Amravati : खासदार कार्यालय केले सील; बाहेर प्रशासनाचा कडा पहारा; अमरावतीत चाललंय तरी काय?

Amaravati MP Office Sealed : लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून अमरावती राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आले आहे. आता खासदार कार्यालयाचा ताबा मिळविण्यावरुन मोठा गदारोळ उठला आहे.

Amravati : खासदार कार्यालय केले सील; बाहेर प्रशासनाचा कडा पहारा; अमरावतीत चाललंय तरी काय?
खासदार जनसंपर्क कार्यालयावरुन हायहोल्टेज ड्रामा
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 9:58 AM

अमरावतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून खासदार कार्यालयाच्या ताब्यावरुन हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. भाजप आणि काँग्रेस या वादात प्रशासन आणि पोलीस मात्र चांगलेच जेरीस आले आहेत. खासदार जनसंपर्क कार्यालयाला आता प्रशासनाने पुन्हा सील ठोकले आहे. तर बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहे. एका कार्यालयावर दोन खासदारांनी दावा सांगितल्याने हा ड्रामा सुरु झाला आहे.

खासदार, आमदारांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून प्रवेश करणे काँग्रेसला भोवले. खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल खासदार कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खासदार कार्यालयाचे कुलुप तोडले होते.

हे सुद्धा वाचा

कार्यालय एक, खासदार दोन

पराभूत झाल्यानंतर 19 तारखेला नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कार्यालयाचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपविला, त्याच दिवशी भाजपचे राज्य सभेचे खासदार अनिल बोंडे यांनी कार्यालय देण्याची मागणी केली होती. यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय कुलूप तोडून काल ताब्यात घेतले होते. काँग्रेसने ताब्यात घेतलेले खासदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा सील करण्यात आले.

पुन्हा वादाची शक्यता

यावेळी यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. आता पुन्हा सील केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे खासदार कार्यालय अजून कोणालाही दिले नाही. त्यामुळे काँग्रेसने कुलूप तोडून ताबा घेतला होता. अमरावती मतदार संघ खेचून आणल्यानंतर काँग्रेसचे आक्रमक रुप सर्वांनीच पाहिले. त्यामुळे विधानसभेपूर्वी या ना त्या कारणांनी अमरावती राज्याच्या नकाशावर असेल, हे वेगळं सांगायला नको.

नवनीत राणा यांची भूमिका काय

नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खासदार जनसंपर्क कार्यालय परत करत असल्याचे पत्र दिले. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांना हे कार्यालय देण्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यांनी वानखेडे यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा पण दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेसाठी आहे. त्यामुळे ते नवनिर्वाचित खासदाराला देण्याचे म्हणणे त्यांनी मांडले.

Non Stop LIVE Update
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.