‘आम्ही काय आता खुरपणीला जायचं का?’, अजित पवार यांचा दिव्यांगांना सवाल

"दिव्यांगाना राजकीय आरक्षण? काय चाललंय यार? आम्ही काय आता खुरपणीला जायचं काय?", असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज अमरावतीत आले तेव्हा त्यांना काही दिव्यांग बांधवांनी निवेदन देत दिव्यांगाना 2 टक्के राजकीय आरक्षण मिळावं, अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनी संबंधित वक्तव्य केलं.

'आम्ही काय आता खुरपणीला जायचं का?', अजित पवार यांचा दिव्यांगांना सवाल
'आम्ही काय आता खुरपणीला जायचं का?', अजित पवार यांचा दिव्यांगांना सवाल
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 6:45 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजित पवार दिव्यांगांना आम्ही काय खुरपणीला जायचं का? असा सवाल करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्याकडे काही दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन गेले होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांचं निवेदन वाचत “आम्ही काय आता खुरपणीला जायचं का?” असा सवाल केला. अजित पवार यांच्याकडे दिव्यांगांनी आम्हाला 2 टक्के राजकीय आरक्षण द्या, अशी मागणी करणारं निवेदन दिलं होतं. यावेळी अजित पवारांनी निवेदन वाजताना संबंधित वक्तव्य केलं. तसेच जनतेचा पाठिंबा असेल तर दिव्यांग लोकप्रतिनिधी सुद्धा वाढू शकतात, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले.

अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमरावतीच्या निजोयन भवन येथे अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि अपंगांनी आपल्या मागण्या अजित पवार यांच्यासमोर ठेवल्या. या मागणीच्या निवेदनात निवडणुकीत दिव्यागांना 2 टक्के राजकीय आरक्षण हे दिले पाहिजे, अशी मागणी होती. यावेळी अजित पवार यांनी आम्ही मग खुरपणी करायला जायचं का? असा प्रश्न उपस्थित केला.

“दिव्यांगाना राजकीय आरक्षण? काय चाललंय यार? आम्ही काय आता खुरपणीला जायचं काय? तुम्ही स्वत: राजकारणात उतरु शकता. जनतेचा तुम्हाला पाठिंबा असेल तर शंभर टक्के तुम्ही लोकप्रतिनिधी बनू शकता”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. ते जे काही असेल ते स्पष्टपणे आणि तोंडावर बोलतात. त्यांचा रोखठोक स्वभाव हा सर्वश्रूत आहे. अजित पवार यांचा आज दिव्यांगांसोबत बोलतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.