Amravati Collector Office | अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत 151 वर्षांची! दोन वर्षांत तयार होणार नवी इमारत

वर्कआर्डर दिल्यानंतर दोन वर्षांत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत बांधण्यात येणाराय. पाच मेपर्यंत निविदा उपलब्ध राहणार आहेत. 28 एप्रिलला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात बैठक घेतली जाणाराय. सात मे रोजी निविदा उघडल्या जातील. नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत कंत्राटदारांकडून ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्यात.

Amravati Collector Office | अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत 151 वर्षांची! दोन वर्षांत तयार होणार नवी इमारत
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत, बाजूला नव्या इमारतीचे संकल्पचित्र.
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:48 PM

अमरावती : अमरावतीकरांसाठी एक खूशखबर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत आता तयार होणाराय. जुनी इमारत 1871 मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालय तिथंच आहे. आता तब्बल 151 वर्षानंतर अमरावतीचं जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नवी होणाराय. यासाठी 28 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी ( Construction) सार्वजनिक बांधकाम विभागानं (Public Works Department) निविदा बोलाविल्या आहेत. वर्कआर्डर दिल्यानंतर दोन वर्षांत ही नवी इमारत बांधण्यात येणाराय. पाच मेपर्यंत निविदा उपलब्ध राहणार आहेत. 28 एप्रिलला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात बैठक घेतली जाणाराय. सात मे रोजी निविदा उघडल्या जातील. नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत कंत्राटदारांकडून ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्यात.

नवीन इमारतीत सर्व कार्यालये एकत्र

1905 मध्ये अमरावती जिल्हा निर्माण झाला. 1956 मध्ये अमरावती जिल्हा मुंबई राज्याचा भाग होता. आता अमरावतीमध्ये पाच जिल्ह्यांचे महसूल आयुक्तालयाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या बघता विद्यमान कार्यालय अपुरे पडत आहे. अनेक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विखुरलेली आहेत. ती सर्व कार्यालये नवीन इमारतीत एकाच छताखाली येणार आहेत.

अशी असेल नवी इमारत

सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूस नवी इमारत साकारली जाणाराय. इमारतीचे बांधकाम 7271 चौरस मीटर राहणाराय. त्यामध्ये पार्किंग, लिफ्ट, सुसज्ज दालन, पेयचलाची उत्तम व्यवस्था राहणार आहे. कंत्राटदार लवकर निश्चित झाल्यास 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत तयार होईल.

28 कोटी रुपयांचं बजेट

तब्बल 151 वर्षांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नवी तयार होणार आहे. जुनी इमारत तशीच ठेवून नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 28 कोटी रुपयांचं बजेट तयार करण्यात आलंय. जी प्लस फोर अशी ही नवीन इमारत राहणार आहे. 11 एप्रिलपासून या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

Ravi Rana on Hanuman Chalisa | शिवसेना आता काँग्रेस सेना झालीय, अमरावतीत आमदार रवी राणा यांची टीका

Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठवायचंय, कोल्हापूर उत्तरच्या निकालावर नाना पटोलेंनी दादांना डिवचलं

Washim | बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज, 23 एप्रिलला बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार, मूक आंदोलन करणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.