तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माणूस 6 दिवसांपासून कोरड्या विहिरीत खाट टाकून का झोपलाय?

आंदोलन म्हटलं तर आपल्यासमोर कोणतं चित्र निर्माण होईल? एखादी व्यक्ती रस्त्यावर उपोषणाला बसलीय, कुणीतरी घोणषाबाजी करतंय, तर कुणीतरी आपल्या मांगण्यांसाठी आक्रमक झालंय, असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहू शकतं. पण हे आंदोलन फार वेगळं आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माणूस 6 दिवसांपासून कोरड्या विहिरीत खाट टाकून का झोपलाय?
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 6:31 PM

अमरावती | 16 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन राज्यभरात चर्चेत आलं. त्यांनी तब्बल 15 दिवस आमरण उपोषण केलं. त्यांच्या या उपोषणाने आख्खी सिस्टीम हादरवली. राज्य सरकारचे धाबे दणाणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत: जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी या गावात उपोषणस्थळी जावून मनोज जरांगे यांची भेट घ्यावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ज्यूस भरवून मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवले. अर्थात मनोज जरांगे यांनी काही अटी ठेवून उपोषण मागे घेतलं.

मनोज जरांगे यांच्या या आंदोलनासारखंच आता आणखी एक आंदोलन राज्यात चर्चेत आलं आहे. मनोज जरांगे यांचं आंदोलन राज्यभरातील मराठा समाजासाठी होतं. पण अमरावती येथे होणारं आंदोलन हे तिथल्या काही स्थानिक प्रश्नांसाठी होतंय. खरंतर संबंधित आंदोलकाची मागणी फार मोठी नाहीय. पण प्रशासन आणि तिथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांमुळे हा विषय आता राज्यभरात चर्चेला जाऊ लागलाय.

अमरावतीत अनोखं आंदोलन

आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यावर कोणताही आकांडतांडव न करता अतिशय शिस्तीत, संयमाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे हा चांगला उपाय आहे. शांततेत आंदोलन केल्यास आपल्या मागण्यांच्या पूर्ततेला थोडा वेळ लागतो. पण प्रसाशन आणि सत्ताधाऱ्यांना आपल्यासमोर अखेर गुडघं टेकवावं लागतं. आपली मागणी योग्य असेल तर ते साहजिकच होणं अपेक्षित असतं. अमरावतीत सध्या असंच एका नागरिकाचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अतिशय अनोखं आहे. त्यामुळे ते चर्चेला कारण ठरत आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायत क्षेत्रात एका व्यक्तीचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन थोडं वेगळं आहे. ही व्यक्ती थेट कोरड्या विहिरीत झोपलीय. या व्यक्तीचं नाव विलास दत्तुजी चर्जन असं आहे. विलास चर्जन यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. त्यांच्या मागणीवर प्रशासनाने लेखी उत्तरही दिलं. पण त्यांच्या मागणीवर पूर्तता झाली नाही. त्यामुळे विलास यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट कोरड्या विहिरीत खाट टाकून उपोषण सुरु केलं.

विलास चर्जन उपोषणाला का बसले?

विलास चर्जन ज्या विहिरीत खाट टाकून उपोषणाला बसले आहेत. त्या विहिरीच्या बाहेर त्यांच्या आंदोलनामागील कारण सांगण्यात आलं आहे. “मौजा सोनोरी वार्ड क्रमांक 1 मधील रस्त्याच्या सुरुवातीला असलेले अतिक्रमण निष्क्रिय करुन देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतने दिले होते. पण सात-आठ महिन्याच्या कालावधी होऊनसुद्धा त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही. तरी तात्काळ अतिक्रमण निष्क्रिय करुन देण्यात यावे”, अशी मागणी विलार्ज चर्जन यांनी बॅनरवल लिहिलीय.

‘खोटी माहिती देवून माझी दिशाभूल’

विलास चर्जन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देखील दिलीय. “मी मौजा सोनोरी वार्ड क्रमांक 1 मधील नागरीक विलास दत्तूजी चर्जन. गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण काढण्यासाठी आणि रस्त्यामधील ही विहिर बुजवण्यासाठी अनेकदा विनंती केली. पण मला आजपर्यंत फक्त लेखी आश्वासन देवून किंवा खोटी माहिती देवून माझी दिशाभूल करण्यात येत आहे”, असं विलास चर्जन यांनी सांगितलं.

“त्यांनी मला 11 ऑगस्टला अतिक्रमण हटवण्याचं लेखी आश्वासन दिलं. पण त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. ही कारवाई तात्काळ होण्याकरता मी पुन्हा उपोषण सुरु केलं”, असं विलास चर्जन यांनी सांगितलं. विलास चर्जन यांचं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. पण अद्यापही त्यांच्या मागणीवर प्रशासनाकडून कारवाई केली जात नाहीय.

आंदोलकाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

प्रशासनाने आता कारवाई केली नाही तर आपण विहिरीत स्वत:ला संपवू, असा इशारा विलास चर्जन यांनी दिलाय. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. विलास चर्जन यांच्या या अनोख्या उपोषणाची दहशत वरीष्ठ अधिकार्‍यांमध्ये पसरलीय. त्यामुळे ठाणेदारासह इतर अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून आहेत. पण शोकांतिका अशी की, सोनोरी सरपंच, उपसरपंच आणि सत्तारुढ गटाचा सदस्य घटनास्थळावर दाखल झाले नाहीत. आता विलास यांची मागणी कधी पूर्ण होते? तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.