राज्यातील या जिल्ह्यात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पुन्हा कोरोनाचा धोका वाढला, आरोग्य विभाग अलर्ट
जिल्हा सध्या कोरोनाचे 14 सक्रिय रुग्ण आहेत. तर १३ नमूने हे तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल यायचा आहे.
अमरावती : एन्फ्लूएंझा-ए या विषाणूचा उपप्रकार असलेला एच-३ एन-२मुळे प्रादुर्भाव वाढत आहे. हवेद्वारे विषाणू पसरत असल्याने अनेकांना संसर्ग झालेला आहे. या आजाराचे लक्षणेही कोरोनासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत ११ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. त्यामुळे वेळेत तपासणी करून घ्यावी अन् बूस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 48 तासात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अचानक नोंद अमरावतीत झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा सध्या कोरोनाचे 14 सक्रिय रुग्ण आहेत. तर १३ नमूने हे तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल यायचा आहे.
आरोग्य यंत्रणा अलर्ट
देशभर इन्फ्लुएंजा वाढत आहे. काही राज्यांमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रेटही वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याची गंभीर दखल घेत औषधसाठी , ऑक्सिजनसाठा उपलब्ध ठेवा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आवश्यक अशा रुग्णांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. मास्कचा वापर करा, असे आवाहन पुन्हा एकदा आरोग्य विभागाने केले आहे.
खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांत राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण रुग्णबाधित येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे भूषण यांनी म्हंटलं. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या गावागावात खोकल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. खोकला झाला म्हणजे कोरोना तर झाला नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांनी चाचण्या करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
एच ३ एन २ इन्फ्लुएंझा व्हायरसचा प्रचार झपाट्याने होत आहे. या व्हायरसने दोन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्ण कर्नाटक आणि हरियाणातील आहेत. या विषाणूचे आतापर्यंत ९० रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची संख्या वाढत आहे. नीती आयोगाने यासंदर्भात बैठक घेतली. केंद्राकडून पत्र लिहून राज्यांना सूचना देण्यात आल्या.