Melghat Fire | जंगल मे फायर नही, फ्लावर होणे चाहिये!, समाजमाध्यमांवरील पोस्टरने वेधले लक्ष; दंड काय होणार माहीत आहे का?
यंदा आगी लावणाऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यासाठी अभिनेत्यांच्या पोस्टरचाच वापर करण्यात आलाय. हे अभिनेते पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत.
अमरावती : उन्हाळा सुरू झाला की जंगलात आगीच्या घटना घडतात. आग लागली म्हणजे जंगल जळून खाक होतं. छोटे-छोटे रोपटे नष्ट होतात. जमिनीवरील किडकांचाही यात मृत्यू होतो. जंगलाची अपरिमीत हानी होते. या आगी लागू नयेत, यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे आग मुक्त अभियान (Fire Free Campaign) राबविण्यात येत आहे. जनजागृती केली जात आहे. त्यासाठी पोस्टरची धूम सध्या सुरू आहे. यामध्ये जंगलात आग लावल्यास पाच हजार रुपये दंड तसेच दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा होणार आहे. ही जाहिरात सध्य लोकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होणे चाहियें, असे अल्लू अर्जून (Allu Arjun) सांगतोय, तर आली रे आली आता जंगलात आग लावणाऱ्यांची बारी आली, असं अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सांगतोय. या दोन्ही पोस्टरमुळं जंगलात आग लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप गृपवर व्हायरल
वन व वन्यजीव विभागाच्या जंगलाचं रक्षण करण्यासाठी काय करायला हवं. काय नाही, हे अधिकारी-कर्मचारी गावागावात जाऊन सांगतात. त्यासाठी जंगली भागातील गावांत सभा घेतल्या जातात. लोकांना समजावून सांगितलं जातं. तरीही काही समाजद्रोही लोकं जंगलात आग लावतात. त्यामुळं वनविभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण, यंदा आगी लावणाऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यासाठी अभिनेत्यांच्या पोस्टरचाच वापर करण्यात आलाय. हे अभिनेते पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. त्यामुळं आगी लावणाऱ्यांना अशा आगी लाव अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गृपवरील या व्हायरल पोस्टरमुळं चांगलीचं खळबळ माजली आहे.
तक्रारीसाठी 1926 टोल फ्री क्रमांक
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप गृपवर सध्या हे पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहेत. तक्रार करायची झाल्यास 1926 या क्रमांकावर करा. हा टोल फ्री सूचना क्रमांक देण्यात आलाय. सूचना देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवलं जातं. त्यामुळं माहिती देणारे सुरक्षित राहतात. अभिनेते हे युवकांचे फॅन्स असतात. म्हणून या अभिनेत्यांच्याच स्टाईलचा वापर करून जनजागृती केली जाणाराय. यंदातरी आगीच्या घटना कमी होती, असं समजायला काय हरकत आहे.