प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अमरावतीतून निवडणूक लढणार; नवनीत राणा यांच्यासमोर कडवे आव्हान?

Lok Sabha Election : अमरावतीत लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की. बारामती, शिरुर, पुण्यासह अमरावती पण लक्षवेधी निवडणूक होण्याची चिन्ह आहेत. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या बंधूंनी पण या लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकले आहे.  पहिल्यांदाच ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी ही झूंज कडवी असेल.

प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अमरावतीतून निवडणूक लढणार; नवनीत राणा यांच्यासमोर कडवे आव्हान?
अमरावतीची निवडणूक होणार बहुरंगी
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 4:18 PM

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत लोकसभेचा बिगुल वाजला आहे. काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. पण सध्या सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. अनेकांचा विरोध डावलून भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण या विजयासाठी मोठी आव्हानं त्यांच्यासमोर दिसत आहेत. बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी व्यक्तं केली आहे. तर आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख यांनी पण अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हं आहेत.

2 एप्रिल रोजी अर्ज भरणार

आपण स्वतः अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. 2 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्याचा टोला त्यांनी हाणला. अमरावती हा विदर्भातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. पण त्याचा विकास रखडला आहे. त्यामुळेच आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अमरावती राज्याच्या केंद्रस्थानी

गेल्या तीन ते चार वर्षांपासून अमरावती सातत्याने राज्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात महाविकास आघाडी असा सामना खूप रंगला. त्यात हनुमान चालीसापासून ते बच्चू कडू यांच्याशी वादापर्यंत ही चर्चा कायम होती. नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर लढणार हा अंदाज पण वर्तविण्यात येत होता. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी पण वंचितचा उमेदवार जाहीर केल्याने अमरावतीत बहुरंगी निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे.

वंचित विरुद्ध आनंदराज

वंचितने अमरावती लोकसभा मतदारसंघातून कु. प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. तरस्थानिक लोकांची तसेच आंबेडकर चळवळीतील लोकांची ईच्छा होती मी निवडणुक तिथून लढावी म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत. स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मी अमरावती मधून निवडणूक लढावी, जरी तिथं वंचितचा उमेदवार असला तरी मी अमरावती मधूनच निवडणूक लढणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

बाळासाहेबांची अनेकदा भेट

बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी अनेकदा भेट झाली. मणिपूरच्या घटनेनंतर भेटलो होतो. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक माहिती हवी असल्याने त्यांची भेट घेतल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितेल. आता मतपेटीतून काय होईल, ते कळेल असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणा साधला. १९९० साली ओबीसीसंदर्भात तुम्ही कोणाबरोबर होता? मंडल बरोबर होता किंवा कमंडल बरोबर होता? असा सवाल त्यांनी केला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.