कडू विरुद्ध राणा हा वाद चर्चेत असतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी राणा दाम्पत्याने एक पाऊल मागे घेतले. राम नवमीचे निमित्त साधून ते आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना भेटले.
अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजप आणि महायुतीची उमेदवारी मिळाली. त्या ठिकाणी त्या चांगल्याच घेरल्या गेल्या आहेत. एकीकडे बच्चू कडू यांचा असलेला विरोध दुसरीकडे आनंद अडसूळ यांचा विरोध आहे. यामुळे तडजोडी करण्याचा प्रयत्न नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी चालवला आहे. त्यासाठी शिष्टाई करत आज आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांची भेट घेतली. राणा दाम्पत्याची ही शिष्टाई काही यशस्वी झाली की नाही? हे लवकरच कळणार आहे. कारण आनंद अडसूळ राणा दामप्ताविरोधात आक्रमकच आहे. त्या भेटीपूर्वी राणा दाम्पत्यांची त्यांनी अक्कल काढली होती. राजकारण सोडेल पण त्यांचा प्रचार करणार नाही, असे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना आनंद अडसूळ यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले आनंद अडसूळ
राजकारण सोडले पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही. त्यांना अक्कल नाही. १७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाली का? असा प्रश्न करत आनंद अडसूळ म्हणाले की, त्या पती-पत्नीस खरच अक्कल आहे की नाही, हा माझा प्रश्न आहे. त्यांना नैतिकता नाहीच, पण अक्कल नाही. या मंडळींनी अटापिटा करुन मला थांबले आणि तिला उमेदवारी दिली. आता त्यांची हवा नाही, हवा नाही, म्हणता आहे. त्यांची हवा नाही तर मग उमेदवारी दिली कशासाठी? त्या परीपक्व नाहीत, अडाणी आहेत, कृतघ्न आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
अभिजित अडसूळ यांची भेट
अमरावती जिल्ह्यात अडसूळ विरुद्ध राणा आणि बच्चू कडू विरुद्ध राणा हा वाद चर्चेत असतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी राणा दाम्पत्याने एक पाऊल मागे घेतले. राम नवमीचे निमित्त साधून ते आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना भेटले. त्यानंतर अभिजीत अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना तडजोडीची तयारी दाखवले होती.
त्यांनी म्हटले की, “राम नवमीनिमित्त राणा दाम्पत्य भेटायला आले. त्यांचे स्वागत करणे ही आपली परंपरा आहे. त्यानुसार आम्ही आदरतिथ्य केले. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू अन् कायमचा मित्र नसतो. माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांचा मी आदर करतो. पुढचा विषय आमचे शिवसैनिक ठरवतील. शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष आमच्यावर विश्वास टाकला. आजचा कार्यक्रम सर्वांच्या समोर झाला. आनंद अडसूळ यांच्याशी यासंदर्भात चर्चा केला जाईल. रागलोभ चालत असतात. पण देशाचे राणकारणाचा विचार करायला हवा. मोदीजी यांचा विचार करायला हवा”, असे अभिजीत अडसूळ यांनी सांगितले.