कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

63 वर्षीय महिलेचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Amravati Death Mucormycosis Black Fungus )

कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 9:17 AM

अमरावती : कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) पहिला बळी गेला आहे. 63 वर्षीय महिलेचा ब्लॅक फंगसने बळी घेतला. कोरोना बरा झाल्यानंतर घरी परतल्यावर तिला म्युकरमायकोसिसची लागण झाली होती. (Amravati witnessed First Death of Mucormycosis Black Fungus Post COVID Complication)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. अमरावती जिल्ह्यात तर कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही बोललं जात आहे.

कोरोनामुक्त महिलेचा ब्लॅक फंगसने बळी 

63 वर्षीय महिलेचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनावर मात करुन घरी परतल्यानंतर महिलेला म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाली होती. संबंधित महिला अमरावती शहरातील साईनगर येथील रहिवासी होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे चिंता वाढली असतानाच म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेल्यामुळे अमरावती जिल्हात प्रचंड खळबळ माजली आहे.

पाहा व्हिडीओ :

म्युकरमायकोसिसने अमरावतीत हातपाय पसरले

राज्यभरात वेगाने हातपाय पसरत असलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य रोगाने आता अमरावती जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. म्युकरमायकोसिसचे ही पोस्ट कोव्हिड कॉम्प्लिकेशन आहे. त्यामुळे रुग्णांची फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी टीबी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरु केले असून, त्या ठिकाणी रुग्णांना व्यायाम, योगा शिकवले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली होती.

(Amravati Death Mucormycosis Black Fungus )

अमरावतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

अमरावती जिल्हा प्रशासनाने सात दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानुसार रविवारी 9 मेपासून 15 मेपर्यंत अमरावती जिल्हा संपूर्ण बंद ठेवण्यात आला होता. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी कठोर भूमिका घेणे आवश्यक होते. त्यामुळे या काळात फक्त मेडिकलची दुकानं आणि हॉस्पिटल्स सुरु होती.

संबंधित बातम्या

अरे देवा! अमरावतीत म्युकरमायकोसिसचा शिरकाव; प्रशासनात खळबळ

बापरे! अमरावतीत कोरोनाची तिसरी लाट, रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

(Amravati witnessed First Death of Mucormycosis Black Fungus Post COVID Complication)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.