‘मस्ती आलीय का? आधीच सांगतोय…’, बच्चू कडू अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, नेमकं कारण काय?

| Updated on: Dec 15, 2022 | 4:39 PM

प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू आज पुन्हा एकदा अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.

मस्ती आलीय का? आधीच सांगतोय..., बच्चू कडू अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, नेमकं कारण काय?
Image Credit source: tv 9
Follow us on

अमरावती : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू आज पुन्हा एकदा अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. बच्चू कडू यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत ते मोबाईलमधून एका अधिकाऱ्याला चांगलेच झापताना दिसत आहेत. तुम्हाला मस्ती आलीय का? सध्या मी माझ्या कार्यालयात बसलोय. नाहीतर आम्ही तुमच्या कार्यालयात येऊ, असा दम बच्चू कडू अधिकाऱ्यांना देताना दिसत आहे. बच्चू कडू यांनी याआधीदेखील अधिकाऱ्यांना झापलं आहे. यावेळी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलंय.

बच्चू कडू यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीदरम्यान बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी फोनवरुन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला थेट जाब विचारला आणि शेतकऱ्यांच्या समस्येचा पाढा वाचला.

बच्चू कडू अधिकाऱ्याला नेमकं काय म्हणतात?

हे सुद्धा वाचा

“लोकं इकडे आम्हाला शिव्या घालतात. तुम्ही असं काम का करतात? दोन भाऊ आहेत. त्यांचं आजूबाजूला शेती आहे. त्यापैकी एका भावाला तुम्ही पंधरा हजार नुकसान भरपाई दिली आणि दुसऱ्या भावाला फक्त चार हजार दिली. असं का केलं? काय नाटकं आहेत ही?”, असे सवाल बच्चू कडू यांनी केले.

“बघुन घेऊ म्हणजे काय तुम्ही उपकार करणार आहेत का?”, असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

“नाही, पंचनामे आमच्याकडे द्यायला सांगा. जिल्हा अधिक्षकांकडे पंचनामा द्यायला लावा”, असा आदेश बच्चू कडू यांनी दिला.

“तुम्हाला मस्ती आलीय का? आता इथे बसतोय आम्ही. नाहीतर तिथे तुमच्या कार्यालयावर येऊ. आधीच सांगतोय”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

“आमच्या पिकांचं 25 टक्के नुकसान झालं होतं. त्यावर अधिसूचना निघाल्या. अधिसूचना निघून तुम्ही त्याचे पैसे दिले नाहीत”, असं बच्चू कडूव म्हणाले.