Amravati | डॉक्टर, कर्मचारी दारुच्या नशेत, रुग्णलयात आढळल्या बॉटल; वरिष्ठ येताच धक्कादायक प्रकार समोर
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येते कार्यरत असलेला डॉक्टर (Doctor) व परीचारक नेहमीच दारू पिऊन कामावर येत असल्याचं समोर आलंय.
अमरावती : आरोग्य कर्मचारी हे देवाचं रुप असल्याचं म्हटलं जातं. रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणण्याचं काम डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी करतात. त्यांच्या या अपार मेहनतीला संपूर्ण जग नेहमीच सलाम करत असतं. मात्र अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येते कार्यरत असलेला डॉक्टर (Doctor) व परिचारक नेहमीच दारू पिऊन कामावर येत असल्याचं समोर आलंय. ही गोष्ट सार्वजनिक होताच याप्रकरणी आता कार्यरत डॉक्टर अशोक तूमरेडी व परीचारक तुषार भुयार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आरोग्य सभापती व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिले आहेत.
दारु पिऊन काम करायचे
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अशोक तुमरेडी व परीचालक तुषार भुयार हे कार्यरत होते. मात्र हे दोघे नेहमीच कामावर दारू पिऊन येत होते. दारु पिऊन येण्याच्या प्रकारात वाढ झाल्यानंतर ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी देण्यात आली. एवढच नाही तर या दोघांनी आरोग्य केंद्रातच एका ठिकाणी दारूचा अड्डा बवनला असल्याचं व्हायरल व्हिडिओत समोर आलं आहे.
रुग्णालयात आढळल्या दारुच्या बॉटल
दरम्यान, ट्रक दुचाकी अपघातील एका जखमीला या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. यावेळी हे दोघेही दारुच्या नशेत होते. त्यामुळे यांनी जखमी अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार केले नसल्याने नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे केल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. सभापती आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी घुईखेड आरोग्य केंद्राला भेट दिली असता नागरिकांनी अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात पाहणी करायला लावली. यावेळी परिसरात तसेच कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी, कार्यालयात दारूच्या बॉटल आढळून आल्या. दरम्यान, मद्यपान व गैरवर्तणूक प्रकरणी या दोघानांही कार्यमुक्त करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.
इतर बातम्या :