Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Ambulance | अमरावतीत रुग्णवाहिका दिवसभर भक्तांच्या सेवेत!; रुग्णांसाठी नव्हे मेळघाटात ॲम्बुलन्स नवसासाठी

मेळघाटात गर्भवती व इतर अपघाती रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याचे वास्तव चित्र आहे. सतत त्याची ओरड सुरू असते. परंतु अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका आपल्या कार्यक्षेत्रात बाहेरील कोयलारी येथील सोमेश्वर भोले मंदिरात नवसाच्या पूजेसाठी भक्तांना घेऊन आली होती.

Amravati Ambulance | अमरावतीत रुग्णवाहिका दिवसभर भक्तांच्या सेवेत!; रुग्णांसाठी नव्हे मेळघाटात ॲम्बुलन्स नवसासाठी
अमरावती जिल्ह्यात रुग्णवाहिका दिवसभर भक्तांच्या सेवेतImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 5:55 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात हा अतिदुर्गम भाग. चिखलदरा तालुक्यातील हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) भलतचं प्रकरण उघडकीस आलं. या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका थेट 45 किलोमीटर अंतरावरील जंगलात दिसली. तिही नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन गेली होती. ही धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अॅम्ब्युलन्सचं काम रुग्णांना नेण्याचं असते. पण, येथे रुग्ण वाहून नेले गेले नाही. त्याऐवजी चक्क नवसासाठी अॅम्बुलन्सचा वापर केला गेला. यासंदर्भात संबंधित डॉक्टरला (Doctor) विचारणा करण्यात आले. तेव्हा ते म्हणतात, ती गाडी गॅरेजमध्ये ब्रेक नादुरुस्त असल्याने ठेवली होती. दुरुस्तीसाठी उभी होती. नवसाला कशी गेली माहीत नाही. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले (Dr. Dilip Ranmale) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अंती दोषीवर कठोर कारवाई करू अशी माहिती रनमले यांनी दिली.

रुग्णवाहिका सोमेश्वर भोले मंदिरात

मेळघाटात गर्भवती व इतर अपघाती रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याचे वास्तव चित्र आहे. सतत त्याची ओरड सुरू असते. परंतु अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका आपल्या कार्यक्षेत्रात बाहेरील कोयलारी येथील सोमेश्वर भोले मंदिरात नवसाच्या पूजेसाठी भक्तांना घेऊन आली होती. या मंदिरात रुग्णवाहिका दर्शन घेण्यासाठी तर आली नव्हती, असा प्रश्न विचारला जात आहे. पण, हे दर्शन घेणारे कोणते व्हीआयपी होते. याचा शोध चौकशीनंतरच लागेल. पण, चक्क रुग्णवाहिका नवसाला गेल्याने अंधश्रद्धेच्या जोखडातून मेळघाट केव्हा निघेल हा खरा प्रश्न आहे.

रुग्णांना वेळेवर मिळत नाही रुग्णवाहिका

मेळघाटात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं डॉक्टरपेक्षा काही लोक नवस, उपास-तापास यांना महत्त्व देतात. रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. पण, हीच रुग्णवाहिका नवसाच्या कार्यक्रमासाठी भक्तांच्या सेवेत होती. त्यामुळं रुग्णवाहिकेचं काम काय, रुग्णांसाठी की, नवसासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. चौकशीचे आदेश दिले. यात कोण दोषी आहे. ही रुग्णवाहिका रुग्णांना सोडून नवसाला कुणाच्या सांगण्यावरून गेली. चालकाने अशी चालाखी कशी केली, या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.