Amravati Rain : मेळघाटात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, विदर्भातील परिस्थिती काय?

विदर्भात 11 सप्टेंबरपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्यामुळे अमरावती मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय. मध्यप्रदेशमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे.

Amravati Rain : मेळघाटात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, विदर्भातील परिस्थिती काय?
मेळघाटात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यूImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 8:06 PM

अमरावती जिल्ह्यात 12 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी (Dharni) तालुक्यातील सालइ बोबदो या गावात वीज पडली. यात देवराज दारशिंबे (Devraj Darshimbe) (वय 40 वर्षे ) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सदर शेतकरी हा आपल्या शेतामध्ये काम करत होता. मात्र अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. देवराज यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांचा यात मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी जाऊन आढावा घेतला.

शनिवारपर्यंत विदर्भात ऑरेंज अलर्ट

विदर्भात 11 सप्टेंबरपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्यामुळे अमरावती मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय. मध्यप्रदेशमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात झपाट्याने जलसाठा वाढतो आहे. परिणामी अप्पर वर्धा धरण 98 टक्के भरले आहेत. अप्पर वर्धाचे 13 दरवाजे 100 सेमी उघडण्यात आले आहे. यामधून 1599 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. अप्पर वर्धा धरणाचे पाणी अमरावती वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर धरणात येते. त्यामुळं बगाजी सागर धरणाचे 31 दरवाजे 45 सेमीने उघडण्यात आले आहेत.त्यातून 1270 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. परिस्थितीवर प्रशासन नियंत्रण ठेऊन आहेत.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे. यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.