राणा दाम्पत्य v/s यशोमती ठाकूर, आता लढाई कायदेशीर लढाई; ठाकूर आता ‘इतक्या’ कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
Yashomati Thakur on MLA Ravi Rana And MP Navneet Rana Statement : नवनीत राणा यांच्याविरोधात यशोमती ठाकूर आक्रमक; 100 कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार. आता राणा दाम्पत्य विरुद्ध यशोमती ठाकूर अशी कायदेशीर लढाई पाहायला मिळणार, वाचा...

अमरावती : 14 सप्टेंबर 2023 | अमरावतीच्या राजकारणात सध्या राणा दाम्पत्य विरूद्ध यशोमती ठाकूर असा संघर्ष निर्माण झाला आहे. खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या दाव्या विरोधात माजी मंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आता कायदेशीर लढा देणार आहेत. नवनीत राणा यांनी केलेले सर्व आरोप ठाकूर यांनी फेटाळले आहेत. यशोमती ठाकूर या नवनीत राणा यांच्या विरोधात 100 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात सध्या या दाव्या प्रतिदाव्याची चर्चा होतेय. राणा दाम्पत्याविरोधात यशोमती ठाकूर आता कायदेशीर कारवाई करणार आहेत. निवडणूक विभागाकडेही त्या तक्रार करणार आहेत.
यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक खर्चात दिली का? एवढा मोठा दावा होतो. तर निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? निवडणूक आयोगाने राणावर कारवाई का केली नाही? जर नवनीत राणा एवढा मोठा दावा करत आहेत. तर ईडी सीबीआय काय करत आहे?, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसंच शिवसेना आमदारांच्या सुनावणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांना कडे लक्ष द्यायला वेळ नाही.पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात यायला वेळ आहे.शिंदे यांचे आमदार अपात्र आहेच ते अपात्र होईलच. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर यशोमती ठाकूर आता आक्रमक झाल्या आहेत.
नवनीत राणा यांचा आरोप काय?
नवनीत राणा यांनी काल यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केलेत. त्यानंतर राणा दाम्पत्य विरूद्ध यशोमती ठाकूर हा संघर्ष आता तीव्र झाला आहे.
यशोमती ठाकूर यांनी आरोप फेटाळताना राणांवर आरोप केले. मी तुम्हाला वहिनी म्हणून स्वीकारलं. तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही दारोदार फिरलो. मात्र तुमचं सर्टिफिकेट खोट आहे. तुन्ही चोर निघालात, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी प्रतिहल्ला केला आहे.