राम नाम सत्य है… सुरु होतं… अचानक तिरडी हलू लागली, नातेवाईकांनी घाबरून मंदिरात तिरडी उतरवली, इतक्यात…

प्रशांत मेशरे हा होमगार्डमध्ये कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

राम नाम सत्य है... सुरु होतं... अचानक तिरडी हलू लागली, नातेवाईकांनी घाबरून मंदिरात तिरडी उतरवली, इतक्यात…
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 9:41 AM

गणेश सोनोने, अकोलाः भर दिवाळीत (Diwali) अकोल्यातल्या (Akola) एका घरावर संकट कोसळलं. घरातल्या तरण्या ताठ्या मुलाचा मृत्यू झाला. काळजावर दगड ठेवून नातेवाईकांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. जाणकार मंडळींनी तिरडी बांधली. त्याचा देह तिरडीवर चढवला. आता उचलून स्मशानात (Funeral) नेत होते, तोच जे घडलं, त्यानंतर गावातले लोक चळाचळा कापायला लागले.

मृत झालेल्या या तरुणाचे अचानक हात-पाय हालू लागले. खांद्यावर असलेली तिरडी हलू लागल्याने नातेवाईक घाबरले. त्यांनी एका मंदिरात तिरडी उतरवायचं ठरवलं…  थोडी हालचाल करून तो तरुण थेट तिरडीवरून उठूनच बसला. मृत तरुण असा एकाएकी उठून बसल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

हा प्रकार घडला बुधवारी. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात. तरुणाचं नाव आहे प्रशांत मेशरे.

प्रशांत मेशरे हा होमगार्डमध्ये कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

नस चोक अप झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. 25 वर्षांच्या प्रशांतच्या मृत्यूचा धक्का पचवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तिरडी अचानक हलू लागली. त्यामुळे नातेवाईकांनी मंदिरात मृतदेह आणला. तेवढ्यात प्रशांत उठूनच बसला.

अचानक तो तिरडीवरून उठून बसल्याने अख्खा गाव हे पाहण्यासाठी आलं. मंदिर परिसरात एवढी गर्दी झाली की जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही बोलवावं लागलं.

प्रशांतच्या अंगात देव असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्याच्या दैवी शक्ती संचारल्याचंही बोललं जातंय.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.