खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील दहा जणांना कोरोना, मुलांनाही संसर्ग, सासू-सासऱ्यांवर नागपूरमध्ये उपचार

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे (Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana daughter and son tested Corona Positive).

खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील दहा जणांना कोरोना, मुलांनाही संसर्ग, सासू-सासऱ्यांवर नागपूरमध्ये उपचार
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 4:05 PM

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये त्यांचा मुलगा आणि मुलीचाही समावेश आहे. तर नवनीत कौर राणा यांच्या सासू-सासऱ्यांना उपचारासाठी नागपूरच्या ओक हार्ट रुग्णालयात हलविण्यात आलं आहे (Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana daughter and son tested Corona Positive).

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट काल दुपारी (रविवार 2 ऑगस्ट) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात आली.

हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे (Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana daughter and son tested Corona Positive).

“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. त्यावेळी (एप्रिल महिन्यात) रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती.

संबंधित बातमी :

खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.