Amravati Curfew | अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात, इंटरनेट सेवा शुक्रवारपर्यंत बंद, अकोटमध्येही संचारबंदी कायम

अमरावती शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून अमरावतीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम असणार आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवा शुक्रवार (19 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, आज बुधवार (17 नोव्हेंबर) दुपारी 12 ते 4 या वेळात शहरात कर्फ्यूमधून शिथिलता देण्यात येणार आहे.

Amravati Curfew | अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात, इंटरनेट सेवा शुक्रवारपर्यंत बंद, अकोटमध्येही संचारबंदी कायम
Amravati Curfew
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 10:30 AM

अमरावती : त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, सध्या अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. मात्र, संचारबंदी कायम असणार आहे.

अमरावती शहरातील परिस्थिती नियंत्रणात, संचारबंदी कायम

अमरावती शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून अमरावतीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम असणार आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवा शुक्रवार (19 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, आज बुधवार (17 नोव्हेंबर) दुपारी 12 ते 4 या वेळात शहरात कर्फ्यूमधून शिथिलता देण्यात येणार आहे.

सध्या अमरावती शहरात शांतता असल्याने संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी आणि इतर महत्वाच्या कामासाठी 4 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर संचारबंदी पूर्णत: हटवली जाईल. मात्र, सध्या संचारबंदी कायम राहणार असून, इंटरनेट सेवाही बंदच राहील. आठवड्याच्या शेवटी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीत शिथिलता किती द्यायची, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

अकोटमध्येही शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम

अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 13 आणि 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान,आता पुन्हा 19 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तर, अकोट शहरातील इंटरनेट सेवा 19 नोव्हेंबरपर्यंत बंदच असणार आहे.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरातीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिलीये.

संबंधित बातम्या :

अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी, दगडफेकीच्या घटनेनंतर तात्काळ निर्णय

अमरावती हिंसाचारः माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा, दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

Non Stop LIVE Update
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.